उद्दाम
लेखनविषय:
काव्यरस
ना गावही तो राहिला ठाम पहिल्यासारखा
ना काळही भासे अता उद्दाम पहिल्यासारखा
त्या वादळाला सांग ना थांबायला आता जरा
प्रगतीस नाही वेग तो बेफाम पहिल्यासारखा
आता पुन्हा मिरवेन मी बुरखा जुना, समजा जुन्या
नाही जमाना राहिला बदनाम पहिल्यासारखा
झालो अता बघ मोकळा वागायला मजसारखा
ना राहिलो माझ्यात मी सुतराम पहिल्यासारखा
जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो
भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा
विशाल
वाचने
4096
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
झक्कास
आता पुन्हा मिरवेन मी बुरखा जुना, समजा जुन्याही ओळ शेवटच्या 'जुन्या' शब्दामुळे समजली नाही. तुम्हांला 'जुना' असे म्हणायचे होते का?
In reply to आता पुन्हा मिरवेन मी बुरखा by एस
'समज' म्हटले असते तर 'जुने' घ्यावे लागले असते, ते फिटिंगला नै बसत.
'समज'चे अनेकवचन 'समजा' घेतले तर 'जुने' चालत नाही, फिटिंगला बसत नै.
म्हणून 'जुन्या'..... असा काव्यकूट असावा.
बाकी रचना सुरेख.
In reply to 'समज' म्हटले असते तर 'जुने' by शिव कन्या
अगदी बरोबर शिव कन्या !
धन्यवाद..
In reply to आता पुन्हा मिरवेन मी बुरखा by एस
धन्यवाद एस. मला असे वाटतेय की 'समजा' हां शब्द तुम्ही "बुरखा जुना आहे असे समजा" या अर्थाने घेताहात. त्या अर्थी जर घेतला तर तिथे 'जुना' हां शब्द चपखल बसेल. परंतु हे दोन्ही वेगवेगळी उदाहरणे आहेत. बुरखा आणि खालील प्रतिसादात शिव कन्या यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे 'समज'चे अनेक वचन म्हणून 'समजा'. असे आहे, त्यामुळे "जुन्या समजा", जैसे जुन्या गोष्टी, जुन्या वह्या, जुन्या कल्पना.
In reply to धन्यवाद एस. मला असे वाटतेय की by विशाल कुलकर्णी
एक समज (ती समज; तो समज नव्हे)
अनेक समजा (स्त्रीलिंगी म्हणून समजा; अन्यथा अनेक समज (ते) असंही होतं.)
ती समज जुनी
त्या समजा जुन्या.
अर्थाने तो समज असं अभिप्रेत आहे कवीला, माझ्या मते.
पण कवीचा अधिकार म्हणून इथे त्या समजा असं म्हटलंय असं मानलं तरी हरकत नाही असं वाटतं.
इट फिट्स इन वेल.
सुरेख ग़ज़ल.
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahiraझकास!!
मख्खन में गर्म छुरी जमले आहे बॉस!
गझल मस्त जमली
वा!!!
धन्यवाद मंडळी _/\_
व्वा रे वाह
वृत्त वगैरे भानगडी समजत नाहीत पण ही गझल आहे का? साधारण बाज तसाच वाटला. बाकी सुरेख!
बहोत अच्छे।
सुरेख!
धन्यवाद मंडळी
वृत्ताचे नाव काय?
झक्कास