विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी
ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी वरील चित्राकडे पाहा. चित्राच्या पहिल्या भागात सध्या चालू असलेले चक्र दाखवलेले आहे. कोंबडीपासून अंडे बनते, अंड्यातून पिलू बाहेर येते, ते वाढून कोंबडी होते, आणि ती कोंबडी अंडे देते. चित्राच्या दुसऱ्या भागात हेच चक्र शतकानुशतके, युगानुयुगे चालू असलेले दाखवले आहे. डावीकडून उजवीकडे जसजसे जातो, तसतसा काळ पुढे जातो. आणि प्रत्येक चक्र म्हणजे एक पिढी अशी कल्पना केलेली आहे. जर या चक्रात बदल होणारच नाही, होतच नाही, आणि पूर्वापारपासून अव्याहतपणे ते तसंच चालू आहे असे गृहित धरले तर दुसऱ्या चित्राप्रमाणे अनादी अनंत काळाचा भास होतो. हेच कोंबडी आधी की अंडे आधी या कोड्याचे सार आहे.
मात्र तिसऱ्या भागाकडे बघितले की खरी परिस्थिती डोळ्यासमोर आणता येते. सर्वात आधी एकपेशीय जीव होते. ते सरळसरळ पेशीविभाजनाने पुनरुत्पादन करत असत. त्यामुळे इथे चक्राचा प्रश्नच नाही. त्यानंतर द्विपेशीय आणि नंतर हळूहळू अनेकपेशीय जीव आले. त्यांचेही पुनरुत्पादन जसेच्या तसे होत असावे. त्यामुळे तिथेही चक्राचा प्रश्न नाही. जसजसे जीव अनेकपेशीय झाले, तसतसे त्यांच्या पेशींचे समूह विशिष्ट कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करू लागले. म्हणजे अवयव निर्माण झाले. त्यातला एक अवयव म्हणजे गर्भाशय. म्हणजे पुनरुत्पादनातून निर्माण होणारा जीव हा संपूर्णपणे वाढलेला नसून जन्माला आल्यानंतर वाढून मग पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेवर आला. या पातळीवर कुठेतरी या चक्राला हळुवार सुरूवात झाली. कारण 'आधी कोंबडी की आधी अंडे?' हा प्रश्न 'आधी प्राणी की आधी अर्भक?' या स्वरूपात विचारता येऊ शकतो. याच सुमाराला कुठेतरी लैंगिक पुनरुत्पादनालाही सुरूवात झाली. नवजात जिवाला जन्म घालण्यात नर आणि मादी असे शुक्राणू आणि अंडंबीज पुरवणारे दोन भाग एकाच प्रजातीमध्ये दिसायला लागले. मग जीव जन्मण्याच्या आणि वाढण्याच्या प्रक्रियेचे गर्भाशयात घडणाऱ्या प्रक्रिया, आणि गर्भाशयाबाहेर घडणारी वाढ असे भाग व्हायला लागले. म्हणजे आपल्याला दिसणारे चक्र हे अधिकाधिक मोठे व्हायला लागले. काही प्रजातींमध्ये बाहेर येणाऱ्या गर्भावर ते काही काळ टिकून राहावे यासाठी कदाचित आवरण तयार झाले असेल. हे आवरण जसजसे कठीण होत गेले, तसतसे गर्भाशयातल्या प्रक्रिया गर्भाशयाबाहेर, या आवरणाच्या आत अधिकाधिक प्रमाणात व्हायला लागल्या. आणि त्याचे एका टोकाचे स्वरूप कोंबडीमध्ये दिसते. कोंबडीच्या पिलाची वाढ ही एकाच मोठ्या अंडंपेशीपासून ते पिलापर्यंत ही गर्भाशयाबाहेर, अंड्याच्या आत होऊ लागली. गरज असते ती फक्त विशिष्ट तापमान राखण्याची.
