ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू
"धिस इज युवर न्यू कॅप्टन स्पीकिंग, द प्लेन हॅज बीन हायजॅक्ड..!!!!"
हे वाक्य स्पीकरवर उच्चारले गेले आणि प्रत्येक प्रवासी भीतीने हादरला..
फ्लाईट १३९, तेल-अवीवहून पॅरिसला जाणार्या एअर फ्रान्सच्या विमानाने अथेन्स येथे नेहमीचा थांबा घेतला, काही नवीन प्रवासी पॅरिसला जाण्यासाठी विमानात चढले. नेहमीचे सोपस्कार पार पाडून विमानाने उड्डाण केले. उड्डाण करून स्थिरस्थावर होत असतानाच अचानक गडबड उडाली. फर्स्ट क्लासमधले दोन जण - एक पुरुष व एक स्त्री तर इकॉनॉमी क्लासमधले दोन पुरुष जागेवरून उठले व विमानाच्या पुढच्या भागाकडे धावू लागले. त्यातील दोघे जण कॉकपीटकडे गेले, त्यांनी कॅप्टनच्या कानाजवळ बंदूक टेकवली व विमान ताब्यात घेतल्याची घोषणा केली. बाकी दोघे जण प्रवाशांजवळच थांबले. पिन काढलेल्या हँड ग्रेनेड्सची आणि बंदुकांची दहशत विमानामध्ये पसरली.
आपले अपहरण झाले आहे हे लक्षात येत असतानाच प्रवाशांना स्पीकरवरील घोषणा ऐकू आली.
"धिस इज युवर न्यू कॅप्टन स्पीकिंग, द प्लेज हॅज बीन हायजॅक्ड."
विमानामध्ये थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २५६ प्रवासी होते. अपहरणकर्ते कोण आहेत.. त्यांच्या मागण्या काय असतील.. आपल्याला जगाच्या पाठीवर कोणत्या देशात नेले जाईल.. आपले सरकार मदत करेल का.. या व अशा प्रकारच्या उत्तरे माहीत नसलेल्या प्रश्नांच्या काळजीमध्ये प्रवासी बुडून गेले.
दहशतवाद्यांनी सर्वप्रथम विमानाची संपूर्ण संपर्कयंत्रणा बंद करून जगाशी संपर्क तोडला, विमानामध्ये असलेल्या प्रवाशांवर व मुख्यत: कॉकपीटवर नियंत्रण प्रस्थापित केले.
फ्लाईट १३९ची शांतता सर्वप्रथम टिपली ती इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणांनी. त्यांनी तत्काळ पंतप्रधान यित्झॅक राबीन यांना सावध केले. "बहुतांश इस्रायली प्रवासी असलेल्या एअर फ्रान्सच्या विमानाचा संपर्क तुटला असून ते कोसळल्याची किंवा त्याचे अपहरण झाल्याची शक्यता आहे."
यित्झॅक राबीन यांना 'मेसेज' मिळाला तो क्षण..
राबीन यांनी तत्काळ पावले उचलली. "जर हे अपहरण असेल, तर सर्व प्रकारची माहिती मिळवा" असे स्पष्ट आदेश दळणवळण मंत्री गिड याकोबी यांना दिले. विमानाची सद्य:स्थिती व शक्य असेल ती सर्व माहिती पंतप्रधानांना व सैन्याधिकार्यांना कळवत राहण्याची सूचना दिली, सर्व इस्रायली विमानतळांवर हाय अॅलर्ट जाहीर केला आणि विमान इस्रायलमध्ये परत आले तर तयारी असावी म्हणून इस्रायली सैन्याच्या स्पेशल युनिटला कोणत्याही क्षणी हल्ला करण्यास तयार राहण्याचे आदेश दिले.
इकडे विमानात शांतता पसरली होती. जीवघेणी शांतता.
'पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ द पॅलेस्टाईन'च्या दोन आणि जर्मन क्रांतिकारकांच्या दोन अशा चार दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले आहे, हे कळल्यावर प्रत्येक प्रवासी मुळापासून हादरला. त्यातही ज्यू प्रवाशांना PFLPचे नाव ऐकून धडकी भरली. PFLPने या आधी पार पाडलेली क्रूर दहशतवादी कृत्ये कोणीही विसरणे शक्य नव्हते. इस्रायलमधील लॉड विमानतळावरचे हत्याकांड आणि म्युनिक ऑलिंपिकमध्ये केलेले ११ खेळाडूंचे शिरकाण यातून अजून इस्रायल सावरत असतानाच हे नवीन संकट कोसळले होते.
सर्व प्रवासी बदललेल्या घटनांशी स्वतःला हळूहळू जुळवून घेत होते. दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले आहे हे एव्हाना प्रवाशांना कळून चुकले होते. काहीतरी चूक असेल, एखाद्याने केलेली जीवघेणी फजिती, एखादे नको असणारे स्वप्न वगैरे सर्व शक्यता निकालात निघाल्या आणि आता आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास प्रवासी सज्ज झाले. दहशतवाद्यांनी प्रवाशांची झडती घेणे सुरू केले. कोणाकडे प्रतिकार करण्याजोगे काही असेल आणि त्याचा आपल्याविरूद्ध वापर होऊ शकतो, असे सगळे सामान प्रवाशांकडून काढून घेतले गेले. प्रवाशांकडे असलेले काटे-चमचेही काढून घेण्यात आले.
