भावंडे
लेखनप्रकार
डॊ. अंजली, आमची फॆमिली फिजिशिअन, अंजली माझी अल्पावधीतचच माझी चांगली मैत्रीण बनली. पुण्यात असताना दरमहिना मी तिच्याकडे खास अर्धातास वेळ काढुन गप्पा मारायला जायचे. बरे असो वा नसो पण दर महिना माझी तिच्या दवाखाण्याची फेरी मात्र मैत्री खातर तरी होत असे. एके दिवशी अशाच गप्पा रंगल्या, ती दुस-यांदा गर्भवती असल्याची गुड न्युज तीने दिली, पण तिने त्यामागचे कारण सांगितल्यावर मला हलकासा मानसिक धक्का बसला.
ती सांगत होती तिचा मुलगा आर्चिस साधारण ८ वर्षाचा आहे, त्याने त्याला लहान बहिण हवी असा हट्ट धरला होता, ६/७ महिने तो सतत तिच्या आणि तिच्या नव-यापाशी मी एकटा घरात कंटाळतो, माझ्या मित्रांना सगळ्यांना बहिण नाही तर भाऊ आहे मग मलाच का नाही, मला ही माझ्या बहिण/भावा बरोबर खेळायचे आहे, मला ही दादा बनायचे आहे, हे बोलु लागला होता. सुरूवातीला अंजलीला वाटले नविनच खुळ डोक्यात शिरले आहे, १/२ महिन्यात आपोआप ह्या गोष्टीचा त्याला विसर पडेल, पण त्याच्या हट्ट दिवसें दिवस वाढतच चालला, सतत घरात मी कसा बोर होत आहे, हे ते सांगु लागला, आणी जर घरात आता माझ्या बरोबर माझे भाऊ/बहिण असते तर मी कशा प्रकारे येणा-या भाऊ /बहिणीशी खेळेन, बाळाला कसे सांभाळेन ह्याच्यावरच तो जास्त बोलु लागला. मग अंजली आणि तीच्या नव-याने आर्चिसला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला की तुला सख्ये नसली तरी मामे, आत्ये,चुलत भाऊ/बहिण आहेतच.
तरी तो ऐकण्याच्या पलिकडे गेला होता, आता तर त्याने मला छोटी बहिण (स्पेसिफिक बहिणच) हवी आहे, नाही तर मी जेवणार नाही असे ही हट्ट करू लागला. तेव्हा अंजलीने त्याला प्रामिस केले की, त्याच्यासाठी घरात भावंड येईल, पण बहिण किंवा भाऊ यापैकी जे भावंड घरात येईल त्यावर मात्र परत हट्ट करायचा नाही की मला बहिण हवी होती आणि भाऊच कसा आला. पण आपल्या ही घरात लहान भावंड येणार हे ऐकल्या पासुन आर्चिसची स्वारी एकदम खुश दिसु लागली. अगदी प्रत्येक गोष्टीत मी त्याच्याशी कसा खेळेण, अभ्यास करेन, कधी रागवेन ह्याचे आराखडे ठरवु लागला.
मी तिला टाटा-बाय करून घरी परतले, आणि माझ्या डोक्यातुन आर्चिसचा विचार जाई ना.
मला माझे लहानपण आठवु लागले, माझ्या भावंडामुळे मला एकटेपणा कधीच जाणवला नाही, माझ्या लहानपणी प्रत्येकाच्या घरी २/३ मुले असायचीच. त्यामुळे कधी कोणाला एकटेपणा जाणवला असे ऐकिव ही नाही. लहानपणी बहिण-भावंडांच्या मा-यामा-या, एकच वस्तु दोघांना हवी असायची, मग मोठे कोण त्याला सर्वदा त्याग करायला लागायचा, आणी लहान असेल त्याची चैन असायची, पण कधी कधी तु अजुन लहान आहेस, असे सांगुन दादा/ताई भाव खाऊन जायचा/ जायची. कोणताही पदार्थ कितीही आवडत असला तरी आपल्या बहिण / भावांना दिल्याशिवाय आपल्या घशातुन घास उतरत नसे, आई-बाबा आपल्यामुळे आपल्या बहिण / भावाला ओरडले तरी आपल्याला ते आवडत नसे, कधी कधी आई-बाबाचा मार बहिण / भावाला पडत असल्यास आपले ही एका बाजुला मुक रडणे चालु असे. एकाला लागले तर त्याची कळ दुस-याला येणारच इतका ओलावा नात्यात असायचा. मोठ्या भावंडाच्या चांगल्या- वाईट सगळ्यांच गोष्टीची जशीच्या तशी कॊपी करणे चालु असायचे. :)
हे झाले लहानपणाचे, पण जसे वयात येऊ लागतो तसे ही आपले जवळचे मित्र-मैत्रीण म्हणुन आपली भावंडे सदैव आपल्या बरोबर असतात. भाऊ मोठा आणी बहिण धाकटी असेल तर भावाला आपल्यावर जास्त जबाबदारी आहे याची जाणिव होते. तर कधी बहिणी- बहिणीच्या अनंत गप्पा चालुच असतात, बहिणीची कळ काढण्यात भावाला मज्जा येत असते, बहिण कधी चिडली, कधी रडवेली झाली की मस्त पैकी कॆडबरी नाहीतर आईस्क्रीम घेऊन भाऊ रुसवा काढुन टाकतो, आणि परत तुझी कळ काढणार नाही, मला काय माहित तु एवढी रडवी असशील असे आणि बोलुन घेतो. :)
पण जेव्हा लग्न हो ऊन बहीण सासरी जाताना तर बहिणी आणि भावाच्या दोघांच्या ही डॊळ्यातील पाणी थांबतच नाही. कधी बहिण माहेर पणाला आली की तीच्यासाठी काय करू आणि काय नको असे भावाला होते, घरात फक्त बहिण म्हणेल तेच होणार असते, बहिण ही भावाच्या पसंती्चे पदार्थ करून, आवडती भेट देऊन आपले प्रेम त्यातुन व्यक्त करत असते. बहिणी- बहिणी असल्यातरी एकमेकींच्या साठी जोरदार खरेदी होते, एकमेकांची मने जपली जातात, रात्र रात्र भर मस्त पैकी गप्पांची मैफिल रंगल्यावर लहाणपणीच्या खोड्या, भांडणे, फजिती, अशा अनेक गोष्टी एकमेकांच्या उकरून काढल्या जातात.
