विश्वाचे आर्त - भाग १ - काळाचा आवाका
In reply to या लेखमालेतले पहिल्या दोनतीन by राजेश घासकडवी
In reply to या लेखमालेतले पहिल्या दोनतीन by राजेश घासकडवी
या काळाच्या विशाल कवेत आपला कण सामावून देऊन त्याला आपले हात पसरून मिठी मारायला हवी.तुम्हालाच मिठी मारतो आता. गुर्जी असले काही लिहीतील आणि ते आवडेल असे कधी वाटलेच नाही. जाम भारी!
In reply to फारच बोअर लेखमाला आहे by विवेक ठाकूर
अर्थात, भयंकर पण एकदम निरर्थक टाईमपास करायचा तर लेखमाला उत्तम आहेया प्रतिसादात कोणालाच काहीच आक्षेपार्ह वाटले नाही असे म्हणायचे की याला पूर्णपणे फाट्यावर मारायचे मिपाकरांनी ठरविले आहे असे म्हणायचे? जर का अन्य कोणी सदस्य काहीतरी लिहित असेल आणि त्या लेखनात काही उणीव जाणवली तर त्यात आपल्या परिने भर घालावी किंवा माहिती चुकीची आहे असे वाटल्यास बरोबर माहिती कोणती हे लिहावे आणि ते ही करायचे नसल्यास पूर्ण दुर्लक्ष करावे पण अशाप्रकारची भाषा नक्कीच खटकण्याजोगी आहे.
In reply to खटकण्याजोगा प्रतिसाद by गॅरी ट्रुमन
In reply to सहमत. by सस्नेह
In reply to लेखाचे शीर्षक पाहा : by विवेक ठाकूर
In reply to घड्याळ हे कालमापनाचं यंत्र by राजेश घासकडवी
In reply to घड्याळ हे कालमापनाचं यंत्र by राजेश घासकडवी
In reply to भ्रमण कालात होत नाही आवकाशात होतं by विवेक ठाकूर
In reply to बरं बुवा. तुम्ही म्हणत असाल by राजेश घासकडवी
In reply to हे फॅक्च्युअल आहे, ते एकतर मान्य होईल किंवा अमान्य by विवेक ठाकूर
सगळं जग व्यक्तीच्या जाणीवेत सामावलेलं आहे. जाणीव संपली, जग संपलं. जग केंव्हा निर्माण झालं? जेंव्हा ते जाणीवेत आलं तेंव्हा. अर्थात, भयंकर पण एकदम निरर्थक टाईमपास करायचा तर लेखमाला उत्तम आहेहा तुमचा पहिला प्रतिसाद. या मध्ये अवकाश, काळ, कालमापनाची प्रक्रिया आणि एकक ( तुम्ही घड्याळाचा उल्लेख केलाय , म्हणुन एकक) याचा कुठेच उल्लेख नाही. तुमच्या मताप्रमाणे जी विसंगती आहे , ती, त्यांनी जसा पब्लिकली लेख सादर केलाय तशी तुमच्या प्रतिसादात करायला हवी होती. लेखकाने त्याचे उत्तर दिलेच असते आणि वाचकांना पण चांगला संवाद/ वाद वाचायची संधी मिळाली असती. तुमच्या पहिल्या प्रतिसादात कुठलंही कारण न देता केवळ शेरेबाजी केली आहे आणि लेखमालेला निकालात काढलं आहे. याची काय गरज होती?
In reply to नमस्कार. by शरभ
In reply to नमस्कार. by शरभ
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
In reply to बिग क्रंच होण्याची शक्यता कमी by शब्दबम्बाळ
कृष्णविवरे बराच काळ टिकून राहतील पण शेवटी तीही उर्जेअभावी कोसळतील.या विषयातले मला काहीही म्हणजे काहीही कळत नाही. तरीही या चर्चेत एक गोष्ट लिहित आहे. बी.ए.आर.सी मधून मागच्या वर्षी निवृत्त झालेल्या आभास कुमार मित्रा यांचे म्हणणे आहे की कृष्णविवरे असे काही नसतेच. मागच्या वर्षी काही कारणाने आभास कुमार मित्रा यांना भेटलोही होतो. आता त्यांच्याशी काहीच संपर्क नाही पण त्यांचा चेहरा नक्कीच लक्षात होता. काही दिवसांपूर्वी कुणीतरी फेसबुकवर ही लिंक पोस्ट केली आणि आभास कुमार मित्रांचा फोटो त्यात दिसला म्हणून लिंक क्लिक केली इतकेच.वर उल्लेख केल्याप्रमाणे या विषयातले मला अगदी शून्य आकलन आहे.त्यामुळे याविषयी अन्य काही मुद्दे आल्यास त्यावर मला काहीही लिहिता येणार नाही. तरीही समजा या चर्चेत उपयोगी होणार असे काही त्या लिंकेत असायची शक्यता आहे म्हणून ते इथे लिहिले आहे.