थोड्या वेळाने दहशतवाद्यांनी एका मोठ्या पिशवीमध्ये सगळ्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सुरूवात केली. पासपोर्टचा वापर करून प्रवाशांना वेगळे करणे सोपे जाणार होते.
दहशतवाद्यांनी विमान लिबियाकडे वळवले. सर्व काही माहीत असल्याप्रमाणे फ्लाईट १३९चे स्वागत करण्यास बेनगाझी विमानतळ सज्ज होता. त्यांनी विमानाला उतरण्याचा मार्ग दाखवला, दूरवरच्या प्रवासासाठी विमानात पेट्रोल भरले. दहशतवाद्यांनी बेनगाझी कंट्रोल टॉवरमधील अधिकार्यांशी चर्चा केली आणि पुढील प्रवासासाठी विमान सज्ज झाले.
विमान लिबियाकडे जाताना विमानात आणखी एक नाट्य घडत होते, अपहरणातील अनिश्चितता सहन न होऊन 'पॅट्रिशिया मार्टेल' या ब्रिटिश प्रवासी महिलेने रक्तदाब आणि गर्भवती असताना होणारा रक्तस्राव अशा गंभीर लक्षणांची बतावणी केली. एकंदर गुंतागुंतीच्या लक्षणांमुळे अपहरणकर्त्यांनी बेनगाझी येथे पॅट्रिशियाची सुटका केली.
विमानाने पुन्हा उड्डाण केले. अपहरणकर्ते सोडले, तर कुणालाही माहीत नव्हते की आपण कोठे चाललो आहोत.
ब्रिटिश नागरिक असली, तरी पॅट्रिशिया मूळची ज्यू होती. एका खास विमानाने लंडनला येईपर्यंत कोणतीही माहिती देण्यास नकार देणार्या पॅट्रिशियाने लंडनला उतरल्यानंतर स्कॉटलंड यार्डसमोर दहशतवादी आणि विमानाची परिस्थिती विस्तृतपणे विशद केली. प्रवाशांची एकंदर मन:स्थिती आणि बेनगाझीवरची तयारी याचेही वर्णन केले आणि एक अंदाज वर्तवला की विमान मध्य आफ्रिकेमध्ये कुठेतरी इस्रायलविरोधी राष्ट्राचा आसरा घेईल.
यथावकाश राबीन यांनी इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये अपहरणाची माहिती दिली. अनेक देशांचे नागरिक विमानामध्ये असले, तरी इस्रायल हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे व इस्रायल आपल्या पद्धतीने दहशतवाद्यांशी सामना करेल असेही सांगितले.
राबीन यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते 'मेनाकिम बेगीन' उभे राहिले व त्यांनी राबीन यांच्या सरकारला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. "ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, तर आलेल्या अवघड संकटाला सर्वांनी मिळून तोंड द्यायचे आहे" अशा शब्दात त्यांनी राबीन यांना आश्वस्त केले.
एव्हाना या अपहरणाची बातमी जगभर पसरली होती. डझनभर देशांचे नागरिक या विमानातून प्रवास करत असल्याने त्या त्या देशांचे सरकार पुढची पावले काय उचलायची यावर विचारविनिमय करू लागले. दहशतवाद्यांच्या मागण्यांची वाट पाहू लागले.
आपले अपहरण झाले आहे हे प्रवाशांनी मान्य केले होते व परिस्थितीला सध्या तरी शरण गेले होते. अपहरणकर्त्यांचे आदेश मान्य करत आपापल्या कुटुंबीयांची काळजी करत प्रवासी झोपण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अनिश्चितता आणि बंदुका-ग्रेनेडच्या धाकामुळे सहज झोप येणेही शक्य नव्हते. बराच वेळ विमान उडत होते. लिबियाहून टेकऑफ घेतलेले विमान एकदाचे एंटबेला पोहोचले.
एंटबे, युगांडा, पूर्व अफ्रिका. क्रूरकर्मा इदी अमीन येथे सत्तेवर होता.
आपल्याच देशाच्या जवळजवळ ३ लाख नागरिकांची निर्घृण हत्या करून इदी अमीनने सत्ता बळकावली होती. इस्रायलचे एकेकाळचे मित्रराष्ट्र असलेले युगांडा आता मात्र इस्रायलचे कट्टर शत्रुराष्ट्र होते. युगांडाच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यापासून ते लष्करी विमानतळ उभारणीपर्यंत अनेक कामे इस्रायलने पार पाडली होती. अनेक परस्पर गरजांच्या पायावर उभ्या राहिलेल्या या मैत्रीचा शेवट झाला १९७२मध्ये, जेव्हा इस्रायलने युगांडाला जेट विमाने देण्यास नकार दिला. मैत्री संपुष्टात आल्यानंतर युगांडामधले इस्रायली तळ हलवण्यात आले.
एंटबेला युगांडाचे सैनिक विमानाची वाटच पाहत होते. विमान उतरल्यानंतर PFLPचे आणखी दहशतवादी विमानातील दहशतवाद्यांना मिळाले. या संपूर्ण विमानप्रवासामध्ये शिणलेल्या दहशतवाद्यांना थोडी उसंत मिळाली. प्रवाशांना फार थोडी उत्तरे मिळाली होती. तसेच नवीन प्रश्नही तयार होत होते. "एंटबे, युगांडा हे जगाच्या नकाशावर नक्की कोठे आहे?"पासून ते "इदी अमीन आपल्याला कधी ठार मारणार?" पर्यंत प्रश्नांचा परीघ तयार झाला होता आणि आता तो वाढतच चालला होता.
