मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध

अविनाश लोंढे. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुझी गुलाबी मखमल हवीये , मखमलितला गोड मध हवाय अनानामिका ला नको देउस , जोपर्यंत तो अनामिक मी असेन उचकी लागलिय प्रिये ,मोड्लोय पुरता प्रणयी वात्सल्य हवय , हवय आता तुझ्याबिगर असतो मी जेव्हा , दीन दुबळा असतो मी तेव्हा मला तुझ्या प्रेमाची जरुरी नाही , फक्त तुझ्या प्रेमाची खोली हवी घातकी वाटतो दुरावा तुझा तुझ्याशिवाय श्वाश नाही माझा पर्वा नाही मला कुठ्येस तू , फक्त तुझ्याजवळ हवाय मी अन हवाय तुझ्या प्रेमाचा स्वाद , तू माझ्यात न मी तुझ्यात आत नाही का ओढ्नारेस तू मला , इथेच मी , तुझ परिस दे मला हो , तूच मला जगवलय हो, तुच मला सावरलय.... माझे तुटलेले तुकडे , तूच जूळवलेस तुटलेला तोडून जाऊ नकोस मध प्रेमाचा सांडू नकोस असुरक्षित तुझ्याविना ,असतो मी , फक्त तूच, जिच्यासाठी जगतो मी , थोड्या गोडव्याची ,गरज माझ्या जीवाला , तुझ्या प्रेमाच्या मधाची ,आस हृदयाला मला नाही खेळायचा कोणता खेळ , तुझ्यात माझा बसू दे मेळ , तर मनात का तुझ्या कालवाकालव ह्रदयात का तुझ्या हलवाहलव … तुझी गुलाबी मखमल हवीये , मखमलितला गोड मध हवाय अनानामिका ला नको देउस , जोपर्यंत तो अनामिक मी असेन

वाचने 2444 वाचनखूण प्रतिक्रिया 7