मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

DEADPOOL · · जनातलं, मनातलं
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत! प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये! १. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल. ३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये. आमच्या ओळखीने चितळे नामक दुकानात पदार्थ लवकर मिळत नाही! ५. रिकामे सल्ले देऊ नये, घरातील पोरं तुम्ही त्यांना सल्ला दिल्यावर हाताखालून काढतात हे आम्हास चांगले ठाऊक आहे. ६. "अय्या किती छान लिहितात तुम्ही" असे म्हणून आपल्या जिलेबिंवर चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करु नये,आमच्या वाड्यात आमची हरिश्चंद्र सीनियर म्हणून ख्याती आहे! ७. ही कथा कुठेतरी वाचली आहे म्हणून आम्हाला 'ट्रॅप'मध्ये अडकवायचा प्रयत्न करु नये.आमची एक लघुकथा महाभारत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे! ८. नसत्या चुका काढू नयेत. शालजोडित देण्यात येतील! ९. "बर झालं कधीचे जोडे नव्हते हो!" म्हणून अपमान करु नये. आम्ही नेहमी दोन नं. कमीच पाठवतो. १०. आता आपल्या जोड्याचा क्र. आम्हांस कसा माहित हे विचारू नये. असली क्षुल्लक कामे आम्ही शेरलॉक होम्स नामक घरगड्यास सोपवीतो! ११. आम्ही आठवड्यातून फक्त एकच भाग टाकतो. हे काम नसून परोपकार आहे याची आम्हांस जाणीव आहे. आणखी काही पथ्ये पुढच्या वेळी!

वाचने 22486 वाचनखूण प्रतिक्रिया 50

In reply to by पियुशा

DEADPOOL 26/11/2015 - 22:35
अहो जुन्या मायबोलीवर धुंद रवि यांचा 'माझी लुंगी खरेदी' हा लेख वाचा. जर पुन्हा लुंगी खरेदीसाठी गेलात तर ४ लुंग्या फ्री!!!!!

In reply to by पियुशा

मदनबाण 27/11/2015 - 15:17
@ DEADPOOL आहाहा... काय अप्रतिम दुवा दिलात ! दगडुशेठ गणपती दुवा देइल हो तुम्हाला ! ;) हसुन हसुन मुरकुंडी वळली...कं लिवलय कं लिवलय ! { ओय ट्वीटी, अपुन तेरुकु भी थांकु बोलरेला हय, तेराच प्रतिसाद वाचके अपुन लिंक उघणेका उध्योग किया. बोले तो फुल टु टाईमपास हो गया ना भिडु ;) } मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

In reply to by पियुशा

DEADPOOL 27/11/2015 - 20:48
पीयूषा, मदनबाण, बॅटमॅन याच धुंद रविंवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता!! असहिष्णुता ती हीच!

In reply to by पियुशा

अद्द्या 27/11/2015 - 10:43
तुमको पुनेमे लुंगी खरेदी नही पता?? ऐसा कैसा करते जी तुमे . . इधर उधार क बाता पता होणा जरा . लुंगी जैसे तो पता होणाच

In reply to by अद्द्या

पियुशा 27/11/2015 - 12:01
अण्णा हे आपल् अद्द्या मेरेकु कैसे पता होना ? पुणे कहाँ मै कहा ? वैसे लोग बाता करते पुणे तिथे काय उणे ये सब झुठ है ना ;)

आदूबाळ 26/11/2015 - 22:22
चांगलं आहे. "तुळशीबागेत भेटे तुला मी" असं व्याकरणसूद्द नाव असल्याने कथा वाचायची उच्छुकता ताणली गेली आहे.

नाखु 27/11/2015 - 09:03
मला वाटल पुण्यावर दुगाण्या झाडायचा मक्ता फक्त विजुभाऊंनी घेतलाय. चालायचंच टीआर्पी चा मोह कुणाला सुटलाय.भोग आहेत सगळे मिपाकराचे भोगा कर्माची फळे. -बाराच्या वर्गातला चौदावाला नाखुस

In reply to by नाखु

विजुभाऊ 28/11/2015 - 18:08
नाय वो. मी फक्त पुण्यातले आण्भव ल्हितोव. तुमी त्येल्ला धुगाण्या म्हंताय....... पुण्यातल्या आण्भवाला धुगाण्या म्हम्तात ह्येच म्हैत न्ह्वते.

नीलमोहर 27/11/2015 - 10:29
"तुळशीबागेत भेटे '' तुला मी" - पहिल्याच बॉलवर आऊट. पुणेकर चुकूनही भेटेल म्हणणार नाही, कोणाला म्हणूही देणार नाही ;)