एंटबेला विमान उतरले आहे हे कळताक्षणी इस्रायली गुप्तहेर सतर्क झाले. कितीही म्हटले तरी युगांडाशी त्यांचा खास ऋणानुबंध होता. इस्रायल-इदी अमीन मैत्रिपर्वामधे इस्रायली सैन्याने आणि गुप्तहेरांनी युगांडामध्ये बराच काळ घालवला होता. मात्र सद्य:स्थितीचा विचार करायचा, तर इस्रायली सैन्याला आणि गुप्तहेरांना युगांडामधून बाहेर पडून तब्बल तीन वर्षे उलटली होती.
पंतप्रधान राबीन यांनी सर्वप्रथम पांच इस्रायली नेत्यांचा एक टास्क फोर्स स्थापन केला. त्यामध्ये होते स्वत: राबीन, सैन्यदलप्रमुख मोर्देचाय गुर, हवाईदलप्रमुख बेनी पेलेद आणि असेच महत्त्वाच्या पदांवरचे अधिकारी. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय राखून येणार्या माहितीचा ओघ सुसूत्रित करण्याची जबाबदारी दिली. लष्कराला एखादी कारवाई शक्य आहे का याची चाचपणी करण्याची सूचना दिली. परराष्ट्रखाते आणि त्यासंबंधी अधिकार्यांना अपहरणकर्त्यांशी बोलणी करण्याची तयारी करण्यास सांगितले.
या टास्क फोर्समध्ये असलेला प्रत्येक जण स्वतः एक दंतकथा होता. इस्रायलच्या स्थापनेपासून प्रत्येक युद्धामध्ये पराक्रम गाजवलेले स्वतः पंतप्रधान राबीन असोत वा स्वतः बेनी पेलेद. प्रत्येकाने इस्रायलच्या उभारणीमध्ये अजोड कामगिरी केली होती. अत्यंत मोक्याच्या क्षणी अत्यंत थंड डोक्याने योग्य निर्णय घेणार्या बेनी पेलेद यांची टास्क फोर्समध्ये निवड होणे साहजिकच होते आणि त्याला कारणीभूत होती एक अविश्वसनीय घटना...
यॉम किप्पूर युद्धादरम्यान बेनी पेलेद एका पत्रकार परिषदेमध्ये हवाईदलाची एकंदर कामगिरी सांगत असताना त्यांच्या साहाय्यकाने एक बातमी आणून दिली. बेनी पेलेद यांनी ती बातमी वाचली व जाहीर केले की "आताच हाती आलेल्या बातमीनुसार आपले आणखी एक विमान सीमेपलीकडे विमानविरोधी तोफांना बळी पडले आहे"
नंतर अर्धा-पाऊण तास पत्रकारांच्या चिकित्सक प्रश्नांना शांतपणे उत्तरे देऊन झाल्यानंतर पत्रकार परिषद संपली व बेनी पेलेद यांचा एक पत्रकार मित्र त्यांना भेटायला आला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्याने पेलेद यांच्याकडे चौकशी केली की त्या बळी पडलेल्या विमानाच्या पायलटचे नाव कळले आहे का? अत्यंत शांतपणे व तोल ढळू न देता पेलेद यांनी सांगितले की "हो. नाव कळले आहे. तो माझा मुलगा होता"
(पेलेद यांच्या मुलाने जळत्या विमानातून सुरक्षितपणे जमिनीवर उडी मारली व दिवसभर शत्रुसैन्याला झुकांडी दिली. त्यानंतर काही तासांनी इस्त्रायली सैन्याच्या एका तुकडीने त्याला सीमेपलीकडून उचलले व इस्त्रायली भूमीवर सुखरूप आणले.)
इस्रायली लष्कराने इदी अमीन, एंटबे आणि अपहरणकर्ते व त्यांची संघटना यांबाबत शक्य तितकी माहिती काढण्यास सुरूवात केली.
इस्रायल-युगांडा मैत्रिपर्व सुरू असताना इस्रायली लष्करानेच एंटबे विमानतळाची अनेकवेळा डागडुजी आणि अनेक ठिकाणी बांधकाम केले होते. 'सोलेल अँड बोनेह' या इस्रायली कंपनीने कित्येक इमारती बांधल्या होत्या. त्या बिल्डिंगचे नकाशे आणि आराखडे कांही तासातच मिळाले.
पॅट्रिशिया मार्केल, बिल्डिंगचे आराखडे, सुटका झालेले प्रवासी या सर्वांकडून माहितीचा ओघ सुरू होता. जगभरात जेथे जेथे माहिती मिळण्याची शक्यता होती, तेथे इस्रायली तुकड्या पोहोचल्या होत्या आणि माहिती मिळवून शक्य त्या मार्गाने इस्रायलमध्ये पोहोचवली जात होती.
एका इस्रायली एजंटने ओळख बदलून आणि विमानामध्ये बिघाड झाल्याची बतावणी करून एंटबेवर अनेक चकरा मारल्या व बहुमूल्य असे फोटो मिळवले.
वाटाघाटी करण्यासाठीही इस्रायलचे परराष्ट्रमंत्री आणि अनेक उच्चाधिकारी यांची एक टीम तयार केली गेली. त्या टीमलाही लष्कराच्या हालचालींचा सुगावा लागू दिला गेला नाही.
