विसंगतींचे संदर्भ...!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कळून इतके काय कळे हे
नकळे मजला का न कळे
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
भास भाबडे रंग रूप हे
भास भावना भास चेतना,
भास सत्य अन भास भासही
भास असे सगळे सगळे...
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
समजून घेतो आपण आपले
सगळे आपल्यासाठी इथे..
आपण कोण नि कोण दुजे हे
परंतु येथे कोणा न कळे..
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
भूल दिशा अन दिवस निशा हे
पोकळ जडता स्थिर चल हे..
अंत अनंत नि क्षणिक चिरंतन
व्यक्ताशी अव्यक्त जुळे....
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
-झेल्या
वाचने
5336
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
कळे न कळे..
कवितेल फ्लो मस्त आहे.. एकदम सह्ही.
"भासरंग" हे नाव कसं वाटतं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to मस्त कविता.. by प्राजु
मनापासून आभार...
"भासरंग" हे नाव खरच खूप छान आहे..पण या नावाची आणखी वेगळी आणि आणखी सुंदर कविता होऊ शकेल असं वाटतं..!
कवितेबद्दल दोन कौतुकाचे शब्द वाचून खूप आनंद झाला.
-झेल्या
ज्याचे त्याचे समज खुळे
हेच वाक्य प्रत्येक कडव्यात सारखे आले आहे. तेव्हा हे शीर्षक देणे तर्कसंगत दिसते... :)
बाकी तुम्हाला पटते की नाही ते तुम्हीच ठरवा...
कारण जो लिहितो त्यालाच योग्य शीर्षक ठरवता येते असे मला वाटते...
- सागर
आवडली कविता.
झेल्या चि कविता
झेल्या ची कविता झेला !!
हे नाव कसं वाटतये? ;-)
(ह. घे रे बाबा )
भासमान कविता आवडली..
काही संबद्ध विषयावर सुद्धा लिहु शकतोस ...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
In reply to झेल्या ची कविता !! by अनिल हटेला
'झेल्या ची कविता झेला !!' हे तर फारच युनिव्हर्सल नाव आहे...माझ्या कुठ्ल्याही कवितेला चालेल...
खुमासदार प्रतिक्रियेबद्द्ल मनापासून आभार..!
-झेल्या
हे आवडले तर द्या.
वेताळ
खुळा कुठला.
आभास- हे आवडले का?
मला काहि न कळे
झेल्या हे घे आणखी एक नाव
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
गैरसमजाने मिळालेली समज !
अनिरुध
आपण विचारलेच आहे तर
झेल्याराव आपण तुमच्या कवितेचे बारसे करूया
'न कळे ' हे नाव तुमच्या कानात सांगतो
ऐकले ना!
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...!
सध्या दिलेलं नाव कसं आहे?
-झेल्या
मला वाटते, सध्या दिलेले नाव चपखल आहे!
कवितेत परस्पर-विरोधी शब्द वापरलेत एकाच वाक्यात!
जसे,
१. भास सत्य अन भास भासही
२. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन
व्यक्ताशी अव्यक्त जुळे....
नावात तसाच विरोधाभास दिसतोय आत्ताच्या! त्यामुळे हे छानच आहे.
मस्त! :)
मस्तच.
कळे न कळे..