In reply to कृष्णविवरे by गॅरी ट्रुमन
In reply to कृष्णविवरे by गॅरी ट्रुमन
In reply to मध्यंतरी बहुतेक हॉकीन्स साहेबांनी पण असाच दावा केला होता... by अर्धवटराव
In reply to ही तर 'ब्रेकिंग न्यूज'च म्हणायची by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उत्कृष्ट. धन्यवाद.. by गवि
In reply to उत्कृष्ट. धन्यवाद.. by गवि
जगण्यासाठी त्याला काल, परवा, आत्ता, या क्षणी, गेल्या मिनिटात, काय झालं एवढंच जाणून घेणं आवश्यक असतं. एखाद्या गोष्टीचे परिणाम शंभर वर्षांनी काय होतील याची पर्वा करण्याची गरज नसते, उपयोगही नसतो.या आत्ताचंच बघण्याच्या, आपलं झालं ना मग जाऊदेत...प्रवृत्तीमुळेच प्रदूषण किंवा तशाच इतर जागतिक दूरगामी समस्यांकडे डोळेझाक होते का? असा एक विचार आला.... तसेही उत्क्रांतीदेखील एक दिवस एका वेळी अशीच होत आलीये त्यामुळे छोट्या कालखंडाचं महत्त्व हे थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने निसर्गातच अधोरेखित आहे असे वाटते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. -रंगा
? या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झालाह्या वयापेक्षाही जुन्या असलेल्या काही आकाशगंगांचा शोध लागलाय त्यामुळे विश्वाचे वय अजून मागे जातेय ह्या विषयी कुठेतरी वाचले होते.संदर्भ आता आठवत नाहीये.
या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाला.त्याआधी काय होते? (ह्या प्रश्नाचा विचार करताना मला नेहेमी मळमळायला होते.ह्यात कृपया काहीही उपरोध नाही आहे.)
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
In reply to थोडक्यात सांगायचं झालं तर काळ by राजेश घासकडवी
In reply to काळ असं काही नाही by विवेक ठाकूर
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती by राजेश घासकडवी
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती by राजेश घासकडवी
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती by राजेश घासकडवी
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? by विवेक ठाकूर
In reply to बाहुबलीने असा विचार केला असता by sagarpdy
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? by विवेक ठाकूर
In reply to काळ नसेल तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरेल? by विवेक ठाकूर
कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे.गैरसमज. ५ अब्ज वर्षांपूर्वी आणि ५ अब्ज वर्षांनंतर सूर्य प्रकाशमान नव्हता आणि नसेल. ५ अब्ज वर्षांच्याही काही (लाख, कोटी, अब्ज वर्षं) कोणतातरी तारा मेला तेव्हा जे अणू तयार झाले ते तुमच्या-आमच्या शरीरांत आज आहेत. (उपहास सुरू) ... पण सॉरी. तुम्ही म्हणता म्हणजे बरोबरच असणार. माझीच चूक झाली असणार. पाठ्यपुस्तकांमध्ये, फ्रेड हॉयल ते जॉर्ज गॅमॉपर्यंत, नारळीकरांपासून स्टीफन हॉकिंगपर्यंत, स्थिरस्थिती विश्वरचना मानणारे आणि महास्फोटाचे प्रवक्ते शास्त्रज्ञ जे म्हणतात ते चूकच असणार. तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने काही म्हणता आहात म्हणजे वैज्ञानिक पाया वगैरे असेलच त्याला, ते जे काही आहे ते स्पष्ट करायची गरजच नाही. (उपहास संपला.)
