मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

नाखु · · जे न देखे रवी...
अस्सल (आणि उच्चही) शिवकन्या यांची माफी मागून.. ============================ कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात? थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही! नाचर्या पावसात, कोण रस्त्यात? थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही! चेहरा मनात, कोण आरश्यात? अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही! गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत? लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही! तपत्या उन्हात, कोण उरात? गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही! लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही ====================================== दि ११.१२.२०१५

वाचने 3710 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रचेतस 11/12/2015 - 10:23
एकच नंबर. काव्य गूढार्थाने अगदी परीपूर्ण आहे.

नीलमोहर 11/12/2015 - 10:57
थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही!

सतिश गावडे 11/12/2015 - 20:16
एकदम फ्रेश वाटले बघा वाचून. थोडे हायकूच्या धाटणीचे वाटले काव्य. :)

एक एकटा एकटाच 13/12/2015 - 09:14
मस्तच एकुणच गेलरीच्या बाबतीत प्रत्येकाचे एक विलक्षण निरिक्षण आहे. वाचायला मजा येतेय