विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत
या चित्रामध्ये दोन अक्षरे "अ" आणि "स" दाखवलेली आहेत. त्यातल्या मधल्या आकृती ह्या अधल्यामधल्या अवस्था आहेत. मुळातच त्या दोन अक्षरांमध्ये साम्य असल्यामुळे ही चित्रे काढणे मला तितके कठीण गेले नाही. अ च्या उजवीकडे गेलो तर पहिल्या काही दोन निश्चितपणे अ वाटतात. मधली आकृती अर्धवट अ वाटते. तसंच स पासून डावीकडे गेलो तर होते पण मधली आकृती अर्धवट स वाटते. बहुतेकांना यात तीन अ, तीन स व एक त्यामधले काहीतरी असे दिसते. (काही लोक तीन अ व चार स म्हणतील) इथे डावीकडून उजवीकडे "अ"पण हळू हळू कमी झालेले आहे व "स"पण वाढलेले आहे या क्रमिक स्वरूपात मांडल्या आहेत. जर तुम्हाला मी या आकृत्या या क्रमाने न दाखवता मधूनच उचलून एक एक करून दिली असती तर तुम्हाला हे लक्षात आला असते का? तुम्हाला हो असे खात्रीने वाटत असेल तर इतर अक्षरे झाकून फक्त डावीकडून दुसर्या अक्षराकडे पहा व म्हणा "हा थोडासा स आहे" (१/६ स +५/६ अ)- तुमचे मन त्याला हे बरोबर नाही असे म्हणेल. आपण प्रत्येक आकृतीसाठी आपण अ आहे का? स आहे का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी डिजिटल उत्तरे शोधतो. आणि त्यांचे दोन गठ्ठे करून ते दोन खोक्यात भरतो. या खोक्यांच्या द्वारे विचार केल्यामुळे आपल्याला हळुवार फरक दिसत नाही.
या खोक्यांमधून आपण जेव्हा सजीवांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या आसपास दिसणारे कुत्रा, मांजर, गायी, बैल, हत्ती, वनस्पती असतात. किडे-मुंग्यांनाही आपण सजीव म्हणतो. पण हे झाले आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सृष्टीबद्दल. जीवाणू सजीव आहेत का? अमीबा सजीव आहे का? अमीबा निदान एक पेशी तरी आहे - आणि आपल्याला माहीत असते की इतर सजीवही पेशींनी बनलेले असतात. मग निव्वळ काही हजार अणूंचा समूह असलेल्या विषाणूंचे काय? त्यांना आपण सजीव म्हणावे का? त्यांना सजीव म्हटले तर पंचाइत येते, कारण प्रयोगशाळेत असे विषाणू तयार केले गेले आहेत. ते जर योग्य पेशींमध्ये सोडले तर आपल्या प्रतिकृती तयार करतात - म्हणजेच सजीवांप्रमाणे कार्य करतात. मग सचेतन आणि अचेतनात नक्की फरक काय?
माणूस-कुत्रा वगैरेंसारखे बुद्धिमान जीव, किडे-मुंग्यांसारखे काहीसे यांत्रिक जीव, वनस्पतींसारखे मेंदूही नसलेले जीव, ऑक्सिजनशिवाय जगणारे जीव अशा सर्व सजीवांना सामावून घेऊ शकेल अशी नक्की व्याख्या काय? हालचाल करणे, श्वास घेणे, विचार करणे, पाहाणे या सजीवांच्या क्रिया असतात. पण यातले नक्की एक काहीतरी बोट ठेवून खात्रीने म्हणता येत नाही की हे सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण. हालचाल यंत्र करतात, काही सजीव श्वासोच्छ्वास करत नाहीत, अनेक सजीवांना अवयव नसतात. पण एक गोष्ट सर्व सजीव निश्चित करतात. ती म्हणजे पुनरुत्पादन. अनुकुल परिस्थिती मिळाली तर परिसरातून कच्चा माल मिळवून आपल्यासारखीच दुसरी प्रतिकृती करण्याची क्षमता असणाऱ्यांना आपण सजीव म्हणतो. पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
एकदा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले की मग आपल्याला अचेतन आणि सचेतन यांच्यातली दरी नाहीशी करता येते. कारण या प्रकारचे 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते. उदाहरणार्थ मीठ. मीठाचा एक रेणू म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे एकमेकांना चिकटलेले अणू. जेव्हा मिठाचे द्रावण सुकते, तसतसे सोडियम आणि क्लोरीनचे पाण्यात विरघळलेले आयन एकत्र येतात. इतर तसेच आयन त्यांना चिकटत जातात. आणि हळूहळू मिठाचा स्फटिक वाढत जातो. याला अर्थातच आपण रूढ अर्थाने पुनरुत्पादन म्हणणार नाही. कारण नवीन तयार झालेली प्रतिकृती तिथेच चिकटून राहाते. आणि ती नवीन प्रतिकृती तयार करते.