दुसऱ्या पद्धतीनेही याचा आपल्याला विचार करता येतो. कुठचीही कोंबडी असली तरी तिला आई असतेच. आता एका प्रचंड मैदानावर एक रेष आखू. ही काळरेषा. तिच्या सर्वात उजव्या टोकावर आजची एक कोंबडी ठेवली. तिच्या डाव्या बाजूला एक मीटरवर तिची आई कोंबडी ठेवली. तिच्या डाव्या बाजूला एक मीटरवर तिची आई.... असे करत करत गेलो तर आपल्याला काय दिसेल? जसजसे डाव्या बाजूला जाऊ तसतसे आपण काळात मागे जाऊ. मीटरला एक पिढी या दराने. आता कुठच्याही कोंबडीकडे बघितले तरी ती गुणधर्मांनी जवळपास तिच्या आईसारखीच असेल. कारण उत्क्रांतीचे बदल हे एखाद-दोन पिढ्यांत दिसून येत नाहीत. त्यामुळे तुम्ही आजची कोंबडी बघितली आणि डावीकडे एक किलोमीटर चालत हजार पिढ्या मागे गेलात तरी तुम्हाला त्यांच्यात फरक दिसणार नाही. दोन्ही प्राण्यांना तुम्ही कोंबडीच म्हणाल. मात्र लाखभर पिढ्यांचा फरक केलात निश्चितच त्यांच्यात फरक जाणवेल. कदाचित त्यांचा आकार वेगळा असेल, कदाचित आधीच्या कोंबड्यांची अंडी लहान असतील, कमी कडक असतील... पाचदहा लाख पिढ्या मागे गेलात तर कदाचित इतका प्रचंड फरक जाणवेल की हा प्राणी तुम्हाला कोंबडी म्हणून ओळखू येईल की नाही सांगता येणार नाही. पण गंमत अशी की त्या पाच लाखाव्या आजीच्या आसपासच्या 'कोंबड्या' जवळपास हुबेहुब तिच्यासारख्याच दिसतील. कारण हा घडणारा बदल हजारो पिढ्यांमध्ये, हळूहळू होतो. जर तुम्ही काही कोटी पिढ्या मागे गेलात दिसणारा प्राणी हा इतका वेगळा असेल की त्याला कदाचित पक्षी म्हणता येणार नाही. कदाचित तो अंडे घालत नसेल. अजून अनेक कोटी पिढ्या मागे गेलात तर काही पेशींचा अवयव नसलेला गोळा दिसेल. त्याही मागे मागे सुमारे पन्नासेक कोटी वर्षे गेलात तर दोनचार पेशींचा समूह असेल. आणि पुरेसे मागे गेले तर त्या रांगेत एकपेशीय जीव सापडतील. अशा रीतीने हे कोडे पद्धतशीरपणे सुटते. यासाठी उत्क्रांतीद्वारे हळुहळू होणारा बदल लक्षात घ्यावा लागतो.
या कोड्याची मेख 'खूप मोठे' आणि 'अनादी-अनंत' यामधल्या फरकात आहे. आपल्याला सर्वसाधारण जीवनात दिसणाऱ्या गोष्टी या मर्यादित काळाच्या आणि मर्यादित आकाराच्या असतात. आपल्याला ज्या कोंबड्या माहीत आहेत, त्या आपल्या वडलांना, आजोबांना दिसणाऱ्या कोंबड्यांसारख्याच असतात. कोंबडी-अंडे-कोंबडी या चक्रात गेल्या काही शतकांत बदल झालेला नाही. काळाच्या रेषेवर उभ्या केलेल्या या कोंबड्यांकडे आपल्याला काहीशे मीटरपलिकडच्या कोंबड्या दिसत नाही. त्यामुळे साहजिकच आपल्याला यात बदल होऊ शकतो याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे 'खूप मोठा काळ' आपण मागे वाढवून 'अनादी काळ' मनातल्या मनात आपोआप बनवतो. काळाच्या महाप्रचंड पसरलेल्या आवाक्यात आपले स्थान टिचभर आहे. त्याच्या लहानशा भागाकडे - शंभर दोनशे वर्षांकडे - पाहून आपण जे निष्कर्ष काढतो ते मोठ्या काळाच्या - कोट्यवधी वर्षांच्या - पातळीवर लागू ठरतातच असे नाही. हे एकदा मान्य केले की हे कोडे सहज सुटते.
(मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)In reply to इतक्या गृहितकांवर तर अजून असले दोनशे लेख पाडता येतील by विवेक ठाकूर
In reply to इतक्या गृहितकांवर तर अजून असले दोनशे लेख पाडता येतील by विवेक ठाकूर
In reply to आपण वारंवार दाखवलेल्या by राजेश घासकडवी
In reply to पहिल्या पायरीलाच घोळ आहे by विवेक ठाकूर
हा लेख फालतू आहे, एक अक्षर कळत नाही, निर्मिती कशी झाली हे समजल्याशिवाय कशावरच विश्वास ठेवणार नाही, काल हाच एक भ्रम आहे इतक्या विविध विषयावर तुम्ही कल्ला केलात तर मला सर्वांची उत्तरं माहिती असून देखील काहीही सांगता येणार नाही. ज्यांना लेख उपयोगी वाटतोय त्यांनी `कोंबडी आधी की अंड आधी' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा, उत्क्रांती घडली ही खात्री झाली की अनुषंगिक बदल (आपण कोण आणि कसे झालो याची जाणीव, त्यातून येणारा मानसिक मोकळेपणा) तुमच्या आयुष्यात नक्की घडतील याची मी ग्वाही देतो ज्यांना कळत नाहीये पण कळावंस वाटतय त्यांनी कृपया लेख सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून पुन्हा वाचा, साध्या- सोप्या भाषेत आणि अभ्यासातून लिहिलय, त्यात न समजेलसं काही नाही. ज्यांना निव्वळ तिरकस प्रतिसाद द्यायचेत ते काय साधतायत याची कल्पना नाही त्यामुळे त्यांच्या विषयी मला काहीही म्हणायच नाही.माझं नाही ऐकलं तर संक्षींचं तरी ऐका की.
In reply to संजय क्षीरसागर यांनी दिलेल्या by राजेश घासकडवी
In reply to संजय क्षीरसागर यांनी दिलेल्या by राजेश घासकडवी
In reply to संक्षींकडे उत्तर होती by विवेक ठाकूर
In reply to आणि हा एकच प्रश्न या लेखाचा फोलपणा दाखवेल by विवेक ठाकूर
In reply to पकडे रेहना.... छोडना मत. by संदीप डांगे
In reply to आता त्यांनी उल्लेख केलाच आहे तर ... by विवेक ठाकूर
In reply to आमचा तुम्हाला फुल्ल्ल सपोर्ट by संदीप डांगे
बोलत राहीन मींSSS मींSSS मींSSS
आत्म भ्रमीत रूपायाला २आणे अक्कल कमी!
In reply to आता त्यांनी उल्लेख केलाच आहे तर ... by विवेक ठाकूर
संक्षींचं लेखन स्वानुभवातून होतं त्यामुळे त्यांना प्रश्नांची फिकीर नसायचीयेस्स्स. संजयजी भारी माणूस होते. खरा रसिक अन दिलदार माणूस.
In reply to आणि हा एकच प्रश्न या लेखाचा फोलपणा दाखवेल by विवेक ठाकूर
त्या एकपेशीय जीवात कोंबडी निर्माण करण्याची सूक्ष्म संभावना असायलाच हवी. अन्यथा कोंबडी शून्यातून निर्माण होऊ शकत नाही (हा तुमचाच दावा आहे). आता त्या सूक्ष्मतम बीजाला तुम्ही कोंबडी म्हणणार की अंडे?तुम्ही शब्दांच्या बुडबुड्यांच्या जेस्टाल्टमध्ये अडकलेले आहात. त्यातून बाहेर यावं ही विनंती. काळामध्ये पुरेसं मागे गेलं की सगळेच जीव बदलताना दिसतात. प्रत्येकच प्राण्याच्या बाबतीत वरच्या लेखातल्या कोंबडीसारखं खूप मागे गेलं की त्यांच्या रेषा एकत्र येऊन सामायिक होत जातात. असं काही अब्ज वर्षं मागे गेलं की सगळ्या रेषा एकत्र येतात. तिथे जे एकपेशीय जीव सापडतात ते कोंबड्यांचेच नव्हे, तर हत्ती, व्हेल, कुत्रा, माणूस, आंब्याचं झाड, त्यांवर पडणारी कीड या सर्वांचेच महामहामहा...महपिता आहेत. तेव्हा त्या जीवाला कोंबडी किंवा अंडं म्हणण्याची गरज राहात नाही. त्या प्राण्याला आपण सामायिक पूर्वज म्हणू शकतो. पुढच्या काळात जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून हे जीव त्या जिवापासून उत्क्रांत झाले. ती परिस्थिती वेगळी असती तर वेगळे जीव निर्माण झाले असते.
