नुसतेच शब्द सारे.. गाभा मुळी कळेना..
स्वतःस प्रश्न केला.. रचना कशी असावी?
होता जरी जरासा.. अर्थ, अडकलेला..
तरीही मनांत म्हटले.. रचना अशी असावी?
मजला तरी कळावी, मम भावना मनीची..
आशय जिथे गमेना.. रचना तशी नसावी..
सहज-सुगम्य भाषा.. विषया धरून यावी..
बोजड कशास व्हावे.. रचना तशी असावी..
फुलती सहज जैसे ऋतुरंग आसमंती..
अर्थास शब्द यावे.. रचना तशीच व्हावी..
आशय थेट यावा अन् अंतरी भिडावा..
जन्मून सार्थ व्हावी.. रचना तशी असावी.
राघव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2305
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख रचना.
वाह.... राघवजी!!
सुरेख कविता!
तुमचे प्रतिसाद बघून आनंद झाला
@आशय थेट यावा अन् अंतरी
रचना आवडली.
Mast
वाह, मस्तच ! वस्तुपाठच घालून
रचना कशी असावी...?
पुनःश्च आभार!
आवडली.