मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अस्तनीतले पत्रनिखारे

मंदार दिलीप जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी कलामांना गाडले जात होते बातम्यांच्या ढिगात पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं यांच्या लेखी कोण मोठा? म्हणाला, आमच्यावेळी पत्रकर्त्यांना सायकल अपघात आणि संस्कृतीचा र्‍हास यात फरक करता येत नसे आता तर सगळंच बिघडलंय अगदी तुमच्या दत्ताचीही बरखा झाली आता बातम्याच्या महापुरातून कलामांचं कलेवर शोधून त्याला पहिल्या पानावर मोठ्या टाईपात बसवणार तरी कोण? मधेच टायगर गुरगुरला बदला घेईन याचा आणि अंत्यदर्शनाला जमलेल्या पंधरा हजार हिरव्या, गोल टोप्या म्हणाल्या भगवीच्यांनो आता बघाच बड्या कबरीस्तानात किती मोठं स्मारक होतं ते, अफझुल्ल्यापेक्षा मोठ्ठं अन् होतं की नाही पहा त्याचं तीर्थस्थान तेवढ्यात मेमनमाता कळवळली कितीही मोठ्या आगी लावा पण त्या वन्हीत माझ्या छकुल्याचं सी.ए.चं सर्टिफिकेट घालू नका रे ......आणि पुन्हा वर्तमानपत्रांना पान्हा फुटला सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय विचारणार्‍यांपासून डोके फिरूनच छापणार्‍यांपर्यंतचा प्रवास सुफळ संपूर्ण झाला ------------------------------------------------------------------------------------------------------- पूर्वप्रकाशित: http://mandarvichar.blogspot.in/2015/08/blog-post.html

वाचने 8364 वाचनखूण प्रतिक्रिया 28

In reply to by शिव कन्या

याकुबला फाशी दिल्यावर उमटलेल्या वर्तमानपत्रकर्त्यांच्या प्रतिक्रियांवर आहे ते.

याकुबचे स्मारक होऊ नये असे वाटणार्यांनी माथेफिरु नथुराम गोडसेच्या अस्थीं आधी फेकुन द्याव्यात ,तरच त्यांच्या मागणीला अर्थ आहे.

In reply to by काकासाहेब केंजळे

नमस्कार डूआयडी. दोन व्यक्ती व त्यांच्या कार्यात फरक करता आला तुम्हांस की मग बोलू.

In reply to by काकासाहेब केंजळे

श्रीगुरुजी Mon, 11/09/2015 - 23:27
याकुबचे स्मारक होऊ नये असे वाटणार्यांनी माथेफिरु नथुराम गोडसेच्या अस्थीं आधी फेकुन द्याव्यात ,तरच त्यांच्या मागणीला अर्थ आहे.
काकासाहेब, तुम्ही आधी नानासाहेब नेफळे, ग्रेटथिंकर, ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलोसोफर, मंदार कुमठेकर, सचीन इ. पूर्वजांच्या अस्थी गंगार्पण करा आणि मग वाटेल त्या मागण्या करा.

खटासि खट Mon, 11/09/2015 - 10:54
आईन्स्टाईन माझा स्टोव्ह ही माझ कविता आहे. तुम्ही स्वतःच्या ब्लॉग वर टाकली आहे. विडंबन आहे अस म्हटलं नाही. म्हणजे मी तुमची कविता चोरली का? संध्याकाळी बोलू .

In reply to by खटासि खट

माफ करा. काहीतरी गैरसमज होतो आहे. ही माझी कविता आहे आणि माझ्या ब्लॉगवर अनेक आठवडे / महिने टाकलेली आहे. तुमची कविता ही नंतर टाकलेली दिसते दुसरीकडे. यावरुन काय समजायचे? असो.