वाटाघाटींचा एक भाग म्हणून इदी अमीन यांचा इस्रायली सल्लागार आणि सध्या निवृत्त असलेल्या कर्नल बारलेव्ह यांच्यावर इदी अमीनशी बोलण्याची आणि त्याचे मन वळवून प्रवाशांच्या सुटकेची मागणी करण्याची जबाबदारी सोपवली.
दहशतवाद्यांनी आपल्या मागण्या जाहीर केल्या.
५ मिलियन डॉलर्स आणि त्रेपन्न दहशतवाद्यांची सुटका. यातले ४० दहशतवादी इस्रायलच्या ताब्यात होते.
पंतप्रधान राबीन यांनी लष्करी आणि राजकारणी या दोन्ही मार्गांची तयारी सुरू केली, त्यालाही एक कारण होते. दहशतवाद्यांशी कसा सामना करायचा याबाबतही इस्रायलमध्ये मतभेद होत होते. एक फळी म्हणत होती दहशतवाद्यांशी वाटाघाटी करू या, बोलणी करून यातून मार्ग निघेल. लष्करी फळीचे मात्र याबाबत एकच ठाम मत होते. दहशतवाद्यांना इशारा द्यायचा असेल तर लष्करी कारवाई हा एकमेव मार्ग आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई झालीच पाहिजे यामध्ये सैन्याधिकार्यांचे एकमत होते. अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरून विविध प्रकारचे कारवाईचे मनसुबे आखले जात होते. त्यामध्ये योग्य ते बदल करून असे आराखडे संरक्षणमंत्री आणि पंतप्रधाना यांना दाखवले जात होते. मात्र नेमके तपशील मिळाल्याशिवाय आणि त्यांचा कसून सराव झाल्याशिवाय कोणत्याही कारवाईला परवानगी मिळणार नाही, असे पंतप्रधान राबीन यांनी बजावले.
एंटबेवर असलेल्या प्रवाशांवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. इतक्या लांब कोणतीही लष्करी कारवाई शक्य नाही ही वस्तुस्थिती होती आणि याची सर्व प्रवाशांना स्पष्ट कल्पना होती. आता एखादा चमत्कारच आपल्याला वाचवू शकेल अशी स्वत:ची समजूत घालून घेऊन प्रवाशांनी स्वत:ला नियतीच्या स्वाधीन केले होते.
सर्व प्रवाशांना जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये ठेवले होते. एकत्र. कसेही. पुढे काय होणार हा यक्षप्रश्न घेऊन जीवनमरणाच्या सावलीमध्ये हे प्रवासी दिवसभर पडून राहत होते. रिकामा वेळ, अपहरणकर्त्यांचा धाक आणि ताणतणाव यामुळे अनेक प्रवासी आजारी पडत होते. एंटबे विमानतळावरील डॉक्टर शक्य होईल तितके उपचार करत होते. मात्र त्यालाही मर्यादा होतीच!
दिवसाच्या कोणत्याही वेळी अचानक सैनिकाची धावपळ उडे, शांतता पसरे व बिग डॅडी - काळाकभिन्न महाकाय इदी अमीन प्रवाशांना भेटायला येई.. प्रवाशांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय मदत करता येईल हे जाणून घेण्यासाठी आणि त्याची माहिती जगभरतात पोहोचवण्यामध्ये इदी अमीन तत्पर पावले उचलत होता. मात्र दहशतवाद्यांच्या व त्याच्या मैत्रिपूर्ण संबंधांवर बोलताना अत्यंत सावधपणे व वेळप्रसंगी विषय बदलून वेळ मारून नेत होता. एंटबेला उतरल्यानंतर दुसर्याच दिवशी एक बातमी प्रवाशांमध्ये पसरली. आता कोंडी फुटायला सुरूवात होईल या आशेने अनेक प्रवाशांना हायसे वाटले. अपहरणकर्त्यांनी ४७ प्रवाशांना सोडण्याची तयारी दाखवली. तिसर्याच दिवशी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १०० प्रवासी सोडले गेले. आता दहशतवाद्यांच्या आणि युगांडन सैनिकांच्या ताब्यात फक्त इस्रायली नागरिक होते.
या दरम्यान एअर फ्रान्सच्या वैमानिकाने - कॅप्टन मायकेल बाकोसने एक धाडसी निर्णय घेतला. "सुटका न झालेले इस्रायली नागरिक हे एअर फ्रान्सचे प्रवासी असल्याने त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही एंटबेहून परत जाऊ शकत नाही" असे सांगून इतर प्रवाशांसोबत जाण्यास नकार दिला. कॅप्टन बाकोसच्या सर्व सहकार्यांनी एकजूट दाखवत या निर्णयाला पाठिंबा दिला.
ज्यू प्रवासी आता जुन्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये एकाच भल्यामोठ्या दालनामध्ये कसेही विखुरले गेले होते. अनेक प्रवाशांना हगवण, डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत होता. विचित्र मन:स्थिती, गैरसोय आणि सवय नसलेले अन्न खाऊन बहुतेक जण आजारी पडले होते.
