विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर
प्रतिक्रिया
In reply to दुर्दैव हा शब्द 'इथं' खटकला. by pacificready
In reply to लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल by राजेश घासकडवी
In reply to देव आणि दैव या शब्दांवर, by pacificready
In reply to देव आणि दैव या शब्दांवर, by pacificready
'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?'या मूलभूत प्रश्नांना डार्वीनचय थेअरीने कसा हात घातला हे कळलं नाहि.
In reply to कुछ जम्या नय ये एपीसोड by अर्धवटराव
In reply to आपल्या अस्तित्वाचं कारण काय? by राजेश घासकडवी
In reply to हे प्रश्न फार सुपरफिशिअल झाले by अर्धवटराव
In reply to बहुतेक वेळा 'कसं?' या by राजेश घासकडवी
In reply to आय अॅग्री. by अर्धवटराव
पण 'का?' चं डायमेन्शन 'कसं?'पेक्ष नेहमीच भिन्न असतं.याबद्दल वादच नाही. का चे प्रश्न काहीसे कर्तरी असतात तर कसं चे प्रश्न कर्मणि असतात. उदाहरण द्यायचं झालं तर, तू हे का केलंस? हा प्रश्न कार्यासाठी व्यक्ती कारण आहे याउलट हे कसं घडलं? या प्रश्नात प्रक्रियेबद्दल माहिती विचारणं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना कदाचित 'मी नाही हे केलं, अमुकअमुक झालं त्यामुळे हे असं दिसतंय' असं उत्तर मिळू शकतं. हेच का वरून कसं वर जाणं असतं. आणि अनेकवेळा आपल्याला का ऐवजी कसं चं उत्तर देऊन भागतं. हे अगदी दगडावरच्या रेषेसारखं नाही. का चे प्रश्न जास्त व्यापक असतात, आणि बऱ्याच वेळा कसं च्या प्रश्नांना ते सामावून घेतात. पण बहुतेक वेळा त्या प्रश्नांमध्ये मूलभूत फरक आहेत हे निश्चित.
In reply to बहुतेक वेळा 'कसं?' या by राजेश घासकडवी
In reply to काहीही चालू आहे! by विवेक ठाकूर
झालोय. लगे रहो!In reply to लेखमाला लिहायचे कारण समजले by नगरीनिरंजन
In reply to प्रयोजन by राही
In reply to प्रयोजन by राही
In reply to माझी भाषा थोडी चुकली. लेखमाला by नगरीनिरंजन
त्यामुळे असे ज्ञान फक्त स्वान्तबोधाय आहे. ज्यांना समजले व पटले ते अलिप्तपणे निघून गेले. बाकीचे लिप्त लोळत राहणार अध्यात्माच्या व देवाधर्माच्या गप्पा मारत.याच्याशी सहमत असलो तरीही या मार्गावरून चालणार्या नवख्यांना कुणी थोडा प्रकाश दाखवला तर प्रवास अधिक सुलभ होतो. मिपावरील एक मित्रवर्य आहेत आमचे. त्यांच्या मनाला बर्याच गोष्टी पटायच्या नाहीत. मात्र लहानपणी झालेल्या संस्कारांमुळे त्या गोष्टी झटकून टाकायला मन कच खायचे. वरचेवर होणार्या भेटींमध्ये यावर चर्चा होऊ लागली आणि त्यांची वैचारीक बैठक पक्की होऊन मनातील कोलाहल थांबला.
In reply to अशा लेखमाला यायला हव्यात. by सतिश गावडे
In reply to वेगळा वैचारिक कोलाहल सुरु by नगरीनिरंजन
In reply to माय ब्याड. कोलाहलच्या ऐवजी by सतिश गावडे
In reply to लेखमाला लिहायचे कारण समजले by नगरीनिरंजन
In reply to लेखमाला लिहायचे कारण समजले by नगरीनिरंजन
हे सगळे डार्विनच्या व इतरांच्या पुस्तकांमध्ये आहेच आणि ज्याला समजून घ्यायचे आहे तो ते वाचेलच.हे तितकं सोपं नसतं. एकतर डार्विनच्या पुस्तकांत ही उत्तरं आहेत हे माहीत नसतं. मला नव्हतं माहीत. बारावीत असताना मी या बाबतीत चाचपडत होतो. कोणीतरी शक्ती हे सगळं जग चालवते यावर विश्वास नव्हता, पण त्याचबरोबर जीव कसे निर्माण झाले हे माहीत नव्हतं. उत्क्रांतीबद्दल 'जीव सुधारतात' 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' 'प्रजातीच्या भल्यासाठी' वगैरेपलिकडे काहीच कल्पना नव्हती. सेल्फिश जीन वाचलं आणि डोळे खाडकन उघडले. आता जर डॉकिन्सने ते पुस्तक लिहिलंच नसतं, तर मी चाचपडत राहिलो असतो कदाचित. मी काही डॉकिन्स नाही, पण मला जे समजलं आहे, ते इतरांना समजावून सांगायची मला गरज वाटते कारण माझ्यासारखंच कोणीतरी चाचपडत असेल, त्यांना आपला रस्ता सापडू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिशमध्ये या विषयावर ढिगाने पुस्तकं लिहिली गेली असली तरी मराठीमध्ये अगदी मोजकीच आहेत. त्यातही तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'कर्ता नाही, आपोआप निसर्गनियमांतून सृष्टी निर्माण झाली' हे अधोरेखित केलंच असेल असं नाही. ही लेखमाला लिहिताना केवळ उत्क्रांतीच नव्हे, तर एकंदरीत विज्ञानाने शोधून काढलेलं विश्व किती अद्भूतरम्य आहे हे मांडण्याचा प्रयास आहे. कोणीतरी तिसऱ्याने येऊन अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे करण्यापेक्षा सत्याचं सौंदर्य जर भिडलं तर माणूस आपोआप बदलेल अशी माझी धारणा आहे. त्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न इतकंच.
