मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थेंब एक असा बरसून गेला..

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
थेंब एक असा बरसून गेला.. ===================== . . गडगडाट ना कल्लोळ झाला.. घननीळ मुक्याने बोलून गेला.. . सुटला ना जरा भिरभीर वारा.. वादळ थेंबात निचरून गेला.. . झाकोळ रात्रीत दडवून गेला.. अवचित पाऊस बरसून गेला.. . दिशा दिशांत पसरवून शहारा.. अंतरंगी गारवा झिरपून गेला.. . अलवार झेलता झेला नभीचा.. अलगूज कधीचे मांडून गेला.. . कितीक अश्या अबोल गाथा.. भिजल्या मला सांगून गेला.. . थेंब एक असा बरसून गेला.. थेंब एक असा भिजवून गेला.. . . ===================== स्वाती फडणीस............. २२-१२-२००८

वाचने 2753 वाचनखूण प्रतिक्रिया 13

जयेश माधव Mon, 12/22/2008 - 20:09
जयेश माधव तुझ्या कवीतेच्या पावसाने चि॑ब ओथ॑बुली गेलो तुझी कवीता वाचुन उगाच काहीतरी लिहुन गेलो

संदीप चित्रे Mon, 12/22/2008 - 21:43
स्वाती... कविता खूप आवडली.... थोडा कॉर्म बदलला, तर एक चांगली गझल म्हणून पुन्हा लिहिता येईल. (गझलबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण तुमची कविता वाचून इतकं मात्र नक्की जाणवलं की एक सुरेख गझल होईल.)

चिंचाबोरे Tue, 12/23/2008 - 03:41
कविता खासच. (माझेही दोन आणे.. :D ) उले काळोखात कोंब हिरवा थेंब एक असा बरसून गेला...