Skip to main content

न झालेला दोस्ताना..

लेखक योगी९०० यांनी रविवार, 28/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तसा लेखाच्या नावावरून चतूर मि.पा. करांच्या ध्यानात आले असेल की मी कोणत्या विषयावर लिहीणार आहे. मला आणि माझ्या मित्रांना आलेले अश्या लोकांचे अनुभव. म्हणजे तुम्ही तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी लिहीणार आहे की अशी माणसे कशी आमच्या मागे लागली आणि आम्ही कसे या प्रसंगातून वाचलो ते. आमच्या अनुभवातून तुम्ही काही शिकावे हाच खटाटोप. एक सांगू इत्छितो की या लेखाद्वारे कोणाला दु़खवायचा किंवा अश्या लोकांची चेष्टा करायचा मुळीच उद्देश नाही. जर कोणी मि.पा. कर नाराज झाले तर क्षमस्व. प्रसंग १ (अनुभव १ असे लिहीणार होतो. पण "अनुभव" या नावामुळे फारच गैरसमज होतात) : हमरस्ता सांगलीला शिकायला होतो तेव्हाची गोष्ट. एकदा काही कामानिमित्त शहरात गेलो होतो. परत वसतीग्रुहात जाण्यासाठी बसची वाट पहात होतो. सांगलीच्या बसेस म्हणजे..येतील तर एकदम चार-पाच...नाहीतर अर्धा अर्धा तास एक सुद्धा नाही. शेवटी एका लुनावाल्याने लिफ्ट दिली. साधारण ३०-३५ वयाचा असावा. म्हणजे तोच आला आणि पुढे सोडू का म्हणाला. मग काय मी बसलो मागे. पण हा सारखा सारखा मागे सरकत होता. त्याला एक-दोनदा सांगितले की बाबारे नीट बस..मागे पडेन मी. मध्येच त्याने गाडी वेगळ्याच रस्त्यावर दामटवली. मी पण ओरडलो तर म्हणाला काही नाही रे..जवळच माझे घर आहे. थोडावेळ चल तेथे. घरच्यांशी ओळख करून देतो. मी वाटेतच त्याला गाडी थांबवायला लावली आणि धुम ठोकली. मला वाटत होते की याचा उद्देश माझे पैसे लुटायचा असेल. वसतीग्रुहात पोचलो आणि मित्र्यांशी चर्चा केल्यावर सर्व प्रकार ध्यानात आला. अर्थात त्यानंतर कोणी आपणहून लिफ्ट देत असेल तर त्याच्यापासून दूर रहायला लागलो. एवढेच नाही तर स्वतः लिफ्ट मागणे ही कमी केले. प्रसंग २ : पोहण्याचा तलाव चेन्नाईला असतानाची घटना. एकदा असेच पोहायला ४-५ मित्र्यांबरोबर गेलो होतो. आम्ही आपापसात काही खेळ खेळत होतो. शर्यत लाव. जास्त वेळ पाण्यात डुबकी मारून रहा ,चेंडूफेक वगैरे. एक असाच २२-२३ चा मुलगा आमच्या सर्वांकडे पहात होता. असे कोणी टक लावून बघितले की विचित्र वाटते ना..? आम्ही एक दोनदा त्याला हुसकवले. पण आम्ही जेथे जाऊ तेथे आमच्या मागे यायला लागला. कहर म्हणजे आमचा एक मित्र कपडे बदलायला