अजून काही शब्द......... !!!
लेखनविषय:
शब्द............
रंगतात, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगातून
फुलतात, वीणेच्या सप्तस्वरातून
शब्द, उत्तुंग होतात आकाशाएवढे
आकाशाच्या रंगात मिसळून निळे होतात
शब्द, प्रेमाच्या भाषेत गुलाबीही होतात
शब्द, पुस्तकातल्या मोरपिसासारखे जपलेले
असे शब्द कधीकधी रडतातही
कारण,
माणसांनीच तयार केलेल्या शब्दांनी
एकमेकांना टोचून मारतात माणसे
तेव्हा, शब्दही हमसून हमसून रडतात.....
वाचने
1258
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
कल्पना आवडली.
In reply to कल्पना आवडली by पैसा
सहमत
शब्दांचा हा वेगळा रंग व ढंग फार आवङला
ठीक.
______/\______
कल्पना आवडली