तुझ्यासाठी..........
लेखनविषय:
तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही
तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही
अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी
तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो
प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो
हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी
आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला
खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला
आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी
तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी
हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही
तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही
तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी
वाचने
2129
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
सल जाणवतोय चांगलाच. मस्त एकेकेकटाच राव.
भाऊ ड्वले पाणावले!
पुन्हा एकदा मैफिलीला साजेशी कविता! लय भारी!
Sandy
In reply to सुंदर! by चांदणे संदीप
मी काय म्हणतो
एकदा मैफिल जमवुच......
In reply to होउन जाउदे एकदा by एक एकटा एकटाच
अशी मैफल जमवावी किंवा त्यात सहभागी व्हावे असे खूप आधीपासून वाटते आहे पण कधी योग जुळालाच नाही.
मिपावरच किंवा मिपाकरांसोबत बाहेर कुठेही काव्यकट्टा करायला आवडेल.
सध्यातरी पिं.चिं. मध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि संमेलनपूर्व संमेलनात भाग घेणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे! तिथेही कदाचित मिपाकरांपैकी कोणाला भेटता येईल.
Sandy
In reply to +१ by चांदणे संदीप
अस्मादिकांसह बरेच मिपाकर आहेत पिंपरी चिंचवडात. आपले स्वागत आहे.
अजून टोकदार होऊ देत हाच आशय.
दिल का हर घाव भरने लगता है
तेरी आवाज है की मरहम.
-दिलीप बिरुटे
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढल्या वेळेस
नक्की प्रयत्न करीन
आसमंतात भरुन राहिल्या आहेत या आठवणी.....
सगळ्यांचेच मनपुर्वक आभार.......
खूप सुंदर कविता. आवडली.
छान
हे खूप आवड्ले.... खासच ..
तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय
खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय
जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी
सल जाणवतोय चांगलाच. मस्त