In reply to हे सगळे डार्विनच्या व by राजेश घासकडवी
In reply to हे सगळे डार्विनच्या व by राजेश घासकडवी
In reply to इथे तर फार मोठी गल्लत आहे by विवेक ठाकूर
In reply to इथे तर फार मोठी गल्लत आहे by विवेक ठाकूर
In reply to का by राही
In reply to इथे तर फार मोठी गल्लत आहे by विवेक ठाकूर
In reply to तुमच्या या प्रतिसादावरुन असे by म्हसोबा
In reply to नाही ! by विवेक ठाकूर
In reply to हरकत नाही. by म्हसोबा
In reply to तुम्हाला निदान प्रश्न तरी कळला हेच खूप आहे by विवेक ठाकूर
In reply to इथे तर फार मोठी गल्लत आहे by विवेक ठाकूर
In reply to हे नक्की कसं विचारायचं? by पिलीयन रायडर
In reply to ३ वर्षांपुर्वी ह्या शब्दात by पिलीयन रायडर
In reply to अजूनही चुकताय वो ताय तुम्ही.. by संदीप डांगे
In reply to आमचा अभ्यास नाही हो तेवढा... by पिलीयन रायडर
In reply to खिक्क! मिपावर संक्षीपुराणाचा by संदीप डांगे
In reply to डार्विन थेअरी आणि .... by आरोह
In reply to डार्विन थेअरी आणि .... by आरोह
How a murmuration of starlings know when to turn right or left simultaneously without an apparent leader?https://www.youtube.com/watch?v=HxUL4I5CEN0 इथे फ्लॉक कसे तयार होतात, आणि एकत्र राहून स्वतंत्र निर्णयातून आपल्याला दिसणारं सुंदर दृश्य कसं तयार होतं याबद्दल थोडीशी माहिती आहे. प्रत्येक पक्षी आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी दिसतील अशा पद्धतीने फक्त उडतो.
This spiritual force explains why despite entropy evolution is incremental.एंट्रॉपीचा युक्तिवाद जुना आहे, मात्र क्लिष्ट रचना तयार होण्यासाठी त्याने अडथळा येत नाही. एके ठिकाणी एंट्रॉपी कमी झाली तर ती त्या प्रक्रियेत इतर ठिकाणी बरीच जास्त वाढते. आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये बर्फ तयार होतो तसं. किंवा निव्वळ सूर्याच्या उष्णतेने खाऱ्या पाण्याचं बाष्प होऊन विरघळलेल्या मिठाची एंट्रॉपी कमी होते - व मिठाचे स्फटिक तयार होतात, तसंच. असो. लेखकाला उत्क्रांती झाली हे मान्य आहे. मात्र मांडणीत अनेक त्रुटी आहेत.
In reply to डार्विन थेअरी आणि .... by आरोह
In reply to घासूगुरुजी, यनावाला यांनी फार by संदीप डांगे
In reply to माझ्या बालबुद्धीला प्रतिसाद by आदूबाळ
In reply to माझ्या बालबुद्धीला प्रतिसाद by आदूबाळ
In reply to "का" हा प्रश्न उरतोच... by विवेक ठाकूर
In reply to तो एक सदस्य संक्षी आहेत ना? by पिलीयन रायडर
In reply to `कसं' हा विषय निरुपयोगी नाही हे प्रतिसादात नमूद केलंय by विवेक ठाकूर
कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे स्पेसचा उलगडा नाही.हे योग्य वाटतंय. पण राघांच्या म्हणण्यातल्या "बऱ्याच वेळा" या शब्दांतून आणि अन्य स्पष्टीकरणातून वाक्य खालीलप्रमाणे लिहीता येईल असं वाटतं. बहुतांश व्यावहारिक आणि व्यक्तिगत पातळीवर पडलेल्या "का?" रुप प्रश्नांबाबत (उदा. मलाच का झालं हे) "कसं?" रुपी उत्तर / प्रोसेस कळली तर या गटातल्या "का?" रुप प्रश्नांतल्या "का" या भागाच्या उत्तराची निकड / प्रायॉरिटी नाहीशी होते. बाकी का? हा प्रश्न हा एकच मोठ्ठा प्रश्न आहे. कोणाच्याही "ईषणे" शिवाय इतकी परस्परावलंबी व्यवस्था अस्तित्वात असू शकते हे मनाला पटवणं अतिशय अवघड असतं. त्यामुळे का हा प्रश्न निरर्थक असू शकतो हे पटवणंही.