गेला असता त्याचा मागे जाऊन त्याने त्याच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. आम्ही सर्व जाऊन आरडाओरडा केला आणि त्याला कानफटवले. प्रसंग ३ : रेल्वे सहप्रवासी. एकदा दिल्लीहून मुंबईला राजधानीने येत होतो. दुसर्‍या वर्गाचा वातानुकुलीत डबा होता. आमच्या खणात एक म्हातारा, एक प्रौढ प्राध्यापक, एक सुंदर (पण हुशार) तरूणी , बाजूला बसलेले दोन तरूण आणि मी असा आमचा मस्त गप्पा ग्रुप जमला होता. विविध विषयांवर (राजकारण, अर्थव्यवस्था वगैरे) मस्त वादविवाद होत होते. असाच आमचा वाद रंगला की बाजुच्या खणातला एक चाळिशीचा ग्रुहस्थ आमच्या खणापाशी येऊन उभा राहायचा. काही बोलायचा नाही. फक्त आम्ही जे जे बोलत आहोत ते ऐकत रहायचा. एकदोनदा आम्ही त्याला गप्पात सहभागी होण्याचे आमंत्रण ही दिले पण त्याला फक्त गप्पा ऐकण्यात रस असावा असे आम्हाला वाटले. आम्ही सर्व (म्हातार्‍यासकट) त्या पोरीवर छाप पाडण्यासाठी आपापली मते पोटतिडिकीने मांडत होतो. अश्यावेळी हा ग्रुहस्थ मात्र आळीपाळीने आमच्याकडे बघायचा. दुसरे दिवशी सकाळी उतरण्यापुर्वी आम्ही सर्वांनी एकमेकांना आपापले फोन नंबर, पत्ते दिले. (बर्‍याचदा अशा प्रवासात दिल्याघेतलेल्या फोन नंबरांचा काय उपयोग असतो कोणास ठावूक? कोणीही मला किंवा मी कोणाला फोन केलेला नाही). त्यावेळी याही ग्रुहस्थाने फक्त माझ्याकडून आणि त्या तरूणांकडून नंबर घेतले. (फक्त आमच्याकडून हे मला नंतर लक्षात आले). ३-४ दिवसांनी त्याचा मला फोन आला. आमच्या संभाषणाचा सारांश पुढीलप्रमाणे... ग्रुहस्थ : नमस्कार ..!!! ओळखले का..? आपण परवा भेटलो होतो. मी : ओ हो.. नमस्कार .. काय म्हणता? कसे आहात? ग्रुहस्थ : मी मजेत आहे. मग आज वेळ आहे का तुम्हाला? या ना आमच्या घरी .....मी अमुक अमुक ठिकाणी राहतो. तुमच्या ऑफिसपासून तुम्हाला जवळच पडेल. मी (मनात शंका) : कशाला? ग्रुहस्थ : काही नाही हो..मस्त गप्पा मारू. परवा तुमचे वादविवाद कौशल्य पाहिले मी. मस्त जेवण वगैरे करू. मी : आणि कोण कोण आहे तेथे? ग्रुहस्थ : आणि कोण कशाला? या हो तुम्ही. मला ही गप्पा मारायला फार आवडतात. मी ( अरे साल्या ) : तुम्हाला गप्पा मारायला आवडतात? ग्रुहस्थ : हो हो खुपच....या हो तुम्ही..