चांदणधुळ
लेखनविषय:
चांदणधुळ माळुनी
केसात
आजही तू तशीच
दिसतेस
सोडुनी आलो
कळीला
तरीही टवटवीत
भासतेस !
उल्कापाताचे खडे आजही
जपलेत
कालचे कृष्णमेघ
रूपेरी जाहलेत
तशीच ओढ अजुनी
आहे बरसण्याची
शिशिरगोठल्या ओठी
स्मित टेकविण्याची !
काळात हरवलेली
सय
पुनश्च मिलनाचे
भय
जाळीदार पिंपळपानापरी
हृदयी कोरले
पुन्हा आठवणींचे पुस्तक
जोडले !
वळुनी जातानाची
नजर
हृदयी बंद आहे
अत्तरकुपीपरी
युगे लोटली अनेक
साहवासाची
उर्मी साठवली
उरी !
फिरुनी आलीस तू
सामोरी
मनाची जाहाली
भिंगरी
देऊनी गेलीस बगल
हलकेच
पुन्हा तीच उरी
शिरशिरी !
विजयकुमार.................
01 / 01 / 2009
वाचने
4490
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
वाचताना लय नाही सापडत पण..
कवितेतली वेदना जाणवतेय.
लिहित राहा खंडेराया
सुरेख रचना. शब्दांमधून अंतरीची रुखरुख, सल पोचला आहे.
मस्तच
फिरुनी आलीस तू
सामोरी
मनाची जाहाली
भिंगरी
मस्तच उपमा उपमेय उपमान यमक शब्द्छंद नादब्रम्ह अलंकार वृत्त साऱ्या परीमानांना पुरून उरलेली रचना … मला वाटते पण "देऊनी गेलीस बगल" पेक्षा "मारून गेलीस बगल" जास्त छान वाटले असते …
In reply to फिरुनी आलीस तू by कहर
प्रतीसादाबद्दल धन्यवाद
आहो तो प्रौढ वयातील प्रियकर असे कसे म्हणेल मरून गेलीस वगैरे, कारण नकळत बगल देतात म्हजे अचानक सोडून गेली किंवा जाणे
बगल देतात मारत नाहीत
In reply to प्रतीसादाबद्दल धन्यवाद by पालीचा खंडोबा १
बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच शैलीत आमच्याकडून दोन ओळी
चहाच्या गाळणीतून जेव्हा
चांदण्या गाळल्या
तेव्हा वाळूतून तेल निघाल्याप्रमाणे
उस्फुर्तलास रे खंडेराया
बाळंतीण अधाशासारखी
निहारात होती दर्पण
आणि दूर क्षितिजावर समुद्र
लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया
In reply to बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच by कहर
मस्तच वा वा
In reply to बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच by कहर
आणि दूर क्षितिजावर समुद्र
लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया
In reply to बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच by कहर
लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))
अतोनात ताकद आहे या शब्दांमध्ये.... छानच आहे कविता...
उल्कापाताचे खडे आजही
जपलेत
कालचे कृष्णमेघ
रूपेरी जाहलेत
तशीच ओढ अजुनी
आहे बरसण्याची
शिशिरगोठल्या ओठी
स्मित टेकविण्याची !
कविता आवडली.
काही काही शब्द खूप आवडले, जसे चांदणधू़ळ, शिशिरगोठल्या..
कविता आवडली!
अत्तरकुपीपरी
युगे लोटली अनेक
साहवासाची
उर्मी साठवली
उरी !
.....हे खूप आवड्ले.
या खंडोबाला चॅलेंज नाही
बाय द वे जेजुरी वाचली का हो तुम्ही ?
In reply to मस्त है राव by मारवा
जेजुरी काय आहे ? हल्ली वयोमानाप्रमाणे लक्षात काही रहात नाही.
In reply to मारवा by पालीचा खंडोबा १
जेजुरी.
नाही फार....तरी पण आवडली
आवडली.
कविता आवडली खंडेराया.
चांदणचकवा आठवली कवितेच्या शीर्षकावरून
कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि कविता तुमची नाही, मी या आधी ऑर्कुटवर वाचलेली आहे, हि "पुनश्च हरिओम" यांची कविता आहे, अश्या चोर्या मार्या बंद करा !!!!
In reply to कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि by समीर_happy go lucky
01 / 01 / 2009
In reply to कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि by समीर_happy go lucky
समीर आभार मित्रा
पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.
In reply to कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि by समीर_happy go lucky
आभार मित्रा
पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.
In reply to समीर by पालीचा खंडोबा १
पुनश्च सांगितलेत!
समीर आभार मित्रा
पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.
In reply to समीर आभार मित्रा by पालीचा खंडोबा १
धन्यवाद सर
विजय हे आमचे जुने ओर्कुट मित्र आहेत...त्यांच्या कवितेचे आम्हा ओरकुटकर फ्यान आहोत..
In reply to विजय हे आमचे जुने ओर्कुट by अविनाशकुलकर्णी
प्लस वन
विजय हे आमचे जुने ओर्कुट मित्र आहेत...त्यांच्या कवितेचे ,आम्हि ओरकुटकर फ्यान आहोत..
In reply to विजय हे आमचे जुने ओर्कुट by अविनाशकुलकर्णी
अविनाश काका आभार
पुनश्च मीलनाचे भय - हे काही समजलं नाही. :(
वाचताना लय नाही सापडत पण..