वंशशोध
लेखनविषय:
त्या करुण हाकासुध्दा
त्याला रोखु शकल्या नाहीत
तो खोल, खोल
अगदी खोल गर्तेत
शिरत होता,
प्राक्तनाच्या फुटक्या काचभांड्याचे
चरे पायात शिरत
असताना देखील !
माणसाच्या मुळाच्या उगमापर्यंत
जाउन आलेला तो
सनातन सत्य वाहत
दुर्बोधाच्या जाणिवा नाकारत
अज्ञात काळगुहेत शिरत
प्रलयंकारी भविष्यकाळास
आव्हान देत होता !
परंपरांच्या ओझ्यांचे जोखड
मानेवर काही वळ ठेवून होते
जे नाकारतोय त्याची जाणीव
धिक्कारलेल्या नजरांचे आसुड
सार्यारचे मिश्रण
ओराखड्यांचे अनाकलनीय
चित्र रेखाटत होते !
वंश बुडाल्याचे दुख
कधीच नव्हते
जिथे शेपुट गळाली
अन् माणुस दिसला
त्या जागेच्या शोधात कधीतरी
परागंदा व्हावेच लागणार होते !
कालवृक्षाच्या पारंब्या
आदिम पृथ्वीस छेदुन
पाताळात मूळ गाडत असताना
भविष्याच्या पर्वतावर
हिमभरल्या जगात कोरडी
जागा शोधण्याचा प्रकार
कुणी तरी करायलाच हवा
हा करतोय ! करू देत !
वंश शोधल्याचे पातक
कधीतरी घडणारच होते
वंशविच्छेदापेक्षा भयंकर
अशी कळ,
मग माकड की माणुस ?
पशु की पशुपरान्त ?
काळीज हेलावणारे प्रश्न
वंश शोधल्याचे प्रकांड सुख
की काळीज गोठविणारे दुख
ह्या सीमारेषेत अडकलेला तो !
विजयकुमार......................
21 / 01 / 2009
वाचने
1895
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
Sakhol kaavya!
मस्तय
कविता आवडली.
हा हा
In reply to हा हा by पालीचा खंडोबा १
Haa normal ha ha disat naahiye ;-)
Tumhich sodwa kode...:))
एकाच प्यॅटर्न मध्ये किती दिवस लिहिणार खंडोबा ?
काहीतरी नवीन येवु दे की
खंडोबा... विचार करून लिहा.
(कौतुकाची साखर हवी पण टिकेचा कडू घोट नको असेल तर 'आप हमें इग्नोर मारो हम आपको')
ही अकरावी पेंटींग आहे.
Khoopach sundar!