तुम्हाला चालत असेल तर मस्त दारू वगैरे तयार ठेवतो. हवे तर रहा आमच्या घरी. उगाच रात्रीतुन कशाला जाताय घरी. मी (अरे टोण्या) : गप्पा मारायला आवडता म्हणताय. मग परवा काय दातखिळी बसली होती का? (मी पण आधीच्या प्रसंगांमधून शहाणा झालो होतो.) ग्रुहस्थ : आहो तसे नाही. आज एकटाच आहे मी. फार कंटाळा आला आहे तेव्हा म्हंटलं की तुम्हाला बोलवावे. मी (थोडया कडक आवाजात) : हे बघा तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे आणि मी अश्या गप्पा मारणारा माणूस नाही. तुम्ही एकटेच गप्पा मारा. ग्रुहस्थ : ओ हो माफ करा मला... (फोन ठेवला). त्यानंतर काही दिवसांनी त्या राजधानीत भेटलेल्या तरूणांपैकी एकाचा फोन येवून त्याला ही या ग्रुहस्थाचा असाच अनूभव आल्याचे सांगितले. (एवढा एकच मला प्रवासातील सहप्रवाश्याचा फोन आला तो सुद्धा या गोष्टीमुळे). प्रसंग ४ : मुंबई लोकल ३-४ वर्षापुर्वीची गोष्ट. मी लोकलने ये-जा करायचो. रोज रोज ठराविक लोकल पकडली की तीच तीच माणसे आपल्या डब्यात दिसतात हे सर्वांना माहित असेलच. असाच एक तरूण नेहमी दिसायचा. माझ्यापेक्षा १-२ वर्षानी लहान असावा. बर्‍याच वेळा समोर बसायचा. तसा दिसायला साधासुधाच होता. आई-वडिल गरीब असतील व मुलगा स्वः हिंमतीने कष्ट करून श्रीमंत झाल्यावर जे भाव त्याच्या चेहर्‍यावर असतील, तसे भाव कायम त्याच्या चेहर्‍यावर असायचे. त्यामुळे मला साधारण त्याच्याविषयी आपुलकी वाटायची. त्यामुळे बर्‍याच वेळा मी त्याला स्मितहास्य द्यायचो. पण या साहेबांनी त्याचा गैरसमज करून घेतला होता. एकदा असाच माझ्याशेजारी बसायला आला. आणि फारच अंगचटीला आला. त्याला सरळ म्हणालो की काय त्रास होतोय तुम्हाला. वाईच सरकून बसा की राव. मग मात्र जरा चपापून बसला. दुसरे दिवशी मात्र त्याला बघून मी नजर फिरवली. नंतर नंतर तर मी माझे वेळापत्रकच बदलले. सुदैवाने इथे परदेशात असे प्रसंग नाहीत (नको रे बाबा). कदाचित इथे असलेले मुक्तवातावरण, या लोकांचे भरणारे मेळावे व मिरवणुका यामूळे अशा लोकांना सहजासहजी सहकारी मिळत असावेत आणि ही विक्रुती वाढत नसावी. पण एक गोष्ट खरी की वरील प्रत्येक प्रसंगानंतर मला माझी लाज वाटली. मला माझ्याच शरीराची घ्रुणा वाटली. जेव्हा कोणी पुरुष बाईकडे अश्या नजरेने पहातो किंवा अतिप्रसंग करतो तेव्हा तिला ही स्वतः विषयी असेच वाटत असावे बहूतेक...!!! आपणही जर अशा प्रसंगातून गेला असाल तर आपले अनुभव कथन करावेत. खादाडमाऊ (सरळमार्गी)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6753
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