In reply to कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to थोडक्यात सांगायचं झालं तर काळ by राजेश घासकडवी
In reply to साधारण प्राथमिक इयत्तेत पहीले by कानडाऊ योगेशु
ह्या पार्श्वभूमिवर विश्व जेव्हा निर्माण झाले त्याआधी काही नव्हते हे पचायला खरोखरच जड जाते.नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही. तुम्ही जो तर्क त्यासाठी मांडता तो तर्क म्हणून छाणे, पण विज्ञान म्हणून कामाचा नाही. तर्क म्हणूनच दुसरं उदाहरण देते. एका कपात मी गरम कॉफी ओतली. घुटका घुटका करत पिताना ती थोडी थोडी थंड व्हायला लागली. मगाचच्या घोटाला होती त्यापेक्षा ती जास्त थंड व्हायला लागली. पण आजूबाजूच्या हवेएवढी कॉफी थंड झाल्यानंतर कॉफी आणखी थंड झालीच नाही. त्यापेक्षा बरीच जास्त थंड असणारी पेयं मी पिते, पण ही कॉफी त्यापेक्षा थंड होऊ शकत नाही. तर्क काय (संस्कृत सुभाषितांसारखा) दोन्ही बाजूंनी लावता येतो. म्हणून ते विज्ञान ठरत नाही. काळ उणे असणारच, हे म्हणणं 'शोले'तला गब्बर सिंग आणि बोट तुटका शाहिस्तेखान यांच्या समलिंगी अफेयरचं गॉसिप पसरवण्यासारखं आहे.
In reply to तर्काला विज्ञान समजणं हीच अंधश्रद्धा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
काळ उणे असणारच,...इथे थोडी गफलत होतेय. लहानपणी इसवी सन ही कालमोजमापनाची व्यवस्था प्रथम माहीती झाली तेव्हा असे वाटायचे इ.स. ० पूर्वी काही नव्हतेच का काय. मग नंतर समजले जे आपण सध्या लिहितो २०१५ ते खरेतर इ.स.० नंतर २०१५ असे आहे. (इ.स. पूर्व अमुक अमुक असा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा मनात उगीचच ब्लॅक अँड व्हाईट प्रतिमा उमटतात.). म्हणजे इ.स व्य्वस्था अस्तित्वात आली त्यापूर्वी काळ हा प्रकार नव्हताच का काय? मग हेच लॉजिक सो कॉल्ड विश्वनिर्मीतीच्या झिरो स्टेटला का लावता येऊ नये.?
In reply to कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही by कानडाऊ योगेशु
In reply to काऊ by विवेक ठाकूर
ध्वनी निर्माण होण्यासाठी शांतता हवीनिर्माण होण्यासाठी की ऐकू येण्यासाठी?
In reply to ध्वनी निर्माण होण्यासाठी by बिपिन कार्यकर्ते
In reply to ध्वनी निर्माण होण्यासाठी by बिपिन कार्यकर्ते
In reply to कॉफिचे उदाहरण आवडले. पण इथेही by कानडाऊ योगेशु
In reply to तीच कॉफी, समांतर उदाहरण. by ३_१४ विक्षिप्त अदिती
तापमान म्हणजे अणू-रेणूंची गती. या तापमानाला अणूरेणूंची हालचाल थांबते. ही हालचाल थांबल्यानंतर आणखी थंड होणं शक्य नाही.जेंव्हा द्रव्याच्या अणुरेणुंची हालचाल थांबते तेंव्हा त्याला आणखी थंड करता येत नाहि. पण त्याचवेळी १) अणु रेणूंची तशी हालचाल करायची क्षमता, शक्यतेचा लय होत नाहि. हालचाल करण्याची अणुरेंणुंची प्रॉपर्टी सदा अबाधीत असते, इर्र्स्पेक्टीव्ह ऑफ तापमान ?? २) द्रव्य त्याच्या मिनीमम फ्रीझींग पॉइंटला आलं, त्याचे अणु इतके आक्रसले कि सगळे अणु एकाच बिंदुमधे सामावले. असं झालं, आणि तरी त्या द्रव्याने आपले परिवर्तनाचे गुणधर्म सोडले नाहि (कारण त्याचाच पुढे स्फोट होऊन प्रसरण झालं?). म्हणजे ते द्रव्य कधि "शुण्य" झालच नाहि ? याचाच अर्थ "काहिच नाहि" मधुन बिग बँग झालच नाहि ? आणि जर ते कधि शुण्य झालं असेल तर त्याचा अर्थ इतकाच आहे कि द्रव्याने आक्रसत जाऊन शुण्य होणे या पलिकडे आपण त्याची अवस्था ट्रॅक करु शकत नाहि ? जर इथे हि चर्चा अप्रस्तुत वाटत असेल ( मुख्य म्हणजे तशी चर्चा काहि उपयोगाची वाटत असेल :) ) तर ख.व. मधे देखील वार्तालाप करता येईल.
