आता घे आवरते सारे
लेखनविषय:
उघड्या घराचे कोंदट श्वास
आता जाहलेत मोकळे
लख्ख डोळ्यानी, निरख वाटा
दिशा दाखवतील वादळवारे
आता घे आवरते सारे ||
प्रत्येक जगण्याने साथ सोडली
गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे
किती डोळ्यांच्या वाटा करशील
का वाहतोस आठवांचे भारे
आता घे आवरते सारे ||
जनापवाद कुणा न टळला
का बंद करतोस कवाडे ?
मान मनाचे सामर्थ्य तुझीया
अंधारातच तेवतात तारे
आता घे आवरते सारे ||
वाहत्या आसवांनी कुणी का परतते ?
सोडूनी वर्तमानास भविष्य येते
कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला
कुणी असे जगतात का रे ?
आता घे आवरते सारे ||
बघ जगी , दुख राहीले भरून
सुख मिळते का कधी मरुन ?
परवेदनेस मानूनी आपले
डोळे पुसण्यासाठी जग रे
आता घे आवरते सारे ||
जगभरूनी वाहतात आसवे
कुणी वाहते का त्यासवे ?
पिऊनी सा-या यातनासागराला
एकदा तरी अगस्ती बन रे
आता घे आवरते सारे ||
विजयकुमार.....................
14 / 12 / 2008
वाचने
2306
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
आता असे वेगळे लिहिले तर कोणिच
In reply to आता असे वेगळे लिहिले तर कोणिच by पालीचा खंडोबा १
ओ मालक...
In reply to ओ मालक... by चांदणे संदीप
:)
In reply to आता असे वेगळे लिहिले तर कोणिच by पालीचा खंडोबा १
नेहमीप्रमाणेच कविता आवडली. पण
In reply to नेहमीप्रमाणेच कविता आवडली. पण by प्राची अश्विनी
+१
In reply to नेहमीप्रमाणेच कविता आवडली. पण by प्राची अश्विनी
असंच म्हणतो.
कविता आवडली
छान लिहिलंय.
कविता आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -
कविता आवडलीच.
छान कविता
छान कविता