जुनी टर्मिनल बिल्डिंग
अचानक बातमी आली - इस्रायलने दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य केल्या! अनेक जण खूश झाले. आता आपण आपल्या कुटुंबीयांना भेटणार, आपण जिवंत राहणार, अपहरणकर्त्यांच्या धाकातून आपली सुटका होणार ही वस्तुस्थिती पचण्यास थोडा वेळ गेला. मात्र प्रवाशांमध्येच एक गट असाही विचार करत होता की "माझ्यामुळे इस्रायलला गुडघे टेकावे लागत आहेत." प्रवाशांमध्येही जणू वैचारिक युद्ध सुरू झाले होते.
त्या दिवशी संध्याकाळी इदी अमीनने प्रवाशांना भेटून बातमी दिली की "इस्रायलने अजून मागण्या मान्य केलेल्या नाहीत व आणखी दोन दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर अपहरणकर्ते काही प्रवाशांना ठार करतील."
अनेक जण रडू लागले. त्यांनी मनातच बांधलेले इमले धाडकन कोसळले. पुन्हा अनिश्चितता, पुन्हा बंदुकांचे धाक, ताणतणाव आणि मरणाची भीती.
या दरम्यान कधीतरी जेवताना डोरा ब्लॉक या ओलीस आजीबाईंच्या घशात घास अडकला. त्यांना कंपाला येथील इस्पितळात पुढच्या उपचरांसाठी हलवण्यात आले.
दहशतवादी आता विसावले होते. युगांडन सैनिक दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करत होते.
कर्नल बारलेव्ह इदी अमीनसोबत बोलत होते, सुटकेसाठी आवाहन करत होते मात्र इदी अमीनवर कोणताही फरक पडत नव्हता.
इस्रायलच्या बाजूने वाटाघाटी करणार्यांनाही फारसे यश येत नव्हते. ४० दहशतवादी सोडले, तर एक एंटबे संपतासंपता असे अनेक एंटबे उभे राहतील.. त्या वेळी इस्रायल त्या परिस्थितीला कसे तोंड देणार याची कल्पनाही टास्क फोर्स करू शकत नव्हते.
इकडे इस्रायलची लष्करी आघाडीवर जय्यत तयारी सुरू झाली होती.
इस्रायली अधिकारी सर्व शक्यतांचा विचार करून लष्कराकडून सराव करून घेत होते. अनेक लष्करी अधिकार्यांकडून आलेले कारवाईचे आराखडे पंतप्रधानांच्या टास्क फोर्सने फेटाळल्यानंतर ब्रिगेडियर डॅन शॉमेरॉनने एक वास्तववादी आराखडा दिला.
इस्रायली हवाईदलाची चार C130 हर्क्युलस विमाने (यांना 'हिप्पो' असेही एक नाव आहे) इस्रायलहून उड्डाण करतील, लष्करी जीप आणि ट्रकचा एक ताफाही या विमानांमध्ये असेल. इस्रायलहून उड्डाण केल्यानंतर जमिनीलगत उड्डाण करून व शत्रुराष्ट्राच्या रडारना चकवा देऊन ही विमाने एंटबेला पोहोचतील. सोबत दोन बोईंग विमाने असतील, ज्यामध्ये एक असेल बेनी पेलेद यांचे कार्यालय. तर दुसर्या बोईंगमध्ये हॉस्पिटल तयार केले जाईल व एंटबे विमानतळावर होणार्या चकमकीमध्ये जखमींवर या विमानात उपचार होतील. इस्रायल ते युगांडा या गेलेल्या मार्गानेच विमाने परत येतील असेही ठरले. या कारवाईच्या आराखड्यासोबत अनेक नवीन प्रश्न उभे राहिले.
C130 हर्क्युलस - "हिप्पो"
तेल अवीव ते एंटबे विमानांचा मार्ग
तेल-अवीव ते एंटबे हे जवळजवळ २५०० मैलांचे अंतर आहे. आणि हा संपूर्ण मुलूख शत्रुराष्ट्रांनी व्यापलेला आहे. शत्रुराष्ट्रांच्या रडारना गुंगारा देऊन इतका मोठा प्रवास करणे आवश्यक होते. तेल अवीव-एंटबे-तेल अवीव एकून ५००० मैलांच्या प्रवासामध्ये वाटेत किमान एका ठिकाणी इंधन भरल्याशिवाय कोणतेही विमान इतका प्रवास करू शकत नाही. वाटेत इंधन कोठे घ्यायचे याची चाचपणी करण्यास सुरुवात झाली.
एंटबे विमानतळाची सद्य:स्थिती आणि ओलिसांचा नक्की ठावठिकाणा आणखी एकदा पडताळून पाहण्यात आला.
एखाद्या विमानाची एंटबेला पोहोचताना होणारी नादुरुस्ती किंवा एंटबे विमानतळावर होणार्या हल्ल्यादरम्यान विमानाला काही झाले, तर राखीव म्हणून एक बोईंग कमांडो कारवाईदरम्यान आकाशात घिरट्या घालत राहील व वेळप्रसंगी एंटबेच्या विमानतळावर उतरेल, या विमानामध्ये हवाईदलप्रमुख बेनी पेलेद आणि त्यांचे निष्णात तंत्रज्ञ असतील, एंटबे विमानतळावर एकाच वेळी होणार्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये संदेशवहन आणि समन्वय राखण्याचे काम बेनी पेलेद या राखीव बोईंगमधून करतील.
जनरल गुर ऑपरेशनचा आढावा घेताना..
एका हिप्पोचा पायलट..
