खिशात किती नोटा आहेत जमा ?
लेखनविषय:
काव्यरस
प्रिया, मी तर तुझी प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
प्राणेश्वरा,जीवलगा! सख्या सजना !
तुझिया संगती रे आज मज ना
पाहावयाचा आहे ( फुकटात ) सिनेमा
प्रिया मी तुझीच प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
( भुलते हे जन पैसा पाहुनी
असेल 'मनी' तरच मिळेल 'हनी'
पैशाविना मोल ना तव प्रेमा )
प्रिया मीच तुझी प्रियतमा !
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
पाहू दे रे मनाची दिलदारी
नसेल 'बैलेंस' कर उसनवारी
तुझिया प्रेमाची होईल खातरजमा
प्रिया मीच ना तुझी प्रियतमा ?
( खिशात किती नोटा आहेत जमा? )
( फुकटात लाभे ऐसी 'प्रीती' ना स्वस्त
एक विचारता मला मिळतील मस्त
करता एक इशारा कैक होतील जमा )
असेन आणिक तुझी प्रियतमा
खिशात जेव्हा असेल पैसा पुन्हा-
( सर्वच प्रेमिका अशा असतीलच असे नाही )
वाचने
2236
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
बरं,
In reply to बरं, by जव्हेरगंज
क्रेडीट कार्ड ठेवले तर उत्तम
हा: हाः
kavita mast aahe
धन्यवाद
मिपा
In reply to मिपा by नाखु
तुमच्या भयकथेच्या प्रतीक्षेत
ओह के
भुलते हे जन पैसा पाहुनी
In reply to भुलते हे जन पैसा पाहुनी by अत्रुप्त आत्मा
;0