नव्याने ...
लेखनविषय:
काव्यरस
बांधले आहेत आम्ही दोर जगण्याशी नव्याने
रोज घेतो जन्म आम्ही वैर मरणाशी नव्याने
कोरड्या डोळ्यात येथे आग नित्याचीच आहे
जोडले नाते जगाने यार सरणाशी नव्याने
भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना
जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्याने
जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी
नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्याने
रोज रस्ते शोधतो, वाटा नव्या धुंडाळतो मी
ओळखी होतात तेव्हा मग हरवण्याशी नव्याने
विशाल
वाचने
2928
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
छान
मस्तच
छान.
मस्त मस्त मस्त!
जिंकण्याचे भास होती रोज लढताना स्वत:शी नाळ जुडता वास्तवाशी, मैत्र हरण्याशी नव्यानेभारी आवडल
मन:पूर्वक आभार मंडळी !
खासच! एकेके शेर्/कडवे स्वतंत्रपणे आवडले!! एकूण परिणामही खासच!
मस्त गझल विशाल बाबू..
In reply to मस्त गझल विशाल बाबू.. by निवांत पोपट
अरे वा श्रेष्ठी, इथे आहात काय तुम्ही ? धन्यवाद.
जबरदस्त !!
सुंदर गझल!! मजा आली वाचून!!
शेवटची तीन कडवी जास्त आवडली.
मन:पूर्वक आभार मंडळी !
भाकरी किंवा कट्यारी काय निवडावे कळेना जोडती संबंध दोघी उदरभरणाशी नव्यानेये बात !
छान