या फोटोमध्ये खांद्यावर फीत लावलेल्या गणवेशामध्ये कॅप्टन माईकेल बाकोस दिसत आहे. संपूर्ण ओलीसनाट्यादरम्यान दाखवलेल्या असामान्य धैर्याबद्दल कॅप्टन बाकोसला आणि त्याच्या सहकार्यांना फ्रेंच आणि इस्रायली सरकारकडून मानाचे पुरस्कार दिले गेले.
हीच ती मर्सिडीज गाडी.
याच कंट्रोल टॉवरमध्ये ओलीस एक आठवडा राहिले होते. येथेच योनी नेतान्याहूने आपले प्राण गमावले.
आजही एंटबे विमानतळावर असणारी ऑपरेशन जोनाथनची आठवण..!!
संपूर्ण कारवाईचा एक आराखडा..
*******************************************
यानंतर जगभरात खळबळ उडाली. इस्रायलने केलेल्या या धाडसी कारवाईचे पडसाद 'युनायटेड नेशन्स'मध्येही उमटले.
युगांडा, टांझानिया आणि सोमालियाच्या प्रतिनिधींनी या ऑपरेशनबद्दल इस्रायली प्रतिनिधींवर कडाडून हल्ला चढवला व कारवाईची मागणी केली. मात्र इस्रायली राजदूत केम हेरझॉग यांनी अत्यंत ओजस्वी भाषण करून प्रत्येक मुद्द्याचा योग्य समाचार घेतला. पश्चिम जर्मनी, अमेरिका, इंग्लंड आणि बहुतांश पश्चिम राष्ट्रांनी इस्रायलचे या अचाट धाडसाबद्दल अभिनंदन केले. इस्रायलवर कोणतीही कारवाई न करता युनायटेड नेशन्सची बैठक संपली.
केम हेरझॉग यांच्या भाषणातील एक उतारा -
We come with a Simple message to the council: We are proud of what we have done, because we have demonstrated to the world that in a small country, in Israels's circumstances, with which members of this Council are by now all too familiar, the dignity of man, human life and human freedom constitutes the highest values. We are proud not only because we have saved the lives of over 100 innocent people- men, women and children- but because of the significance of the our act for the cause of Human Freedom.
सुरुवातीला 'ऑपरेशन थंडरबोल्ट' नावाने ओळखल्या जाणार्या या कारवाईचे नाव योनी नेतान्याहूच्या स्मरणार्थ 'ऑपरेशन जोनाथन' असे बदलले गेले.
कंपाला येथील इस्पितळात असलेल्या डोरा ब्लॉक यांना इदी अमीनच्या आदेशावरून ठार मारण्यात आले.
*******************************************
सर्व माहिती व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.
या घटनेवर 90 Minutes at Entebbe आणि Assault at Entebbe ही इंग्लिश, तर 'किबुत्झमधला डॅनी येथे आला होता' हे मराठी पुस्तक मी वाचले आहे. त्यामधील थोडीफार माहिती वरील लेखामध्ये आहे. याशिवाय अन्य कोणतेही पुस्तक माहीत असल्यास कृपया कळवावे.
*******************************************

दिवाळी अंक वर्ष
वाचन
73866
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
९० मिनटस अॅट एन्टीबी या
जबरदस्त
शब्दांतून थरार मांडणं
काउंटर इंसर्जंसी ऑप्स अन
मस्त रे
फँटास्टिक!
थरार
जब्बरदस्त!!!!
प्रचंड राजकिय इच्छाशक्तीचे उदाहरण
In reply to प्रचंड राजकिय इच्छाशक्तीचे उदाहरण by आरोह
correct
In reply to correct by पगला गजोधर
कंदाहार विमान अपहरण
कंदाहार विमान अपहरणगाडी या चर्चेवर येणार याची अपेक्षा होतीच, कृपया या विषयांवर श्रीरंगपंत जोशी यांचा काठमांडू ते कंदहार आणि माझा काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814 हे दोन धागे वाचावेत व तेथे जरूर ती चर्चा करावी. येथे इतकेच.ऑपरेशन एन्टेबी याच नावाने
इस्त्रायलची गरुडझेप - ऑपरेशन एन्टेबी (लेखक - रविंद्र गुर्जर)
In reply to इस्त्रायलची गरुडझेप - ऑपरेशन एन्टेबी (लेखक - रविंद्र गुर्जर) by स्पार्टाकस
धन्यवाद. हे पुस्तक वाचले आहे.
लेख आवडलाच. चित्रपट पहिला आणि
In reply to लेख आवडलाच. चित्रपट पहिला आणि by खेडूत
+१
In reply to +१ by चाणक्य
धन्यवाद. हे व्याख्यानही ऐकले
धर्माधिकारी यांचं हे व्याख्यान पण जोरदार आहे.+११११अप्रतिम
अतीव थरारक घटना आणि मोदक
मस्त रे झकास झालाय लेख,
लेख छान
In reply to लेख छान by पगला गजोधर
माझ्या माहितीप्रमाणे मोशे
In reply to माझ्या माहितीप्रमाणे मोशे by मोदक
चुक दुरूस्त केल्याबद्दल
एका अचाट साहसाची सुंदर ओळख !