म्हणजे मिठाला मेंदू आहे, आणि ते ठरवून तशा प्रतिकृती तयार करते असा अर्थ नाही. किंबहुना पुनरुत्पादनाची ही अत्यंत सोपी, जुजबी अवस्था आहे. मिठाऐवजी आपल्याला जर वेगळ्या प्रकारच्या रेणूची कल्पना करता येईल. यात, प्रतिकृती तयार झाल्यावर ती मूळ 'पालका'पासून सुटी होते. आता बाहेरचे रेणू घेऊन हे दोन्ही रेणू प्रतिकृती तयार करू शकतात. आता एकाचे दोन, दोनाचे चार असे करत संपूर्ण क्षेत्र त्याच रेणूने व्यापले जाऊ शकेल. आता काही कारणाने या रेणूंभोवती एक साधंसे कवचसदृश काही तयार झालं, तर आपल्याला पहिली जुजबी पेशी मिळेल. ही प्रक्रिया जर काही कारणाने अधिकाधिक क्लिष्ट झाली तर आपल्याला सजीव आणि निर्जीव; सचेतन आणि अचेतन अशी काळ्यापांढऱ्या स्वरूपाची विभागणी टाळून अचेतनाच्या अ पासून ते सचेतनाच्या स पर्यंत चढत्या भाजणीने जाणारी मालिका दिसेल. आणि मग आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास होऊ शकतो ही कल्पनातरी करता येईल.
थोडक्यात, ज्या संकल्पनांचा विचार आपण "असते/नसते" अशा काळ्या पांढऱ्या स्वरूपात करतो त्या बऱ्याच वेळा मधल्या अवस्थांना नाव न दिल्याने आपण या किंवा त्या खोक्यात टाकलेल्या असतात. हे चुकीचे आहे असे नाही - कारण तशी वर्गवारी करणे उपयुक्त असते. फक्त आपण ते करतो आहोत याचे भान विसरता कामा नये. कारण जेव्हा एका स्थितीचा दुसऱ्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्या मधल्या अवस्थांचाच विचार करावा लागतो. साध्या रेणूंपासून ते विचार करणाऱ्या जीवांपर्यंतचा प्रवास बघायचा असेल, तर मधल्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात.
"जडतेला मना मनाचा पोत" कसा आला हे पाहायचा असेल तर... "अ"चेतनाचा "स"चेतन कसा झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला हे निरुपयोगी खोके तोडून टाकले पाहिजेत व खोक्याच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे.
(मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)In reply to जसजशी मालिका पुढे जात आहे by संदीप डांगे
In reply to उत्क्रांतीची संकल्पना समजावून by राजेश घासकडवी
In reply to जसजशी मालिका पुढे जात आहे by संदीप डांगे
In reply to पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे ? by विवेक ठाकूर
In reply to उत्क्रांती ज्या अवकाशात होते by म्हसोबा
In reply to अवकाशाचा बोध होण्यासाठी हयात घालवावी लागते by विवेक ठाकूर
अवकाशाचा बोध होण्यासाठी हयात घालवावी लागतेखरं आहे. प्रणाम स्विकारा. __/\__
ते डोळ्यासमोर असून दिसत नाही कारण ज्ञानेंद्रियांचे म्यूटेशन झाल्याशिवाय त्याचा बोध होत नाही. जे लोक माहिती गोळा करण्याच्या मागे आहेत त्यांना अवकाशाचा उलगडा अशक्य आहे.अगदी अगदी. कुठे आपल्यासारखे ज्ञानसंपन्न "स्व" गवसलेले अधिकारी पुरुष आणि कुठे डार्विन आणि डॉकिन्सची पुस्तके वाचून आपल्याला उत्क्रांती कळल्याचा अविर्भाव आणणारे "विदागारी" पुरुष. मृत्यूशय्येवर असताना यांचा डार्विन देवाला शरण गेला होता. उत्क्रांतीच्या बापानेच आपल्या तिला अंतःकाळी वार्यावर सोडले. तीच गत त्या डॉकिन्सची. "नास्तिकांचा शिरोमणी" असा त्याचा उल्लेख त्याचे चमचे करतात. मात्र तोच म्हणतो की "देव अस्तित्वात नाही असे मी ठामपणाने म्हणू शकत नाही".
