मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद · · जे न देखे रवी...
काव्यरस
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

वाचने 9403 वाचनखूण प्रतिक्रिया 16

पगला गजोधर 23/11/2015 - 11:51
वेड्याच्या बायकोने, केल्या होत्या जिलेब्या, तिकडून आला वेडा, त्याने डोकावून पाहिले, रिंगा रिंगा म्हणून त्याने खेळायला घेतलें, श्रीकांदा कमळकांदा असं कसं झालं, आसं कसं झालं माझ्या नशिबी आलं …

In reply to by पगला गजोधर

नीलमोहर 23/11/2015 - 12:14
किती दिवसांनी ऐकलं हे गाणं.. भोंडल्यातील आवडत्या गाण्यांपैकी आहे हे, पण ते श्री कांता, कमल कांता असंय ना ?

In reply to by नीलमोहर

पगला गजोधर 23/11/2015 - 12:16
श्री कांता, कमल कांता असंय टायपो..

अत्रुप्त आत्मा 23/11/2015 - 11:58
हही हही हही ! स्वामिज्जि की महान रचनाएँ

In reply to by विशाल कुलकर्णी

स्वामी संकेतानंद 23/11/2015 - 13:52
अर्रर्र आमची प्रेरणा 'विकु मांत्रिक' हे लिहायचे विसरलोच बघ!