राबीन यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते 'मेनाकिम बेगीन' उभे राहिले व त्यांनी राबीन यांच्या सरकारला विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. "ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, तर आलेल्या अवघड संकटाला सर्वांनी मिळून तोंड द्यायचे आहे" अशा शब्दात त्यांनी राबीन यांना आश्वस्त केले.नंतर अर्धा-पाऊण तास पत्रकारांच्या चिकित्सक प्रश्नांना शांतपणे उत्तरे देऊन झाल्यानंतर पत्रकार परिषद संपली व बेनी पेलेद यांचा एक पत्रकार मित्र त्यांना भेटायला आला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्याने पेलेद यांच्याकडे चौकशी केली की त्या बळी पडलेल्या विमानाच्या पायलटचे नाव कळले आहे का? अत्यंत शांतपणे व तोल ढळू न देता पेलेद यांनी सांगितले की "हो. नाव कळले आहे. तो माझा मुलगा होता"मात्र प्रवाशांमध्येच एक गट असाही विचार करत होता की "माझ्यामुळे इस्रायलला गुडघे टेकावे लागत आहेत."धन्यवाद
In reply to धन्यवाद by अत्रन्गि पाउस
खूप चांगले प्रश्न विचारले
इस्राइल ने अजून सगळी माहिती संगतवार बाहेर येऊ दिलेली नाहीखरे आहे.काही प्रवासी मधेच परत गेले त्यांना नेणारा पायलट कोण (कारण मूळ पायलट ओलीसंब्रोबर राहिला) मग हा पायलट कुठून कसा कधी आला आणि ज्यातून थोडे ओलीस नेले ते हे मुल अपहरण झालेलेच विमान का अजून काही ?हे प्रवासी त्या त्या वेळी एंटबेवरून प्रवास करणार्या प्रवासी विमानांनी पॅरीसला पोहोचवले गेले.४ हिप्पो विमानांबरोबर २ बोइंग्स पण गेली होती हे खरे का ?बरोबर. चार हिप्पोंसोबत दोन बोईंग विमानेही इस्रायलने नेली होती. त्यातल्या एका बोईंगमध्ये एक हॉस्पीटल आणि एका बोईंगमध्ये हवाईदलप्रमुख बेनी पेलेद यांचे कार्यालय होते. हॉस्पीटलवाले बोईंग नैरोबी येथेच थांबले तर पेलेद यांचे विमान एंटबेवर घिरट्या घालत होते. हे विमान बोईंग होते. मी हिप्पो असे लिहिले होते कारण सरावाच्या दरम्यान बेनी पेलेद यांनी जनरल गुर यांना "मी एका राखीव विमानात बसून एंटबेवर घिरट्या घालत असेन आणि वेळप्रसंगी गरज लागली तर मी एंटबे विमानतळावर उतरेन" असे आश्वस्त केले होते. एंटबे विमानतळावर असणारी चारही विमाने हिप्पो असल्याने मी राखीव विमान हिप्पो असेच गृहीत धरले होते. मूळ लेखामध्ये बदल केला आहे. धन्यवाद.इदी अमिनचा डमी नेला होता तो स्त्री का पुरुषइदी अमिनचा डमी म्हणून एक पुरूष कमांडो तयार केला गेला होता परंतु ऑपरेशनच्या वेळी इदी अमीन "Organisation of African Unity" च्या बैठकीला हजर राहून परतल्याने त्या कमांडोला इस्रायलमध्येच थांबावे लागले.इदी अमीन ने नुकतीच काळी गाडी बदलून सफेद गाडी वापरायला घेतली होती त्यामुळे सुरक्षा रक्षकांना फार आधीच सुगावा लागला होता हे खरे का ?इदी अमीनने गाडी बदलली होती की नाही याची नक्की कल्पना नाही. मात्र या दरम्यान मर्सिडीजमध्ये असलेल्या इस्रायली पथकाचाही एका साध्या गोष्टीमुळे गोंधळ उडाला होता. ज्या पहिल्या दोन सैनीकांनी हा ताफा पाहिला त्यांनी युगांडन सैन्याच्या प्रथेप्रमाणे बंदुक रोखून "अॅडव्हान्स्ड" अशी सलामी दिली हे पाहून योनी ने या दोघांना गोळ्या मारण्याचे आदेश दिले तर त्याच गाडीत असलेल्या मुकी बेत्सरने गोळ्या मारण्यास विरोध केला कारण त्याला ही युगांडन प्रथा माहिती होती. मात्र सुरक्षिततेसाठी योनीने सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलातून गोळ्या मारण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एक सैनीक कोसळला व दुसरा पुन्हा उभा राहिला. त्याला मारण्यासाठी रायफलचा वापर करण्यात आला व येथेच 'एलिमेंट ऑफ सरप्राईज' संपले.पहिले हिप्पो उतरायच्या आधी ब्रिटीश एयरवेज चे विमान उतरले होते त्याच्या पाठोपाठ पहिले मग दुसरे हिप्पो उतरले मग घमासान ५३ मिनिटे वगैरे वगैरे ...मग ब्रिटीश एयरवेजच्या विमानाचे पुढे काय झाले त्यात चढणारे / चढलेले प्रवासी त्यांचे काय ?