ट्रेन वरून आठवलं. मुंबईच्या लोकल मधे दरवाज्यात दाटीवाटीने उभं रहाणारे असे 'दोस्त' अंकल बरेच आहेत :) एकदा आमच्या ८:४१ च्या ग्रुप मधल्या मुलाशी एका दोस्ताने मैत्री करायचा प्रयत्न केला. दुसर्‍या दिवशी त्या दोस्ताला बोरिवली ते अंधेरी आमच्या कोपर्‍यात एकटाच बसवला होता :D

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

बरे झाले त्याला धडा शिकवला. पुन्हा कोणाच्या वाटेला नसेल गेला. खादाडमाऊ

तुमच्या लेखावरुन माझी पण एक आठवण जागी झाली... लातुरवरुन मि एकटाच ठाण्याला येत होतो. एसटी बरीच रिकामी होती आणी मि शेवटुन दुसर्‍या तिसर्‍या सिट वर एकटाच बसलो होतो. रात्री उशिराने झोप लागली आणी पहाटे पहाटे जाग आली ती कोणाचातरी हात माझ्या अंगावर फिरत होता ह्या जाणिवेनेच. डोळे पुर्ण उघडण्याआधीच मि त्याच्या हाताला जोरात सणकवली (Relex action). झटकन त्या माणसाने त्याचा हात काढला आणी चेहरा लपवला. मी बराच गोंधळलेलो होतो आणी कळत नव्हत कि काय झाल आणी काय चालु आहे. थोडावेळ वाटल कि ते एक स्वप्न होत पण ति व्यक्ती चेहरयावरचा हात काढायला तयार नव्हती. कपड्यावरुन ति व्यक्ती चांगल्या घरातली वाटत होती, डोक्यावर ट्क्कल पडल होत आणी वय कदाचीत ३०-३५ असाव. त्यानी कुठ्ला तरी खुपच चांगला परफ्युम मारला होता. थोड्यावेळाने लोणावळा आले आणी तो माणुस गडबडीने उठला, मि पण उठ्लो आणी कडंक्टरला जावुन सर्व सांगितले. तो हसला आणी म्हणाला मारलस कि नाही त्याला... मग मि बसमधुन उतरुन त्या माणसाला शोधु लागलो, पण तो काही मला दिसला नाही आणी परत बसमधे पण आला नाही. सरळमार्गी टुकुल.

जेव्हा कोणी पुरुष बाईकडे अश्या नजरेने पहातो किंवा अतिप्रसंग करतो तेव्हा तिला ही स्वतः विषयी असेच वाटत असावे बहूतेक...!!! अश्या पुरुषाच्या वर्तनामुळे त्या बाईला स्वत:विषयी घृणा किंवा कमीपणा वाटण्याचे काय कारण??

In reply to by विसोबा खेचर

अश्या पुरुषाच्या वर्तनामुळे त्या बाईला स्वत:विषयी घृणा किंवा कमीपणा वाटण्याचे काय कारण?? हेच म्हणतो !!! :)

अश्या पुरुषाच्या वर्तनामुळे त्या बाईला स्वत:विषयी घृणा किंवा कमीपणा वाटण्याचे काय कारण?? समजा बाईला तसे आवडत नसेल तर..? खादाडमाऊ

In reply to by योगी९००

आवडत नसेल हे ठीक, पण त्यामुळे स्वतःबद्दल घृणा कशाला वाटायला पाहिजे? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

माझे म्हणणे इतकेच की कदाचित घृणा वाटत असेल. वाटलीच पाहिजे असे काही नाही. व्यक्ती तितक्या प्रक्रुती. आणि एक गोष्ट सांगा, की तुम्ही "घृ" हा शब्द कसा टंकलिखित केला..? मी तुमच्याच प्रतिसादातील येथे चिकटवला आहे. खादाडमाऊ

गो नी दाण्डेकरान्चे आत्मचरित्र स्मरणगाथा नावाचे पुस्तक आहे. त्यात एक उल्लेख आहे. ते शाळेत असताना घरातून पळून गेले होते. बर्याच जागी अनेक बरीवाईट कामे केली. कष्ट केले. एकदा मुम्बईत असताना सिनेमाशी सन्बधित कुठल्यातरी स्टुडियोत बारिकसारिक कामे करत होते. तेव्हा एक मनुष्य त्यान्च्याशी खूप जिव्हाळ्याने वागत असे. पण त्याचा उद्देश वेगळाच होता. त्याने एकदा सन्धी साधून ह्या मुलाशी अतिप्रसन्ग केला. असला भयानक अनुभव दु:खद असणारच. ते वाचून मलाही खूप धक्का बसला. म्हणजे असली अवलाद फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे हे कळले.

योगी९००, भारी किस्से आहेत. तुम्ही बहुधा 'त्यां'च्या नजरेत मुग्धसुंदर ( innocent beauty ) असावेत. खूपशा आडमार्गींना सहमार्गींपेक्षा सरळमार्गी अधिक आवडतात असं निरीक्षण आहे. तत्संबंधी एक ( इंग्रजी ) लेख : https://www.pridelinks.com/random/why-are-some-gay-men-attracted-to-str… आ.न., -गा.पै.