In reply to शिवाय तुम्ही आत्मा वगैरे भानगडीत पडलात तर ते आणखीच अवघड होईल by विवेक ठाकूर
In reply to विठासर, "मी कोण आहे?" या by म्हसोबा
In reply to शिवाय तुम्ही आत्मा वगैरे भानगडीत पडलात तर ते आणखीच अवघड होईल by विवेक ठाकूर
इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे' अशी जाणिव नसते. त्यामुळेच तर त्यांना `मी नसेन' अशी भीती नसते किंवा मृत्यू ही कल्पना करता येत नाही.वाघ मागे लागल्यावर हरीण का पळते? कोंबडी आपल्या पिलांपासून फार दूर का जात नाही?
In reply to इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे by मार्मिक गोडसे
इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे' अशी जाणिव नसते. त्यामुळेच तर त्यांना `मी नसेन' अशी भीती नसते किंवा मृत्यू ही कल्पना करता येत नाही.ही धारणादेखील एका मध्यपूर्वेतील पंथात आहे खरी. पण तो वेदांतप्रणित धर्म नव्हे.
In reply to अगदी हाच प्रश्न विचारायला आलो by आनन्दा
In reply to सचेतन आणि जडं यातला फरक लेखकाला समजलेला नाही by विवेक ठाकूर
स्वतःचा जीव वाचवणे वगैरे क्रिया आपसूक घडतातस्वतःचा? म्हणजे कोणाचा? प्राण्यांमध्ये स्वतःचा जीव वाचवायचा इन्नेट बिहॅविअर कसा काय आला? कोंबडी आपल्याच पिलांना वाचवायचा का प्रयत्न करते? पक्षी आपल्याच घरट्यात का येतात ?
In reply to स्वतःचा जीव वाचवणे वगैरे by मार्मिक गोडसे
In reply to मस्त प्रश्न ! by विवेक ठाकूर
अवकाशाच्या अथांग पोकळीत निसर्ग आपल्या पुनरावृत्ती, स्थिती आणि लयीची योजना स्वतःच करतो.निसर्ग म्हणजे कोण? असा असमतोल का करतो व समतोल साधण्याचा प्रयत्न 'का' व कोणासाठी केला जातो?
याचं उत्तर कोंबडीच्या माध्यमातून निसर्ग पिल्लं वाचवण्याचा निर्णय घेतो.ही कोंबडी मृत पावल्यास दुसरी कोंबडी त्या अनाथ पिलांचे स्वतःहून संगोपन का करत नाही? ही पिल्लं मरणार असतील तर त्यांना जन्मालाच 'का' घातले जाते?
`सध्या आपला श्वास का चालू आहे? ' तर निसर्गाला या क्षणी त्या देहाची गरज आहे म्हणून !श्वासाचा देहाशी काय संबंध? श्वास न घेताही काही प्राणी जगतातच की.
In reply to मस्त उत्तर by मार्मिक गोडसे
In reply to पुन्हा उत्तम प्रश्न ! by विवेक ठाकूर
जीव कसा जातो याचं उत्तर सापडलं की वरच्या प्रश्नाचं उत्तर देता येईलहेवन रिटर्न व्यक्तीला ह्याचे उत्तर माहीत नसेल ह्यावर माझा विश्वास बसत नाही.
श्वास दिर्घ काळ बंद केल्यास तो कळेल.तुम्हाला कळला का?
