धूसर राखाडी..
लेखनविषय:
धूसर राखाडी..
==================
.
.
क्षण क्षण जळताना..
कण कण होते राख..
राखे खाली..आत आत..
निखाऱ्याची गं धग..
.
क्षण क्षण विझताना..
कण कण धूर धूर..
दाटलेल्या हुंदक्यात..
धूसर धूसर आग..
.
अंग अंग राखाडी..
जळल्या निखाऱ्याच..
ठिणगी गाडलेली..
चटक्यात दावे राग..
.
.
==================
स्वाती फडणीस ..... २३-१२-२००८
वाचने
1357
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
ठिणगी
मनापासून आभार!