मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आटपाट नगरात......

भानिम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आटपाट नगरात  जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात  आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात आटपाट नगरात  माणसे किड्यांसारखी मारतात  आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात आटपाट नगरात  कष्टकरी अन्नाला महाग होतात  आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात आटपाट नगरात  विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात  आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात

वाचने 1173 वाचनखूण प्रतिक्रिया 2