याबाबत पुढील माहिती लेखकाला विचारावी.तुम्हाला इतर जीवांना 'स्व' ची जाणीव व मृत्युची कल्पना नसते ह्याचे ज्ञान आहे मग इथेच का तुमचे ज्ञान अपुरे पडते. अहो ह्या प्रश्नाचे उत्तर एखादा शाळकरी विद्यार्थीही देऊ शकेल. बरोबरच आहे म्हणा एखाद्या अध्यात्मिक विश्वातील जंताला विज्ञानाच्या विश्वातील काय माहीती असणार? आणी हो सदर लेखकाची लेखमाला अजून संपलेली नाही. अर्धवट माहीतीवर शंका काढणे मला योग्य वाटत नाही,लेखमाला संपेपर्यंत मी धीर धरू शकतो.
In reply to जीव कसा जातो याचं उत्तर by मार्मिक गोडसे
In reply to सुरेख! by विवेक ठाकूर
In reply to जंताच्या देहाला श्वासाची गरज by मार्मिक गोडसे
In reply to हां भाग अतिशय आवडला. याबद्दलच by कवितानागेश
तेंव्हा रेणूनचा हां गुण लक्षात आल्यावर खरे तर हे बघायला हवे की असाच गुण अणूंमध्ये दिसतो का? एका प्रकारचा अणू सोबतीसाठी तसाच दूसरा अणू अवकाशात शोधतो का? (सॉरी फॉर कर्तरी प्रयोग! :) )एक अणु याचे उत्तर आहेच की. हे सगळे रेणू एक अणु स्थिर राहत नाही म्हणूनच तर तयार होतात. का? - त्याचे उत्तर त्यांच्या अॅटोमिक वेट मध्ये असते.
In reply to हां भाग अतिशय आवडला. याबद्दलच by कवितानागेश
रेणू ना आपल्यासारखेच इतर रेणू अवति भवति असण्याची गरज का निर्माण होते?गरज शब्द योग्य नाही, कारण त्यात इच्छा, इच्छापूर्ती अध्याहृत आहेत. मात्र मिठाचं उदाहरण पाहिलं त्यात सोडियम आयन आणि क्लोराइड आयन एकत्र येतातच. असे घटक अणू, आयन्स एकत्र येऊन मिठावर मिठाचे थर जमा होतात. आणि मिठाचं उदाहरण अगदी साधं झालं - डीएनए आणि आरएनए हे रेणू रेण्वीय यंत्रं वापरून अक्षरशः स्वतःची कॉपी मॅन्युफॅक्चर करतात. तो प्रचंड भन्नाट विषय आहे.
एका प्रकारचा अणू सोबतीसाठी तसाच दूसरा अणू अवकाशात शोधतो का? (सॉरी फॉर कर्तरी प्रयोग! :) )हो, त्याची उदाहरणंही दिसतात की. आता हायड्रोजनचा अणू हा एकटा सापडत नाही. तो दुसऱ्या हायड्रोजन अणूबरोबर संलग्नच सापडतो.
इतक्या जास्त जास्त प्रमाणात एकसारखे मूलकण एकत्र येउन एक एक अणू सिस्टम तयार का होते?हायड्रोजन आणि हेलियम बिग बॅंगनंतर अगदी थोड्या काळात तयार झाले. मात्र इतर अणू ताऱ्यांमध्ये तयार झाले. अणू म्हणजे शेवटी मूलभूत कणांची एक स्टेबल रचना आहे. ती तयार करायला प्रचंड ऊर्जा लागते. ती ताऱ्यांमध्ये असते.
In reply to अजुनही काहि क्लु लागत नाहिए by अर्धवटराव
'अ' ते 'स' चा प्रवास म्हणजे 'अ' ची फोलपटं उतरुन 'स' रुप धारणे म्हणावं काय? तसं असेल तर 'अ' मधे 'स' अगोदरपासुन होताच. 'स' अवतरायला कुठल्याची क्लीष्ट रासायनीक प्रक्रीयेची गरजच नाहि.बाकी याचा अर्थ कळला नाही. प्रक्रियाच नाही असे म्हणायचे आहे का? तर ते चूक आहे. आणि प्रकिया आहे हे एकदा मान्य केले की ती क्लिष्ट आहे की नाही याला अर्थ नाही. माकडाचा माणूस होणे आणि "अ" चा "स" होणे हे दोन्ही आपला सारखेच क्लिष्ट वाटते का?
