तगमग....
लेखनविषय:
काव्यरस
खरं सांगू हल्ली काही सुचतच नाही
ह्या बोथट मनाला हल्ली काही बोचतच नाही
ह्या शहरात राहून संवेदना झाल्यात बधीर
इथे जो तो नुसतेच फोटो काढायला अधीर
पडणारा कोणीतरी आकांताने हात मागतोय
बघणारा मोबाईलमध्ये त्याचाच फोटो काढतोय
तो पलीकडे लटकतोय… मला काय त्याचे ??
आपण तिथे नाही ना मग आपल्याला काय करायचे ?
तोही कोणाचा कोणीतरी असेल … मग असू देत ….
उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडेल … रडू देत ….
मी माझ्याच कोशात सुरक्षित आहे ना….
मग बाकीच्यांना काहीही करू देत ….
गीतेत वाचलं की शरीर मरतं…आत्मा अमर !
इथे आत्माच मेलाय,फक्त शरीरांची भर
वाचलं ते बरोबर की पाहतोय ते…. काही कळतच नाही
म्हणूनच खरं सांगू मला हल्ली काही सुचतच नाही
वाचने
1407
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
सुंदर लिहिलंय.
वाईट वाटलं
छान कविता
बोचरी तगमग आहे