In reply to इंट्रेस्टींग. by अर्धवटराव
In reply to तर्काला विज्ञान समजणं हीच अंधश्रद्धा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही, विश्व नव्हे, काळ. उणे वस्तुमान असू शकत नाही, गुरुत्वाकर्षण कायम आकर्षण या स्वरूपातच असतं, प्रतिकर्षण नसतं, तसंच काळ कायम पॉझिटिव्ह असतो, काळ = शून्य याच्या आधी काहीही असू शकत नाही.
हे म्हणणे म्हणजे मला आता माहीत आहे तेच आस्तित्वात आहे/होते... इतर काहीच नाही असे म्हणण्यासारखे आणि म्हणूनच "अशास्त्रिय" दावा आहे.
आजच्या घडीला बिग बँग हा "सिद्धांत" मानवाच्या भूतकाळासंबंध्दीच्या आकलनाची सीमा आहे. म्हणूनच केवळ तो कालमापनासाठी एक अर्बिट्ररी झिरो पॉईंट आहे.
"बिग बँग अगोदर काहीच नव्हते" हे शास्त्रज्ञांनी म्हणणे आणि "देवाने विश्व निर्माण केले त्याअगोदर काहीच नव्हते" हे आस्तिकांनी म्हणणे एकाच पठडीतले दावे आहेत, नाही का ? :)
असं बघा...
१. जर "देवाने विश्व निर्माण केले" हे खरे मानले तर त्याच विधानाने विश्वाआधी देव होता हेच सिद्ध होते... म्हणजे आस्तिकांचा "त्याअगोदर काहीच नव्हते" हा दावा फोल ठरतो. शिवाय, "मग देवाआधी काय होते ?" हा प्रश्नही निर्माण होतो :)
त्याच न्यायाने...
२. "वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड एनर्जी) एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात पण दोन्ही एकत्रितपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत किंवा नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ?
अजून एक महत्वाचे...
शास्त्रिय सत्य हे आहे की "आपल्याला बिग बँग (झाला असलाच तर) त्यागोदर काय होते हे आज माहीत नाही". आजच्या घडीला केवळ बिग बँग पर्यंतच मानवाच्या भूतकालाच्या शास्त्रिय आकलनाची परिसीमा आहे व म्हणूनच केवळ तो सद्याचा "अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स फॉर मेझरमेंट ऑफ टाईम आहे". पिरियड. भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर काय होते हे शास्त्रियदृष्ट्या माहीत (सिद्ध) झाले, तर मग काय ? मग एकतर कालमापनाचा अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स बिग बँगच्या मागे न्यावा लागेल किंवा "इसविसनापूर्वी २१० वर्षे" च्या धर्तीवर "बिगबँगपूर्वी सात दशलक्ष वर्षे" असे म्हणावे लागेल, नाही का ? In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ?हा आजचा शास्त्राधार आहे असं कोणी सांगितलं? मॅटर आणि अॅंटिमॅटर यांच्या जोड्या आपोआप तयार होऊ शकतात. स्टीफन हॉकिंगने त्याच्या पुस्तकात मांडलेलं मिशिओ काकुने सोप्या शब्दांत समजावून सांगितलेलं आहे. But how can an entire universe come out of nothing? This apparently violates the conservation of matter and energy. But there is a simple answer. Matter, of course, has positive energy. But gravity has negative energy. (For example, you have to add energy to the earth in order to tear it away from the sun. One separated far from the solar system, the earth then has zero gravitational energy. But this means that the original solar system had negative energy.) If you do the math, you find out that the sum total of matter in the universe can cancel against the sum total of negative gravitational energy, yielding a universe with zero (or close to zero) net matter/energy. So, in some sense, universes are for free. It does not take net matter and energy to create entire universes.