In reply to कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे by गवि
In reply to @ गवि by विवेक ठाकूर
In reply to `कसं' हा विषय निरुपयोगी नाही हे प्रतिसादात नमूद केलंय by विवेक ठाकूर
In reply to घासूगुरुजी, यनावाला यांनी फार by संदीप डांगे
In reply to ननि म्हणतात तसे मला ह्या by प्रसाद१९७१
In reply to अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर. by पॉइंट ब्लँक
In reply to चपखल ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर. by पॉइंट ब्लँक
अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर.हे किंवा अशी इतर वाक्यं कायम ऐकू येतात. पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे म्हणून ते सत्य म्हणून विश्वास ठेवा असं सांगितलं जातं. याउलट विज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्येक सत्य डोळसपणे तपासून पाहिलं जातं. मला एक सांगा, तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का? याचं कारण तुम्ही विमानं उडताना पाहिलेली असतात. प्रत्यक्ष विमान प्रवास करून आलेले लोक तुम्हाला माहीत असतात. विमानाचं तंत्रज्ञान गेली शंभर वर्षं सुधारत चाललेलं आहे याची तुम्हाला माहिती असते. आणि अगदीच तुम्हाला गरज पडली तर हे तंत्रज्ञान काय आहे याचा अभ्यास तुम्हाला करता येतो. इतकं सगळं स्वच्छ आणि उघड असताना आपण जो डोळसपणे विज्ञानावर विश्वास ठेवतो त्याला अंधश्रद्धा का म्हणावं?
In reply to काळाचा उगम जर एका क्षणाला by राजेश घासकडवी
पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
त्यांनी "अंधश्रद्धा" शब्द वापरलाय "विश्वास" हा तुमचा शब्द आहे. हा एक शब्द बदलल्याने वाक्याच्या अर्थात जमीनस्मानाचा फरक पडतोय !!!
तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का?
हा विपर्यास आहे !
विमानाने केला जाणारा प्रवास हा... "लांब अंतराच्या प्रवासात विमानप्रवासामध्ये वेळ, श्रम व पैश्याची तुलनात्मक बचतच होते आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे व त्या सेवेत असलेल्या धोका टाळण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे विमानप्रवासात अपघात होण्याची शक्यता स्विकारार्ह असावी इतकी खूप खूप कमी असते"... या गृहितकांवर केला जातो. असा एखाद्या गोष्टीपासून होणार फायदा आणि तिच्यात असणारा धोका यांची तुलना करून तो धोका पत्करण्याचे अथवा न पत्करण्याचे अनेक "व्यावहारीक" ("अंधविश्वासी नव्हे") निर्णय आपल्याला रोजच्या जीवनात सतत घ्यावे लागतात.
साधी उदाहरणे द्यायची झाली तर...
१. "विमानप्रवासापेक्षा रस्त्यावरून केलेला प्रवास जास्त धोक्याचा आहे (उदा. दर दशलक्ष किमी प्रवासाला मृत्युचे प्रमाण, इ) हे अनेकदा सिद्ध झाले आहे. म्हणून रस्त्यानेही प्रवास करायचे टाळायचे काय की तो अंधविश्वासामुळे केला जातो ?
२. शाळा-कॉलेजाची डिग्री घेतल्याने नोकरी मिळेल... इतकेच काय घोकंपट्टी पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त काही मिळेल... याचीही १००% खात्री कोणीच देत नाही. म्हणून शिक्षण घेणे अंधश्रद्धा होत नाही.
दर दिवसाला आपण असे निर्णय डझनांनी घेतो. पण हातातल्या मुद्द्यासाठी इतके पुरेसे आहेत.In reply to पण देवावर विश्वास असणं आणि by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुम्ही उदाहरणावर अडून बसू नका by राजेश घासकडवी
In reply to काळाचा उगम जर एका क्षणाला by राजेश घासकडवी
पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.मान्य. वि़ज्ञान कशाला म्हणायचे हे एकदा स्पष्ट करा म्हणजे पुढे चर्चा करता येइल. बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.
In reply to प्रतिक्रिया निट वाचेलली दिसत by पॉइंट ब्लँक
बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.मी नाय ब्वॉ थेट कोलगेटचं ऐकत. मी माझ्या डेंट्याला विचारतो. त्याला असल्या पेस्टांचा फायदा/तोटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्तं समजतो. कोल्गेट जाहिरातून गंडवतं याचा आणि विज्ञानप्रेमींचा सबंध नाही समजला.
लेखात पुरेसं स्पष्ट केलेलं