मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्थी

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो होत होतो या जगी मी मानवी देहात ना!? पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो संपला हा जन्म इथवर भेटलो पुन्हा कुठे!!! याद माझी राहिली..तर सत्य-मुक्ति पावलो!

वाचने 9901 वाचनखूण प्रतिक्रिया 37

अभ्या.. 26/11/2015 - 20:32
बेस्ट बेस्ट गुर्जी "चित्र पाहत राहिलो" ह्या ओळीचा अर्थ काही लागेना. बाकी अप्रतिम रचना.

पियुशा 26/11/2015 - 20:49
ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न इकडे तुम्ही मिपाला घाबरावायच कॉन्ट्रैक्ट घेतल काय :प तरिपन कविता आवडली ऎसे नमूद करते :)

In reply to by गौरी लेले

सतिश गावडे 26/11/2015 - 21:08
गौरीशी सहमत.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 27/11/2015 - 15:14
मीही.

In reply to by बॅटमॅन

वपाडाव 27/11/2015 - 17:17
मीही

In reply to by वपाडाव

प्रसाद गोडबोले 27/11/2015 - 17:25
मीही

In reply to by प्रसाद गोडबोले

सस्नेह 27/11/2015 - 17:27
मीपण

परिकथेतील राजकुमार 26/11/2015 - 21:18
आवडेश एकदम.

एस 26/11/2015 - 22:08
कविता आवडली, कविता म्हणूनही आणि तत्त्वज्ञान म्हणूनही..!

नाखु 27/11/2015 - 15:11
मस्त कवीता... यमकी गुरुजींची खमकी कवीता

प्रियाजी 27/11/2015 - 15:30
कविता खूप आवडली. मनाला अंतर्मूख करून गेली. पण "होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?" ही ओळ मात्र कळली नाही.

अन्नू 27/11/2015 - 15:37
सुंदर कविता. आवडेश ___/\___

पालीचा खंडोबा १ 28/11/2015 - 14:58
काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो वाचून खुळा झालो ह्या दोन कडव्यात सगळे सार आहे हो