शेवटी संपन्न हा वनवास झाला..
लेखनविषय:
काव्यरस
जो जसा झाला तसा, पण खास झाला
शेवटी संपन्न हा वनवास झाला
पाप माझे राहिले शाबूत अवघे
पुण्यकर्माचा त्वरेने र्हास झाला
मी जरी अध्यात ना मध्यात होतो
केवढा दुनियेस माझा त्रास झाला
देव प्रत्यक्षात नाही पाहिला मी
पण मला दगडात त्याचा भास झाला
जीव कोठेही कधी रमलाच नाही
मग असा नुसताच टाइमपास झाला
डॉ.सुनील अहिरराव
वाचने
2740
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
क्वचित मीटर किंचित डळमळीत आणि
In reply to क्वचित मीटर किंचित डळमळीत आणि by गवि
+१
मी जरी अध्यात ना मध्यात होतो
In reply to मी जरी अध्यात ना मध्यात होतो by कानडाऊ योगेशु
+१
@गवि , कानडाऊ योगेशु
कविता आवडली
व्यथा
आवडलं.