घोस्टहंटर-५
"लेट मी अवेक!"
"नाऊ!!!!"
मनिष झोपेतून दचकून जागा झाला!
'ती!'
"का त्रास देतेय मला?"
"आमचं नातं कधीच संपलं,डेथ व्हॅलीमध्ये!"
"का तिला परत यायचय?"
ह्या विचारासरशी मनिषच्या अंगावर सरसरुन काटा आला!
"अशक्य!!!!!"
-----------------------
"हेलो आर.एम!" मनिषने समोर बसलेल्या व्यक्तीला अभिवादन केले.
"हॅलो सन."ती व्यक्ति म्हणाली.
"मनिष तू इथे येण्यास कारणही जबरदस्त असलं पाहिजे."
"जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यासाठी लोक कुठलीही कारण शोधतील."
"पण तू वेगळा आहेस,मनिष!"
"नाही मी वेगळा नाही."
"हो तू आहेस."
"बरं मला तुमच्या लायब्ररीत एंट्री मिळेल?"
"त्यात फक्त दोन व्यक्तींना एंट्री आहे."
"कोण?" मनिषने विचारले.
"मनिष आणि आर.एम!"
मनिष हसला आणि लायब्ररीच्या दिशेने गेला.
सोंटा लायब्ररी!
जगातील सर्वात मोठी लायब्ररी!
जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची लायब्ररी!
जगातल्या सर्वात यशस्वी घोस्टहंटरची लायब्ररी!
जगातल्या सर्वात यशस्वी घोस्टहंटरच्या पिढ्यांनी बनवलेली लायब्ररी!
मनिष सोंटामध्ये बसला होता.अनेक पुस्तकांमधून त्याला हवे असलेले पुस्तक मिळाले होते.
१७०० साली आरेन यांनी लिहिलेले!
'द केस ऑफ़ ड्रीम्स!'
मनिषने पुस्तक पूर्ण वाचून काढले.
त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
मनिष लायब्ररीच्या बाहेर पडला.
आर.एम.त्याची वाट पहात उभे होते.
"उत्तरे मिळालीत?"
"हो!"
मनिष बाहेर जायला निघाला तेव्हा आर.एम.म्हणाले,
"अँद्रिआला मारल्यावर मला भेट."
"का?"
"कारण स्कायफॉल जवळ आहे!"
मनिषवर वज्राघात झाला!
तो बाहेर गेला.
----------------------
घरी आल्यावर मनिष सरळ झोपी गेला.
आणि स्वप्नात अँद्रिआच्या राज्यात पोहोचला!
"मनिष!"
"मला तू नको आहेस"
"मग कोण हवं आहे तुला?"
"अँद्रिआ!!"
क्षणार्धात ती स्त्री अदृश्य झाली!
आणि समोर 'ती' आली.
"अँद्रिआ!!!!"
"मनिष ये ना माझ्यापाशी,"ती म्हणाली.
"तू मला जाळ्यात नाही ओढू शकत."मनिषने प्रत्युत्तर दिले.
"मग कोण तुला जाळ्यात ओढू शकतं?"
"विचार कर!"
"समजल!" ती म्हणाली.
पुढच्याच क्षणी ती अदृश्य झाली.
अँद्रिआ रूप बदलत होती!
मात्र रूप बदलतानाच तिच्या चेहऱ्यावर असंख्य वेदना जाणवू लागल्या.
"अशक्य!" ती ओरडली.
"स्वप्नांच्या जगांपेक्षाही खरं जग स्वप्नवत असतं अँद्रिआ,"मनिष म्हणाला!
"पण ती..........."
आणि पुढच्याच क्षणी अँद्रिआचा अंत झाला!!!!!!!!
मनिषला जाग आली!
"ग्रेग!" तो पुटपुटला आणि घराच्या बाहेर धावला.
----------------------
"पण ती कोण होती, जिच रूप घेतांनाच अँद्रिआचा अंत झाला?" ग्रेगने विचारले.
मनिष उभा राहिला!
"ग्रेग, स्कायफॉल जवळ आहे!"
हे शब्द उच्चारुन तो बाहेर पडला!
----------------------
क्रमशः
(पुढील भागात 'पायरेट ऑफ़ द अरेबिक सी' आणि 'ती' कोण होती?
वाचने
13370
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
संपादक!
घोस्टहंटर-४
घोस्टहंटर-४
कडक
भारी!
धँस मंडळी!
झकास
धँस समीरभाऊ
हाही भाग मस्तं!
झक्कास आहे
झक्कास आहे
झक्कास आहे
अँद्रिआच्या कथेचा अंत म्हणून
मस्त!
In reply to मस्त! by अनिरुद्ध.वैद्य
अहो सगळे खुलासे होतील!
बाप्रे !
In reply to बाप्रे ! by सस्नेह
थँक्स स्नेहांकिता!
जबरदस्त..
In reply to जबरदस्त.. by टुकुल
भावा बऱ्याच दिवसांनी दिसलास!
जबराट पुर्वीसारखीच .
काही संदर्भ लागत नाहीत.?
In reply to काही संदर्भ लागत नाहीत.? by विजुभाऊ
ही कथा पूर्णपणे वरीजीनल हय!
मयूर थँक्स
वा!
In reply to वा! by जव्हेरगंज
थँक्स जव्हेरगंज
.
In reply to . by मोगा
मंडळी पुढील भाग टाकला आहे!
पायरेट ऑफ़ द अरेबिया - १