In reply to पण मुळात उत्क्रांतीवाद तर हेच by आनन्दा
प्रक्रियाच नाही असे म्हणायचे आहे का?मलाही तोच प्रश्न पडलाय. 'अ' पासुन 'स' एखाद्या प्रक्रियेने निर्माण होत नाहि तर 'स' आगोदरपासुन असतोच, केवळ 'अ'ची सालपटं उतरुन तो दृगोच्चर होतो असं काहिसं वाटतय लेखावरुन.
माकडाचा माणूस होणे आणि "अ" चा "स" होणे हे दोन्ही आपला सारखेच क्लिष्ट वाटते का?'अ' चा 'स' होणे आणि माकडाचा माणुस होणे या भिन्न गोष्टी वाटतात मला. आणि त्या समानार्थी तर अजीबात वाटत नाहित. 'अ->'स'->माकड->माणुस या संपूर्ण प्रवासात सजीवत्व कायम आहे, केवळ शरीर बदलतय असा काहिसा अर्थ वाटतोय लेखाचा.
In reply to नाहि हो by अर्धवटराव
In reply to तसे नाहीये हो. एकदा सगळा by आनन्दा
In reply to माझी अपेक्षा थोडी वेगळी होती by अर्धवटराव
रेणूंच्या संयोगातुन, किंवा कुठल्याही रासायनीक प्रक्रियेतुन फ्री वील कसं उत्क्रांत होतं हे बघायचं होतं.कॉन्शसनेस, स्वची जाणीव, फ्री विल वगैरे विषय फारच पुढचे झाले. एवढ्यात तरी मी त्यांच्यावर चर्चा करू इच्छित नाही. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर काहीही सृष्टी नव्हती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जो सजीव सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रवास झाला त्याचा आढावा घेणं हे या लेखमालेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.
रासायनीक प्रक्रियाच आहे म्हटल कि सर्व काहि पुर्व नियोजीत असल्यासारखं झालं...पूर्वनियोजितपणा बिलकुल नाही. उलट कुठच्या घटना घडतील हे सांगता येत नाही, त्या निसर्गनियमाने घडत राहातात. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जी महाप्रचंड उल्का पृथ्वीवर आपटली - जीमुळे डायनोसॉर्सचा नाश झाला - ती पूर्वनियोजित होती का?
सचेतन आणि अचेतन हे एकाच सामायीक प्रक्रियेचे भाग आहेत म्हटलं तर आध्यात्म काय वेगळं सांगतं हा प्रश्न आला.सामायिक प्रक्रियेचा भाग असं नाही, तर सचेतन आणि अचेतन यांच्यात फक्त रचनेच्या क्लिष्टतेचा फरक आहे. हा बदल कसा घडला याबद्दलच्या प्रक्रियेबद्दल विज्ञान सांगतं.
In reply to रेणूंच्या संयोगातुन, किंवा by राजेश घासकडवी
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जी महाप्रचंड उल्का पृथ्वीवर आपटली - जीमुळे डायनोसॉर्सचा नाश झाला - ती पूर्वनियोजित होती का?जर हा उल्कापात एक भौतीकी-रासायनीक क्रीया असेल तर ति १००% पूर्वनियोजीत होती.
In reply to ती पूर्वनियोजित होती का? by अर्धवटराव
In reply to हे या लेखावर कदाचित अवांतर by राजेश घासकडवी
In reply to मला तेच विचारायचं आहे by अर्धवटराव
एकाच वेळी वस्तुचा वेग आणि जागा शोधुन काढता येत नाहि, पण अॅट एनी गिव्हन टाईम वस्तुचा वेग आणि जागा ठरावीकच असतात ना.त्याचंच उत्तर नाही असं आहे. तुम्ही म्हणता तो ऑब्झर्व्हर इफेक्ट. पण अनसर्टन्टी प्रिन्सिपल हे आपल्या विश्वाचा अविभाज्य भाग आहे. हा विषय खरोखऱच या लेखावर अतिअवांतर आहे. पण इथे https://en.wikipedia.org/wiki/Uncertainty_principle बरीच माहिती सापडेल. It has since become clear, however, that the uncertainty principle is inherent in the properties of all wave-like systems,[7] and that it arises in quantum mechanics simply due to the matter wave nature of all quantum objects. Thus, the uncertainty principle actually states a fundamental property of quantum systems, and is not a statement about the observational success of current technology.
