मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

| विस्थापित वेदना |

पालीचा खंडोबा १ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
घे हळूच जाताना चुलीतील काही निखारे भर हीमवर्षावातही तरंगतात एकाकी शिकारे | निर्वासित म्हणूनी जाताना घे इथली थोडी माती डोंगरातील भग्न देवळे तुझ्या वाटेवर नजर लावती | लपून हळूच जातांनाही ठेव उघडे कवाड भावना गोठलेल्या गावात घरासही पडू दे गार | विसरू नकोस जाताना आहे पाठीशी पीर थोडेसे दान देऊनी जा वाट पाहील फकीर | पांढ-या कच्च बर्फात रक्तही दिसे ठसठशीत कितीही भय पसरू दे जा फकिरच्या कुशीत | भय पसरविणा-या काळाचा आहे फकिरास राग वेशीवरच्या उजाड मारुतीस काढू दे तुझा माग | फार जाऊ नको दूरवर जरी जाहलास विस्थापित यायचे आहे परत तुला बर्फ पडणा-या गावात | विजयकुमार ०७.०६.२००६

वाचने 1066 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सटक Mon, 11/30/2015 - 18:46
भय पसरविणा-या काळाचा आहे फकिरास राग
अप्रतिम!! Irony वापरायला कठीण गोष्ट आहे!!