Skip to main content
लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 30/10/2015 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
. . साहित्य : १) ओल्या नारळाचा कीस - ३ वाट्या २) पिठीसाखर - २ वाट्या ३) मनुका - हव्या तितक्या ४) मिल्क पावडर - २ चमचे (ऐच्छिक) ५) दूध - १ वाटी ६) मलई - ३ मोठे चमचे (ऐच्छिक) कृती :- नॉनस्टिक पॅनमध्ये १ वाटी दूध घालून त्यात नारळाचा कीस घालून मंद आचेवर परतत राहायचा. दूध आटत आलं की त्यात मलई घालायची. त्यामुळे नारळाचा कीस नरम पडतो. मग त्यात अनुक्रमे पिठीसाखर, मिल्क पावडर आणि मनुका घालून पुन्हा ५ मिनिटं मंद आचेवर परतत राहायचं. मिश्रण गोळा होऊ लागलं की काढून घ्यायचं. थोडं गार झालं की लाडू वळून घ्यायचे. हे लाडू कडक होत नाहीत, कारण आपण साखरेच्या पाकात नाही बनवलेत. पिठीसाखर वापरलीय. त्यामुळे मऊ होतात. घरातल्या आजी-आजोबांनासुद्धा खाता येतात. . .
दिवाळी अंक वर्ष

वाचने 18799
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

झाली म्हणजे? आहेच्चे! दिवाळीच्या दिवशी असं नै बोलाच्चं! बादवे, खरेखुरे लाडू कधी देणारेस पिवशे?

छानच दिसत आहेत खोबर्‍याचे लाडू. मला खूप आवडतात. सुटसुटीत पाककृती आवडली. फक्त कृतीचेही फोटोज हवे होते.

पिवडे तुला चक्क लाडू वळता यायला लागले?? भारीच ;) फोटो मस्त आलाय!