In reply to त्या एकपेशीय जीवात कोंबडी by राजेश घासकडवी
In reply to @तिथे जे एकपेशीय जीव सापडतात by अत्रुप्त आत्मा
याला अर्ध उत्क्रांत की काय म्हणायच हो घासकडवी?अर्ध-उत्क्रांत हा थोडा गोंधळाचा शब्द आहे. त्यातून असं सूचित होतं की उत्क्रांती होऊन खरं तर या कप्प्यांमधलं काहीतरी तयार व्हायला हवं होतं पण चुकून म्हणा किेवा ती प्रक्रिया अर्धवट राहिल्यामुळे मधलंच काहीतरी दिसतं आहे. अशी सदिश नसते उत्क्रांती. बऱ्यापैकी टिकून राहिलेल्या प्रजाती या ज्या प्रजातीपासून उत्क्रांत झालेल्या असतात त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्याइतक्याच टिकून राहाण्यास लायक असतात. प्रत्येक प्रजाती आपापल्या इव्होल्युशनरी निशमध्ये जगत असते. त्यामुळे एखादी प्रजाती जर आपल्याला 'धड हे ना धड ते' अशी वाटत असेल तर दोष आपल्या शब्दमर्यादेचा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जमिनीवर राहाणाऱ्या प्राण्यापासून व्हेल तयार झाला. या बदलातल्या मधल्या अवस्था आपल्याला माहीत आहेत. खालच्या चित्रात त्या दाखवल्या आहेत.
या ज्या मधल्या अवस्था आहेत त्या टिकून राहिल्या नाहीत. किंबहुना पहिला सस्तन प्राणीही आता अस्तित्वात नाही. कदाचित पाण्यातून मिळणारं खाद्य अधिक असल्यामुळे पुढच्या तीनही अवस्था या चढत्या भांजणीत अधिक यशस्वी होत्या. थोडक्यात - हो, मधल्या अवस्था किंवा ट्रांझिशनरी फॉर्म्स आपल्याला दिसतात, पण याचा अर्थ उत्क्रांतीला खऱं तर व्हेलच तयार करायचा होता, पण त्या वाटेवर हे काहीतरी अगम्य जीव तयार झाले असा नाही. पहिला प्राणी बदलून दुसऱ्यासारखा झाला कारण तो तत्कालीन परिस्थितीत जगण्यासाठी अधिक यशस्वी होता. हेच पुढच्या पायऱ्यांनाही लागू होतं.In reply to माणसं खाणाऱ्या झाडांच्या by राजेश घासकडवी
In reply to आपण वारंवार दाखवलेल्या by राजेश घासकडवी
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अत्यंत संयत सूंदर विवेचन. by अत्रुप्त आत्मा
In reply to पुन्हा नवा घोळ! by विवेक ठाकूर
In reply to पुन्हा नवा घोळ! by विवेक ठाकूर
In reply to उत्स्फूर्त निर्मिती. by प्रचेतस
In reply to उत्स्फूर्त निर्मिती. by प्रचेतस
In reply to पुन्हा नवा घोळ! by विवेक ठाकूर
शिवाय तुमच्याच म्हणण्याप्रमाणे शून्यातून काहीच निर्माण होऊ शकत नाही मग हा `सामायिक पूर्वज' कुठून आला ?अहो, हजार शब्दांच्या एकाच लेखातून तुम्हाला सगळी उत्तरं कशी देऊ? जरा धीर धरा, याविषयी येत्या काही लेखांमध्ये चर्चा होईल. 'आमाला आमच्या लायनीपरमानं जाऊ द्या'
In reply to शिवाय तुमच्याच by राजेश घासकडवी
In reply to हजार शब्दांच्या एकाच लेखातून तुम्हाला सगळी उत्तरं कशी देऊ? by विवेक ठाकूर
In reply to अहो उत्तर आधीच दिलंय. तो by राजेश घासकडवी
In reply to मला या सगळ्यातून एक प्रश्न by आनन्दा
In reply to असतात. by साती
In reply to धन्यवाद. by आनन्दा
In reply to असतात. by साती
In reply to लेख आवडला.. by जेपी
In reply to लेखमाला सुंदर चाललेली आहे. by मारवा
प्रतिसाद मनोरंजक व ज्ञानवर्धक दोन्ही टाइपचे आहेत.कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या! ;)
इतक्या गृहितकांवर तर अजून असले दोनशे लेख पाडता येतील