ब्रिटिश एअरवेजचे विमान उडाल्यानंतर इस्रायली हिप्पो एंटबेला पोहोचली.शेमेरोन प्रत्यक्ष विमानतळावर नेतृत्व करत होता कि योनि ???नंतर मुकी बेट्सर ने सूत्रे हाती घेतिली मग शेमेरोन कुठे होता ?या ऑपरेशनचा प्रमुख होता ब्रिगेडीयर डॅन शॉमेरॉन. त्याच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. कर्नल मतान विल्नाई यांच्या पथकाकडे एंटबे रनवेचे रक्षण करणे (कारण युगांडन सैनीकांनी आपलाच रनवे उध्वस्त करून इस्रायली विमानांना निसटणे अशक्य करू नये) आणि मुख्यतः एंटबेवर उतरलेल्या हिप्पोंचे संरक्षण करणे अशी जबाबदारी होती. कर्नल उरी सागी यांच्या पथकाकडे ओलीसांना हिप्पोमध्ये चढवणे व त्या दृष्टीने हिप्पोची उतरल्यानंतरची हालचाल करणे ही जबाबदारी होती. मेजर शॉल मोफाझ यांच्या पथकाकडे परतीच्या प्रवासामध्ये पाठलाग होवू नये म्हणून एंटबे विमानतळावरील मिग विमाने स्फोट घडवून निरूपयोगी करणे, युगांडन सैन्याकडून होणारा प्रतिकार मोडून काढणे व कंपालाहून येणार्या सैन्याचा समाचार घेणे हे काम दिले होते. अशाच प्रकारे योनी नेत्यान्याहूच्या पथकाकडे "ओलीसांना ठेवलेल्या जुन्या टर्मीनल बिल्डींगवर हल्ला करून दहशतवाद्यांना ठार मारणे" हे प्रमुख काम दिले होते. मुकी बेत्सर हा योनीचा सेकंड इन कमांड होता. या शिवाय ऑर्डर्लींचे एक पथक होते, तंत्रज्ञांचे एक पथक होते आणि सर्व पथकांमधील संदेशवहन सुरळीत व्हावे म्हणून प्रत्येक पथकासोबत एक संदेशवहन अधिकारीही नेमला होता. ..आणि हवाईदलप्रमुख बेनी पेलेद या सर्व पथकांवर एंटबेवरील आभाळातून रेडीओ द्वारे नियंत्रण ठेवून होते.In reply to खूप चांगले प्रश्न विचारले by मोदक
काही प्रवासी जे परत गेले, ते
उत्तम अभ्यासपुर्ण लिखाण रे
In reply to उत्तम अभ्यासपुर्ण लिखाण रे by कॅप्टन जॅक स्पॅरो
+ १११
मस्त लेख...
मोदक स्टाईल..
जबरदस्त!!!
जबरदस्स्स्त
माहितीपूर्ण लेख _/\_
In reply to माहितीपूर्ण लेख _/\_ by कोमल
तुम्ही वाखु कशी काय साठवलीत?
चहुबाजूनी शत्रूंनी पूर्ण
In reply to चहुबाजूनी शत्रूंनी पूर्ण by सुबोध खरे
या सगळ्याच्या जोडीला अमेरीका
In reply to या सगळ्याच्या जोडीला अमेरीका by जॅक द रिपर
या सगळ्याच्या जोडीला अमेरीका
या सगळ्याच्या जोडीला अमेरीका आणि विशेषतः अमेरीकेतले धनाढ्य ज्यू यांचा भक्कम पाठिंबाही आहे हे विसरु नका!"इस्रायल विरूद्ध इजिप्त+सिरीया+जॉर्डन" या १९६७ सालच्या सिक्स डे वॉरच्या दरम्यान USS Liberty हे अमेरिकेचे उच्चतांत्रिक उपकरणांनी सुसज्ज असलेले जहाज इस्रायलची सागरी सरहद्द न ओलांडताही निव्वळ आपल्या जवळून गस्त घालत आहे आणि या जहाजावर इस्रायलचे गुप्त रेडीओ संदेश पकडण्याची क्षमता आहे या शंकेवरून इस्रायली जेट आणि विनाशिकांनी या जहाजावर हल्ला चढवला व अमेरिकेचे ३४ सैनीक ठार मारले. अगदी एंटबे ऑपरेशनच्या दरम्यानही गुप्तता पाळण्यासाठी कोणालाही म्हणजे अगदी अमेरिकेलाही न कळवता ओलीसांची सुटका केली होती. ...मला इतकेच म्हणायचे आहे की इस्रायलचा कणखरपणा त्यांना भक्कम पाठिंबा देणार्यांनीही पुरेपूर अनुभवलेला आहे. डॉक्टर खरे साहेबांना बहुदा हेच नमुद करावयाचे आहे!In reply to या सगळ्याच्या जोडीला अमेरीका by जॅक द रिपर
जॅक द रिपर
In reply to चहुबाजूनी शत्रूंनी पूर्ण by सुबोध खरे
हे राहिलेच ..
In reply to हे राहिलेच .. by पगला गजोधर
हो हो
In reply to हो हो by सुबोध खरे
:)
In reply to हे राहिलेच .. by पगला गजोधर
नथुरामला फाशी दिल्याच्या
In reply to नथुरामला फाशी दिल्याच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
;)
In reply to चहुबाजूनी शत्रूंनी पूर्ण by सुबोध खरे
याकुब मेमनला फाशी देताना
जबरदस्त लेख
थरार अतिशय उत्तमरीत्या
रोमांचकारी.
सर्व प्रतिसादकांचे आणि
In reply to सर्व प्रतिसादकांचे आणि by मोदक
ड्रग ट्रॅफिकिंग आहे लिस्टवर..