Skip to main content

पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी विशाल (२६-११-२०१५)
लेखनविषय:

वाचने 4105
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

खूप छान!
क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी
अतिशय आवडले!

_/\_

नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी खुपच सुरेख अगदि मनतुन आलेलि वाटते खोलातुन

आवडली गझल...! उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी ह्य दोन ओळी खासच.....!

संपादक मंडळी, माझ्या प्रतिसादांचा काय गोंधळ झालाय बघणार का? उडवलेत तरी चालेल. फ़क्त मतल्यात 'आन्दणात' ऐवजी 'आंदणात'असा बदल करा कृपया.

वा! आजच्या तारखेचा विशेष संदर्भ आहे का?

क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी
खासच

खूप कमी बोलणारी आणि बरेच काही सांगून जाणारी कविता आवडली!

सुरेख झालीये गझल. एकदम कडक. फक्त दुस-या शेरातल्या दुस-या मिस-यात जरा मीटर गडबडलय का? (का मलाच तसं वाटतंय) म्हणजे तांत्रिकदृष्ट्या दोन 'ल' चा 'ग' होऊ शकतो. पण वाचताना गाडी अडखळतीये असं मला वाटलं. असा बदल केला तर:- किती पडाव सोडतो ईथे क्षणाक्षणात मी

गझलेत जर गरजेचेच असेल तर सुट घेण्याची परवानगी आहे. एका गुरु च्या ऐवजी दोन लघु , वृत्त बदलत नसेल तर चालतात. आता राहिला बदलतो च्या ऐवजी सोडतो चा वापर तर त्यामुळे शेराचा अर्थच बदलेल. ही सुट घेण्यापुर्वी मी गझलकारा क्रान्ति साडेकरांकडून खात्री करून घेतलेली आहे. धन्यवाद.