मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समता

अविनाश लोंढे. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रियेसी बरोबर गेलो मी तिच्या घरी , पोहोचण्या आधीच होती जातीची दरी 'जात काय ह्याची' - त्यांनी तिला विचारल दलित , सवर्ण - समतेच ज्ञान मी पाझरल [ ते ] अद्भुत तेवर विश्वास आहे आमचा , पण चमत्कार फक्त विसरायचा 'जात' नाही ती 'जात'असते पोरा 'वैरी ' नाही करायचा समाज सारा 'फळा'पुसला कि समानतेलाही इथं पुसतो , 'आंतरजातीय विवाह' सगळ्यांनाच इथं सलतो पण ,जे झालं ते आता 'चार भिंतीत' इथं विसरायचं , अन , आपण 'सगळे समान' असच बाहेर बोलायचं [मी ] ह्या 'सैतानाचा' आता कंटाळा आलाय , ह्या 'ठासण्याचा' आता कंटाळा आलाय ह्या 'व्यापाराचा' आता कंटाळा आलाय फक्त 'फायदाच 'काय तो 'प्राधान्य' झालाय कावराबावरा नाही झालो ,मी तुमच्यामुळे , कावराबावरा नाही झालो ,मी तुमच्या बंदीमुळे कावराबावरा नाही झालो , मी कुणा मुळेच प्रिये , पण सगळा हे होतंय ते स्वार्था मुळेच [माझं मन ] जाती ,धर्मासाठी वरचढ करता कशाला ? माणुसकीची 'शोकयात्रा' मिरवता कशाला ? ही कुजलेली युद्धे खेळता कशाला ? स्वार्थासाठी देशाला 'पुरता' कशाला ? तुमचं रक्त आलाय कुठून अन कशासाठी ? रक्तरंग एक आहे ,नाही माणसाला मारण्यासाठी ? चमकणार हि अंधुक झालेले , बघितलय मी , जातीयतेच्या आणीबाणीत , सडवनार नाही मी , बोलू नका कि माझं बोलण पटतंय तुम्हाला , तुमच्या डोळ्यानेच लाथाडली मळ मला पण ,जे झालं ते इथं आता चार भिंतीत विसरायचं , अन , आपण सगळे समान असच बाहेर बोलायचं ( Apologies for typing mistakes :P )

वाचने 711 वाचनखूण प्रतिक्रिया 2