आत्मबंध..

अत्रुप्त आत्मा जे न देखे रवी...
होतो अत्रुप्त आत्मा मग आत्म-मुक्त झालो.. आता कळून आले मी आत्मबंध आहे. अतृप्त मूळ माझे आत्मस्वरूप तेच. परी मूळबीज म्हणजे मी आत्म-बंध आहे. आत्मा बदलता-हा अतृप्त वर्तमान! तो भूत काळ त्याचा प्राचीन बंध आहे. मी बदलताच असतो वैविध्य तेच माझे. या जाणिवेत नुकता,,, "तो" आत्मबंध आहे. जाणिव आज झाली बदलून मीच मजला.. त्या जाणिवेत आता मी पूर्ण लिप्त आहे. दिसते स्व रूप त्याचे जगता जरा स्वतःशी! शोधीत जात असता तो एक गंध आहे. आहे असा मी आज असतो असाच नेहमी! ते सत्यरूप असते इतुका स्वबंध आहे. ठरवू कशास मग मी? राहीन-आत्मबंध??? जर मूळरूप त्याचे तैसे सबंध आहे! स्विकार आज याचा केला मी मजं-मतीने पाहू कितीकं टिकतो!? "तो" मुक्त छंद आहे! कळले मलाही काही सांगून टाकले मी.. घेतो रजा जराशी तो मूळ छंद आहे! https://scontent-nrt1-1.xx.fbcdn.net/hphotos-xfp1/v/t1.0-9/12342371_936965349723085_5862105682522929738_n.jpg?oh=7c3a324835df3a34d371ca15b7f5c7cd&oe=56DE5F51
वर्गीकरण
लेखनविषय:

45 टिप्पण्या 9,709 दृश्ये

Comments

प्रचेतस नवीन

अत्रुप्ततेकडून त्रुप्तीकडे होणारी वाटचाल मोठ्या खुबीने मांडण्यात कवी यशस्वी झालाय.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by प्रचेतस

नाम अगदी सार्थ आहे.. प्र-चेतस = चेतवून लावितो जो आग तो! ======================= फट्कागोबा-तवामारात्मबंध http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/frying-pan-smash.gif

शान्तिप्रिय नवीन

छानच कविता गूढ आणि अर्थपूर्ण. गेयताही आहे.

कंजूस नवीन

एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव सतत बदलल्याने ब्रँड होत नाही.त्यापेक्षा "पराग दिवेकर" नाव /आइडी घ्या आणखी एक नवीन आइडी घेऊन इतर दुत्त --उउउउउलूलू वगैरे स्फुट टाकता येईल.

नाखु नवीन

In reply to by बॅटमॅन

बांधलेले आत्मे झपाटत नाहीत असे कुठे तरी वाचल्याचे आठवते.. बॅटोबा बघ रे सापडला संदर्भ कुठेशीक !!! अ ते आ प्रवासाचा साक्षी.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by प्रचेतस

@जसा यमकात असतो, आत्मू हा उभा>>> अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा.. (आणि स्वतःच आहे यम-कात हुबा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/rebellious-sticking-out-tongue-smiley-emoticon.gif )

सतिश गावडे नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा! जसा यमकात असतो, आत्मू हा उभा अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा.. आणि स्वतःच आहे यम-कात हुबा! ये रे तू पाणssssडुब्बा पाणssssडुब्बा

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by प्रचेतस

है ह्हो! कुठे अवांतर आणि कुठे मूळ. :)

पगला गजोधर नवीन

In reply to by अभ्या..

राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक, चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते, यापुढे जावून, तुम्ही परत जर नाव बदलणार असाल, तर कृपया 'आत्म - मुक्त' हेही नाव घेवू नका… पुन्हा चड्डी कमरेला बांधणारी नाडी (सुटलेल्या अवस्थेत दादा कोंडके स्टाईल) डोळ्यासमोर येइल.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by पगला गजोधर

@राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक, चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते,>> ओक्के..नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला आत्म आणि बंध हे ऐकल्यावर बंध म्हणजे तुम्ही म्हणता तसं बांधलेलं हा प्राथमिक अर्थ प्रतीत होतो..हे ठिक आहे..पण आत्म या शब्दानी चड्डी कमरेला बांधणारी नाडी - कशी काय दृष्टीला प्रतीत होते??? हे जरा निराळंच आहे. कॉमन नाही.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by हेमंत लाटकर

तुम्ही कल्पिता तो आत्मा आणि मी कल्पितो तो आत्मा वेगळा आहे लट्टू काका.. धन्यवाद. आणि पुढील चर्चा करायची-असेल तर खरडवहित या.