माझ्याच श्वासांनी
चविली जीभ माझी आज माझ्याच दातांनी
कापली बोटे माझी आज माझ्याच हातांनी -
जायचे होते कुठे? भरकटलो मी कुठे?
आणले कुठे मला आज माझ्याच पायांनी
यातना दिल्या ना कधी मी कुणाला
ऐकवले काय आज हे मला माझ्याच कानांनी
तेच झाले परके, समजले होते ज्यांना आपले
फसविले आज मला माझ्याच लोचनांनी
जगलो मी खरा यांनाच जगविण्यासाठी
मलाच मारायचे योजिले या सार्यांनी
सारेच बेईमान झाले, इमान आपले विकुनी
घेतला जीव माझा आज माझ्याच श्वासांनी
वाचने
2114
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मस्त
खुप छान....
सुन्दर
छान
_/\_ धन्यवाद सर्वाना
मस्तच
छान.
धन्यवाद _/\_
केवळ अप्रतिम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }तुमच्या ''स्वाक्षरी'' खूप