वाघोबा at ताडोबा भाग - ५
भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
आज कोअर झोनची सफारी. मागील भागात सांगितल्यानुसार , ५ वाजताच उठून सफारी गेट बदलून घेण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी गेलो . तिथे counter वर असलेल्या मैडमनी लगेच पावती दिली , शिवाय photography लेन्सचे पैसे भरले. २५० mm जास्त मोठ्या लेन्स असल्यास २५० रु . भरावे लागतात , फक्त कोअर झोन साठी . हा नियम मला थोडा विचित्र वाटला , पण शासनाचे काही नियम हे असेच आतर्क्य असतात. सफारी जीपवाले लवकरच आले होते . तिसर्या , चौथ्या नंबरवर आमच्या गाड्या होत्या. सुदैवाने आम्हाला कालचाच driver मिळाला , म्हटले चला …. नशीब चांगलाय , आम्ही काल जसे तसेच बसलो , कालच्या लकी सीटवर . उगाच कालच्या लकी setup मध्ये काही बदल नको . बरोबर ६.३० वाजता आम्ही आंत शिरलो. गाईडच्या सल्ल्यानुसार गाड्या वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागल्या . जसजसे आतमध्ये जाऊ लागलो तसतसा एक बदल जाणवला , बफरच्या मानाने जंगल कमी घनदाट होतं . थोडं आश्चर्यच वाटलं . जास्त मोकळं , गवताळ आणि वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवणारं .
थोड्याच वेळांत , गाईडने गाडी थांबवायला सांगितली , "बघा , वाघाच्या पायाचे ठसे . ताजेच दिसतायत , म्हणजे नुकताच इकडुन गेलेला दिसतोय."
लगेच आम्ही त्याच्या मागावर निघालो , गाईडच्या त्याच्या अनुभवाने संभाव्य ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली . वाघाच्या मागावर असतांना वाटेत आम्हाला बऱ्याच प्राणी , पक्षांनी दर्शन दिले.
जवळजवळ ३ तास , २५ - ३० किमी फिरलो जंगलात . वाटेत भेटलेल्या सगळ्यांच म्हणणं एकच , "नाही " . गाईडच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त ८. ३० पर्यंतच वाघ दिसण्याचा चान्स असतो . आता ९.३० वाजत आले होते . आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो आणि १० पर्यंत बाहेर आलों . ठीक आहे , अजून दुपारची एक सफारी बाकी होती.
दुपारी पुन्हा एकदा दुप्पट उत्साहाने आम्ही आमच्या शेवटच्या सफारीवर निघालो . मनोमन प्रार्थना करत होतो " देवा , शेवटची सफारी आज , दिसू दे परत आज वाघ ."
प्रवेश केल्याकेल्या मुंगुसाने दर्शन दिले . "नशीब चांगलंय आज ." - इति गाईड. चला सुरुवात तर चांगली झाली.
थोडं पुढे आलों , तर रानगवा अगदी पोझ देऊन उभा , मग केलं त्याचं फोटो शूटिंग.
तिथूनच पुढे हे…
आणि हा front/ side view
एका crossing वर दुसऱ्या एका जीपमधला गाईड म्हणाला "सोनम आताच क्रॉस झाली आणि इकडच्या झाडीत गेलीये , पुढुन बाहेर पडेल . " सोनम म्हणजे माधुरीची मुलगी , आमच्या जीपमध्ये एकदम उत्साहाचे वारे संचारले . गाईड म्हणाला मागे जावे लागेल , पण हा oneway आहे , मग काय driver ने reverse मध्ये गाडी चालवायला सुरुवात केली . आम्हाला म्हणाला "नीट पकडुन बसा . " आणि अक्षरश: ४० च्या स्पीड ने त्याने reverse गाडी मारली . तेव्हा खरंच वाटलं आपण रोहित शेट्टीचा सिनेमा बघतोय , नाही …. प्रत्यक्ष अनुभवतोय . कल्पना करा , जंगलातल्या खडबडीत रस्ता कसल्या , वाटेवरून तो अशी गाडी चालवतोय . सलाम त्या driver च्या कौशल्याला . हा थरार अनुभवायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं . साधारण ५ मिनिटात आम्ही विविक्षित स्थळी पोहोचलो . अधुनमधून चितळ , माकडांचे call ऐकू येत होते . आम्ही अगदी चिडीचूप बसलो होतो . ह्यावेळेस मी ३०० mm लेन्स लावाली होती कॅमेराला . १० मिनिटं झाली , काहीच हालचाल नाही . होताहोता १५ -२० मिनिटं झाली , आणि काटक्या मोडल्यांचा आवाज आला . आम्ही डोळ्यांत प्राण आणुन त्या दिशेला बघू लागलो . पण …. काहीच घडले नाही . सोनमने आम्हाला हुलकावणी दिली होती . आम्ही थोडसं निराशच झालो , आणि तिथून निघालो . दरम्यान मला Green Bee Eater (वेडा राघू ) चे काही छान shots मिळाले . कालपासुन मी प्रयत्न करत होतो , पण मनासारखे नव्हते येत फोटो .