In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड एनर्जी) एकमेकात रुपांतरीत होऊ शकतात पण दोन्ही एकत्रितपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत किंवा नथिंगनेसमधून निर्माण होऊ शकत नाहीत" हा आजचा मूलभूत शास्त्राधार खरा धरला तर... "अगोदर काहीच नव्हते व त्या नथिंगनेसमधून बिग बँग नंतर सगळे वस्तुमान आणि उर्जा निर्माण झाले" हे त्याच मूलभूत शास्त्राधाराला विपरित व फोल विधान झाले, नाही का ?माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होते, म्हणजेच ते नथिंगनेसमधून निर्माण झाले नव्हते.बिगबँग च्या अगोदर काय होते याविषयी देखील काही थेअरी आहेतच, परंतु त्या सर्वमान्यही नाहीत व त्यांना काही प्रायोगीक आधारही नाही. लिंका मिळाल्या तर नंतर टंकतो.
In reply to वस्तुमान आणि उर्जा (मॅटर अँड by sagarpdy
माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग च्या सिध्दांताप्रमाणे सर्व वस्तुमान व उर्जा एका बिंदूत एकवटले होते
हा त्या थियरीचा फार महत्वाचा गाभा आहे आणि तोच विवादास्पद आहे !!!
डोळे मिटून मान्य करायचे नसेल व शास्त्रिय कारणे हवी असली तर नमुन्यादाखल खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे जरूर आहेत :
१. तो बिंदू होता ना ? मग बिग बँग अगोदर काहीच नव्हते हे कसे काय बरे ???
२. त्या "आकारमान नसलेल्या" बिंदूत इतके सगळे "वस्तूमान + उर्जा" कसे सामावले असेल याचे काही सर्वमान्य शास्त्रिय कारण आहे का? आजपर्यंत तरी नाही.
३. मुळात, तो बिंदू तयार कसा झाला ?
४. तो बिंदू तयार होण्याअगोदर काय होते ?
आता अजून एक खास महत्वाचे...
५. जर तो बिंदू होता, तर त्याच्या स्फोटाने प्रसरण पावणारे विश्व गोलाकार (स्फेरिकल... बिंदूपासून/मध्यापासून सर्व दशदिशांना समान) प्रसरण पावायला हवे होते... विश्व तसे नाही! याचे विवरण करायला मग दोन पापुद्रे (मेंब्रेन्स) एकमेकावर आदळून त्यांच्या स्फोटाने विश्व प्रसरण पावू लागले असा सिद्धांत व इतर स्पेस-टाईमचे सिद्धांतही पुढे आला. मग त्या पापुद्र्यांचा आणि आकारमान नसलेल्या एकुलत्या एका बिंदूचा संबंध कसा जोडणार ??? महत्वाचे म्हणजे, बिंदू आणि पापुद्रे हे दोन्हीही केवळ "थियरेटिकल फिजिक्स"च्या सद्या मान्य असलेल्या आवाक्यातले व सद्याच्या गणिती समीकरणांच्या आवाक्यातले, कमी-जास्त मान्यताप्राप्त "सिद्धांत" आहेत. पिरियड.
६. अजून या लेखमालेत, "दिसणारी आणि मोजता येणारे वस्तूमान + उर्जा" यांचाच उहापोह आहे... "डार्क मॅटर" पर्यंत ती पोचलेली नाही... अत्युच्च सायन्स फिक्शनच्या तोंडात मारेल इतका रोचक, आकर्षक आणि विस्मयकारक धडा आहे तो ! :) तो धडा मानवाला "कळायला" लागला तर अनेक मान्य सिद्धांत डळमळतील, अनेक कोलमडून पडतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, बुवा.
इ इ इ In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या सर्व प्रश्नांना उत्तर by राजेश घासकडवी
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
"डार्क मॅटर" पर्यंत ती पोचलेली नाही... अत्युच्च सायन्स फिक्शनच्या तोंडात मारेल इतका रोचक, आकर्षक आणि विस्मयकारक धडा आहे तो ! :) तो धडा मानवाला "कळायला" लागला तर अनेक मान्य सिद्धांत डळमळतील, अनेक कोलमडून पडतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, बुवा.लेखमालेत काय-काय लिहायचं हा निर्णय लेखकाचा आहे. पण डार्क मॅटर - कृष्णपदार्थ हा प्रकार ट्रायकॉर्डर आणि इनर्शियल डँपर-छाप अनाकलनीय वगैरे नाही. याबद्दल बऱ्यापैकी सिद्धांत समोर आलेले आहेत. कृष्णपदार्थ साधारण किती असेल याचा अंदाज निरनिराळ्या खगोलभौतिकी घटना वापरून केले गेले आहेत. आणि त्यांच्यात बऱ्यापैकी एकवाक्यता आहे. अजूनही पुरेसं निदान झालेलं नाही ते डार्क एनर्जी, म्हणजेच वैश्विक स्थिरांकाचं. महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत. पण ती काळ म्हणजे काय, विश्वाची सुरुवात कशी झाली यात नाहीत. जी भोकं आहेत ती रीआयनायझेशन कधी झालं, दीर्घिकांचं चुंबकीय क्षेत्र आणि मधल्या रिकाम्या भागातलं चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारचे आहेत. ते फार किचकट तपशील आहेत; मलातरी भौतिकशास्त्रातल्या जड संकल्पनांशिवाय, सोप्या भाषेत ते समजावता येणार नाहीत. (होय, स्वतःच्या शिक्षणाची ही क्षीण जाहिरात आहे.)
