शब्द
लेखनविषय:
शब्दांच्या दुनियेत शब्दांचा बाजार , शब्दांचे मनोरे शब्दांचेच मिनार
शब्दांनी केले शब्दांना साकार , शब्दांनीच दिला शब्दांना आकार
शब्दांची घरटी , शब्दांचा संसार , शब्दांनीच केला शब्दांचा संहार
शब्दांनी घातला शब्द शब्दांच्या पोटी ,शब्दांची ओहटी.. कधी शब्दांची कोटी
शब्दांचा आभास , निश्वास शब्दांचा , शब्दांचेच प्रेम , दुस्वास शब्दांचा
शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना ,शब्दांचीच मात्रा लागू पडली शब्दांना
शब्दांनीच केले आहेत शब्द व्यक्त ,शब्दांचेच मींधे आहेत शब्द अव्यक्त
भ्रम शब्दांचा शब्दांची माया , शब्दांनीच पालटते शब्दांची काया
शब्द गोड नी कटू शब्द ,शब्द खरे नी खोटे शब्द
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची !
शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द
वाचने
3595
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
फारच 'शब्दाळ'झालीय हो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, दादा !
शब्दांनी शब्द रेखा शब्दांच्या , शब्दांनीच शब्द उणे शब्दांना शब्दांनीच शब्दांची शब्द भरारी ,शब्दांनीच शब्दांची किंमत शब्दांनाशब्दबंबाळ शब्दबंबाळ शब्दबंबाळ :-)
In reply to शब्द बंबाळ by विश्वव्यापी
आलो आलो आलो! :P
In reply to आलो आलो आलो! :P by शब्दबम्बाळ
=) =)
शब्दांना वाहिलेली की शब्दात वाहून गेलेली कविता?
:-/
यावरून एक चारोळी आठवली:
येते तिची आठवण
केली आठवणींची साठवण
साठवूनी आठवण
केली तिची पाठवण!
(ही माझीच आहे - दहावीनंतर कॉलेजच्या सुरुवातीला केलेली!
टीप: यवारून माझ्या तत्कालीन स्थितीविषयी उगीच कसलाही अर्थ लावीत बसू नये!)
;-)
Sandy
In reply to शब्दातीत by चांदणे संदीप
शब्दांचे महत्व सांगणारी कविता ! तुम्ही शब्दांचे अर्थ घट्ट पकडले तर वाहून जाणार नाही . :-)
बाकी प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . लोभ असावा .
चूभूद्याघ्या
:-)
शब्दन शब्द वाचला आणि शब्दन शब्द आवडला!
आवडलीच!!
In reply to शब्दन शब्द वाचला आणि शब्दन by जव्हेरगंज
धन्यवाद सरजी.
निशब्द करून जाणारी कविता!
In reply to निशब्द करून जाणारी कविता! by जातवेद
धन्यवाद :))
शब्दांची किमया आहे ही फक्त शब्दांची !
शब्द ..पुढे , शब्द मध्ये नी मागे ... शब्द
In reply to शब्दांची किमया आहे ही फक्त by पालीचा खंडोबा १
आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप आभारी आहे .
चांगली आहे
नवीन काहीतरी वाचायला मजा आली.
लिहित रहा
पुढिल लिखाणास शुभेच्छा
चांगली आहे!
शब्दांची शाळा!
ही कविता वाचायच्या आधीच दुसर्या लेखावर प्रतिसाद दिला होता! =))
In reply to हाहाहा! by पैसा
पैसा जी,
होतं अस माझे सुद्धा कधी कधी.
:-)
Thanks
Vishvavyapi
शब्दांनीच घातल्या आहेत टोप्या शब्दांना
हे खुप आवडलं.
-दिलीप बिरुटे
(शब्दांच्या टोप्या विकणारा)
In reply to अहाहा. काय संग्रह आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे साहेब,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल खुप आभारी आहे.
आपणांस कविता बरी वाटली हे पाहून आनंद झाला.
Thank you
विश्वव्यापी
जे शब्दात सांगता येत, त्यात सांगण्यासारख काही नसतच !
ह्या ओळी आठवल्या कुठेतरी वाचल्या होत्या मी
In reply to जे शब्दात सांगता येत, त्यात by मयुरMK
काही गोष्टी शब्दांच्या पलिकडे अस्तातही
पण त्याही शब्दांनिच व्यक्त कराव्या लागतात.
फारच 'शब्दाळ'झालीय हो.