कान्सर्व्हेशन ऑफ एनर्जीच्या मागे जर 'लॉ' आहे तर त्यात रॅण्डमनेस येऊ शकत नाहि.कॉन्झर्व्हेशन ऑफ मास-एनर्जी हे अन्सर्टन्टी प्रिन्सिपलबरोबर जोडल्यावर अनेक चमत्कारिक परिणाम दिसतात. म्हणजे डेल्टा एनर्जी गुणिले डेल्टा टाइम हे विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असू शकत नाहीत. याचा अर्थ डेल्टा टाइम जर पुरेसा लहान असेल तर त्यावेळपुरतं डेल्टा एनर्जी प्रचंड असू शकते. आणि त्याचं मासमध्ये कन्व्हर्जन होऊन आपल्याला दोन अॅंटीपार्टिकल्स जन्मून एकमेकांत विरून गेलेली दिसू शकतात. म्हणून एकंदरीतच प्रेडिक्टेबिलिटी किंवा पूर्वनियोजन या कल्पना फार उपयोगी पडत नाहीत. असो. हा फार गहन विषय आहे. मला जमेल तेव्हा याविषयी लिहिण्याचा विचार आहे. पण यापुढची चर्चा खवमध्ये किंवा व्यनितूनच झालेली बरी.
In reply to एकाच वेळी वस्तुचा वेग आणि by राजेश घासकडवी
In reply to अनसरटेनिटी प्रिंसिपल नक्की by कवितानागेश
ऑब्जर्वर प्रमाणे वॅल्यू बदलेल असे मला वाटतंय, ऑब्जर्वर प्रमाणे नियम बदलणार नाही.+१०००
In reply to अनसरटेनिटी प्रिंसिपल नक्की by कवितानागेश
अनसरटेनिटी प्रिंसिपल नक्की उत्तर देत नसले तरी प्रोबेबिलिटी सांगतच.तुम्ही एखाद्या पार्टिकलचं वेव्ह फंक्शन मांडलंत की त्यातून प्रोबॅबिलिटी सांगता येते. अन्सर्टन्टी प्रिन्सिपलचा प्रोबॅबिलिटीशी संबंध नाही.
आणि ऑब्जर्वर प्रमाणे वॅल्यू बदलेल असे मला वाटतंय, ऑब्जर्वर प्रमाणे नियम बदलणार नाही.हे क्वांटम मेकॅनिक्सचं तत्त्व नसून रिलेटिव्हिटीचं तत्त्व आहे. प्रकाशाचा वेग, मॅक्सवेलची समीकरणं ही कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तीच असतात. मग त्यासाठी वस्तुमान, अंतर आणि काळाच्या किमती बदलतात. पण कुठच्याच घटनांमधला कार्यकारणभाव बदलत नाही.
पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
ते जर योग्य पेशींमध्ये सोडले तर आपल्या प्रतिकृती तयार करतातअर्थात हा विषाणूंबद्दलचा प्रोब्लेम आहे खरा. किंबहुना हे विषाणू मरत पण नाहीत म्हणे. ज्यांना मुळात जीवनच नाही त्यांना कसला आलाय मृत्यू म्हणा? पण हा वादाचा विषय आहे खरा.
In reply to ही दोन विधाने परस्पर विरोधी by आनन्दा
In reply to लेख आवडला. 'चैतन्य' हे 'जडा by एस
In reply to बरोबर. पण नुसतं तेवढंच नाही, by राजेश घासकडवी
सजीव आणि निर्जीव असं द्वैत नाही, अणुरेणूंच्या रचनांचे ते आविष्कार आहेत.जेव्हा आध्यात्म हेच म्हणतं तेव्हा मात्र मान्य होणं कठीण असतं. असो.
In reply to सजीव आणि निर्जीव असं द्वैत by संदीप डांगे
In reply to अद्वैतवादात सांगितलेलं एकपण by राजेश घासकडवी
In reply to अद्वैतवादात सांगितलेलं एकपण by राजेश घासकडवी
Everything should be made as simple as possible, but not simpler. - Einsteinया वाक्याची आठवण होऊ लागली आहे.
In reply to Everything should be made as by sagarpdy
In reply to Everything should be made as by sagarpdy
In reply to आइन्स्टाइनने हे कुठे by राजेश घासकडवी
जसजशी मालिका पुढे जात आहे