पुढे आलों , एका पाणथळी जागेजवळ हा दिसला , जाणकारांनी नांव सांगावे ,
आणि शेवटी हे मजेत बागडणारे हरणाचे पाडस .....
सगळ्यांना निरोप देऊन आम्ही बाहेर आलो , तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता . उद्या सकाळीच निघणार आम्ही इकडून , मनोमन सगळ्या जंगलाचे आभार मानले खास करुन माधुरीचे . तिने आमची ट्रीप सफल केली होती .
सकाळी आवरुन , नाष्टा करून ९.०० वाजता आम्ही ताडोबाचा निरोप घेतला आणि औरंगाबादच्या दिशेने कुंच केलं .
आमच्यासगळ्या प्रवासांत हा सगळ्यांत मोठा पल्ला , लाडांच्या कारंजाला जेवणाचा ब्रेक घेऊन साधारण ८.०० वाजता आम्ही औरंगाबादला आमच्या हॉटेल वर आलो . I must say , सिंदखेड राजा ते जालना हा संपूर्ण प्रवासातला worst रस्ता होता . अक्षरश: रस्त्याची चाळण झाली होती . नाहीतर आम्ही निदान १-१.५ तास आधीच पोहोचलो असतो . असो .
दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात उठलो , आज काही घाई नव्हती . चेक आउट करून, उशीराच Brunch करुन बिवी का मक़बरा बघायला आलो. मुलांनी ताज महाल बघितला असल्यामुळे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडला , "हा तर ताज महाल सारखाच आहे . " आम्हालाही प्रथम दर्शनी तसेच वाटले . पण नाही , खूप फरक आहे.
आणि आता हा ताज चा फोटो पहा , आमच्या आग्रा ट्रीप मध्ये काढलेला
फरक लगेच लक्षात येईल तुमच्या , शिवाय ताज सारखा हा संपूर्ण संगमरवरात बनवलेला नाही . असो. एक दीड तास इथे आणि नंतर पनचक्कि परिसरात घालवल्यानंतर आम्ही पुणे रस्त्याला लागलो . वाटेत अहमदनगरला Cavalry Tank Museum ला भेट दिली . आशिया खंडामधले एकमेव असलेले ह्या संग्रहालयात ५० पेक्षा जास्त तोफा , रणगाडे आणि इतर युद्धात उपयोगी पडणाऱ्या गाड्या ठेवल्या आहेत . अगदी पहिल्या विश्वयुद्ध पासून ते १९७१ च्या भारत पाक युद्धा पर्यंत .
एक झलक
तिथुन निघून आम्ही ८.०० वाजेपर्यंत पुण्याला घरी पोहोचलो. पुन्हा एकदा माणसांच्या गर्दीत आणि कॉंक्रीटच्या जंगलांत . नेहेमीप्रमाणेच याही ट्रीपने बरंच काही शिकवलं . मुख्य म्हणजे निसर्गात राहायला , Wifi/इंटरनेट शिवाय राहायला शिकवलं . अशीही १६०० किमी प्रवासाची , व्याघ्र दर्शनाची कहाणी सफळ संपूर्ण .
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढला.
समाप्त.
वाचने
7697
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
अरे अरे... दिसला असता वाघ
वा वा!मस्तच!
छान झाली लेखमाला!
मस्त झाली सफारी
धन्यवाद साहेब
मस्त झाली हि मालिका
लेखमाला आवडली.
आवडले. दोनदा ताडोबाला गेलेलो
वाघोबा at ताडोबा
जंगल सफारी बद्दल वाचून छान
आम्हालाही सफारी घडवलीत