In reply to कुठून सुरुवात करावी कळेना ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका बिंदूत सामावलेली उर्जा-वस्तुमान यांची अवस्था काय होती हे भौतिकशास्त्राला आजतरी समजत नाही. त्यापुढे काय झालं याचा अभ्यास बऱ्यापैकी तपशीलात झाला आणि होत आहे.
महास्फोटाच्या सिद्धांतामध्ये अजूनही भोकं आहेत.
उत्तम ! हे आणि या प्रतिसादातले इतर काही मुद्देच तर बहुतेक प्रतिवादी केव्हापासून मांडत आहेत आणि लेखक त्यांचा प्रतिवाद करत होता !
पण दुसर्या एका प्रतिसादात बिग बँग व इतर दावे "अल्टीमेट" / "अॅबसॉल्युट पॉईंट" वगैरे नाहीत आणि पुढच्या संशोधनाने त्यांच्यात बदल होऊ शकतो हे मानले आहे... लेखात तसा उल्लेख असता किंवा हे अगोदर मानले असते तर मिपाची बरीच बँड्विड्थ वाचली असती. इतकेच.
बाय द वे "डार्क मॅटर/एनर्जी" सुद्धा "सच्छिद्र" "थियरी"च आहे. पण त्याबद्दल इथे नको. पुढे काही संबंध आला व गरज पडली तर चर्चा होईलच. :)In reply to अर्थातच सिंग्युलॅरिटी, एका by डॉ सुहास म्हात्रे
In reply to थियरी ही एका स्वेटरसारखी असते by राजेश घासकडवी
In reply to माझ्या माहीती प्रमाणे बिगबँग by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नाही, विश्व नव्हे, काळ. उणे by डॉ सुहास म्हात्रे
भविष्यकालात बिग बँगच्या अगोदर काय होते हे शास्त्रियदृष्ट्या माहीत (सिद्ध) झाले, तर मग काय ? मग एकतर कालमापनाचा अर्बिट्ररी पॉईंट ऑफ रेफरन्स बिग बँगच्या मागे न्यावा लागेल किंवा "इसविसनापूर्वी २१० वर्षे" च्या धर्तीवर "बिगबँगपूर्वी सात दशलक्ष वर्षे" असे म्हणावे लागेल, नाही का ?नाही. महास्फोटाचा सिद्धांत बदलावा लागेल. विश्वाचं वय १३.७ अब्ज वर्षं आहे असं म्हणता येणार नाही.
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
In reply to हम्म, by नीलमोहर
In reply to हम्म, by नीलमोहर
In reply to या विश्वाचाच जन्म सुमारे चौदा by कानडाऊ योगेशु
In reply to विश्वाचा जन्म चौदा अब्ज by pacificready
In reply to 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. by अर्धवटराव
'काहि नाहि' असं कधिच नसतं.
+१
मुळ मुद्दा असा आहे की...
आज आवाक्याबाहेर आहे ते उद्या आवाक्यात येऊ शकतं... त्यामुळे किंवा अन्यथाही, आवाक्याबाहेरच्या गोष्टींसंबंधात "काही नाही" ऐवजी "(आज) माहीत नाही" असं म्हटलं तरच ते सत्य व शास्त्रिय वचन होईल.In reply to 'काही नाही' पासून 'काहीतरी आहे' हे कसं आणि का घडलं ते सांगा. by अर्धवटराव
In reply to जर विश्व सतत प्रसरण पावत आहे, तर.. by बबन ताम्बे
या लेखमालेतले पहिल्या दोनतीन