अशी ही भावंडाच्या प्रेमाची शिदोरी लहाणपणा पासुन बरोबर घेऊन आपण फिरत असतो, हे जेव्हा कोणाला भावंडासाठी हट्ट करताना पाहतो तेव्हा आपल्याजवळची प्रेमाने भरलेली शिदोरी अजुन मोठी वाटु लागते. :)
माझी मैत्रीण अंजलीला दुसरा ही मुलगा झाला, तो ७ महिन्याचा आहे, तिचा मोठा मुलगा आर्चिस आता खुपच खुश आहे,त्याच्याशी खेळण्यात दंग आहे.
तर मिपाकरहो, असाच एक किस्सा मी माझ्या लहाणपणीचा सांगणार आहे,
मी लहान असताना रविवारी मोगली ही सिरिअल लागायची त्यावेळी मला ती सिरिअल खुप आवडायची. आमची परिक्षा चालु होती, आणी माझ्या पपांनी मला हे वाचुन ठेव मी नंतर येईन आणि तुझा अभ्यास घेईन असे सांगुन गेले होते, मी पुस्तक जवळ घेऊन, टीव्ही लावुन मोगली पहात बसले होते, भाऊ दोन /तीन वेळा तरी सांगुन गेला होता की अभ्यास कर, पपा येतील, पण मी काही ऐकत नव्हते, आई ही सांगुन दमली, आणि इतक्यात पपा आले, आणि त्यांनी काही न बोलता टीव्ही बंद केला, तसा मला खुप राग आला मी ते पुस्तक दुर फेकुन दिले आणि मी अभ्यास करणार नाही असे सांगितले, ते पुस्तक फेकल्यामुळे माझ्या पपांना खुप राग आला त्यांनी मला ५ आकडे मोजे पर्यत पुस्तक उचल असे सांगितले, तरी मी जागची हलायला तयार नव्हते, भाऊ जवळच उभा होता, तो पपांना सांगु लागला मी पुस्तक उचलतो तुम्ही तिला रागवु नका, पण त्याला पपांनी तु पुस्तक उचलायचे नाही तिनेच ते उचलले पाहिजे असे सांगितले, तरी मी गाल फुगवुन तशीच उभी होते, मग पपांनी हातात पट्टी घेतली तरी मी पुस्तक उचलायला तयार नव्हते, आणि पपा जसे जवळ आले तसा भाऊ माझ्या माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि तीला मारू नका असे पपांना सांगुन रडु लागला, आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले, ते पाहुन माझे पपा हसु लागले.:)
वाचने
11173
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
वा मस्त
मस्त..
छान गं..
छान लेख
In reply to छान लेख by चकली
@)छान खरच
एकाला दुसरा/री
शितल ताई...
ह्रदयस्पर्शी लेख
In reply to ह्रदयस्पर्शी लेख by रेवती
हा, हा, हा!!!!!
In reply to हा, हा, हा!!!!! by पिवळा डांबिस
एकदा
In reply to एकदा by रेवती
मुली नं १च.....
In reply to मुली नं १च..... by बिपिन कार्यकर्ते
अरेच्च्या!
In reply to अरेच्च्या! by रेवती
मग काय!!!
In reply to मुली नं १च..... by बिपिन कार्यकर्ते
1011+
आवडले
वा!!!
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
असा पचका
In reply to असा पचका by अनामिक
...
In reply to वा!!! by बिपिन कार्यकर्ते
सेंटी
छान लेख शीतल.
In reply to छान लेख शीतल. by चतुरंग
मग होऊन जाऊ द्या
खुपच छान
छान
मी
:)
छान
मस्त
भारीच
थोडे वायले
In reply to थोडे वायले by विनायक प्रभू
आमच्याकडेही
In reply to आमच्याकडेही by रेवती
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो !!
In reply to आमच्याकडेही by रेवती
जरा गैरसमज झालाय आपला.
In reply to जरा गैरसमज झालाय आपला. by रेवती
दोन मिनिट
लेख
छान
धन्यवाद !
लेख खुप आवडला
सुंदर
खूपच छान लेख!
फर्मास लेख!
छान
भावंडे
छान
>>खुप छान
शितल.. खूप
दुसरे भावंडं!
मोठी बहिण...