हो साम्य आहे खरे. पण विडंबन किंव चौर्य आहे असे नाही म्हणता येणार. माझी कविता मी जाहीर पानांवर मित्रांच्या सूचनेसाठी टाकली होती. मग अनेक दिवसांनी ब्लॉगवर टाकली. साम्य नक्कीच आहे. अभिनंदन.

खटासि खट Mon, 11/09/2015 - 11:13
आईनस्टाईनने माझा स्टोव्ह पळवला तेव्हां चर्चिल घासलेटच्या साठ्यावर फणा काढून उभा होता मी मार्क्सला म्हटलं पेटवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी माओचीही राख झाली आता इंद्रायणीतून भिजलेली गारगोटी काढून त्यावर अभंगांची शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय मात्र उजवीकडून येणारा मुसळधार भगवा पाऊस म्हणाला रांडेच्या, बघतोच तुला एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका चकमकीसाठी प्राण डोळ्यात आले असताना पुरूष कानात कुजबुजला माणसं पेटवतोस का ? गॅस सिलिंडर्स देईन, फुकटात लागतील तेव्हढे ! फक्त त्या आगीत घाल सगळे ज्वलनशील ग्रंथ आणि माझं सूक्तही माझा नाईलाज झालेला सांगायला पाहीजे का ? १२.७.२०१५ वाचक सूज्ञ आहेतच.

खटासि खट Tue, 11/10/2015 - 05:59
मंदार दिलीप जोशी तुम्हाला समजावून सांगण्यात काही अर्थ नाही हे अनेकांच्या अनुभवावरून माहीत असूनही हा प्रतिसाद देतोय. जेव्हां एखादी कविता पहिल्या पानावर असते तेव्हां तिच्या केलेल्या विडंबनात किंवा तिच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या कवितेत शब्द वेगळेच असतात. तेव्हां अमूक एका कवितेवरून ही कविता स्फुरली आहे असा उल्लेख नाही केला तरी चालण्ञास्सारखं असतं. तरी देखील बरेच जण आमची प्रेरणा असं म्हणून लिंक देतात. पुन्हा मूळ कवीची क्षंमा मागून असाही उल्लेख असतो. यात पुन्हा दोन किंवा जास्त आयडींमधील आपसातील सामंजस्य (शब्द कळाला नसल्यास मेल मधे उत्तर देण्यात येईल, इथे वाद घालू नये) हे महत्वाचे असते. आपल्याकडे या सर्वांचीच वानवा असताना तसेच मूळ कविता विस्मरणार गेली असताना त्या आकृतीबंधात, शैलीत, फॉर्ममधे आपली कविता सादर करताना प्रेरणा कुठून घेतली हे न कळवणे हे पूर्णपणे सदसदविवेकबुधीवर अवलंबून आहे. आधी दिलेल्या उदाहरणात शब्द वेगळेच असतात, पण कुणीही कुठेय साम्य असं म्हणत नाही. ही कविता अन्य संस्थळावर प्रकाशित झाल्याबरोबर तुमच्या काव्यप्रतिभेला बहर येऊन त्यासारखीच रचना तुम्हाला स्फुरावी आणि तुम्ही या संस्थळावर ती कविता पेश करावी इतके विलक्षण योगायोग एकत्र आलेले आहेत. पण याच संस्थळावर ती कविता आधीही पेश झालेली असल्याने तारखांचा घोटाळा आहेच. त्यासाठीच सूज्ञ कात ते ठरवतील असं म्हटलेलं आहे. आपण आता जास्त लोड न घ्यावा हे उत्तम !

मोगा Wed, 11/11/2015 - 09:37
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली तेव्हां काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर गजला करत उभा होता बाजी बोलला जमवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली आता मायबोली सर्चमधून तेच तेच जुने मतले काढून राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो. ... मात्र उजवीकडून येणारा याकुबचा जनाजा म्हणाला भगविच्या , बघतोच तुला ! एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का? मतले आणि काफिये फुकटात देइन उर्दू साहित्यातून. बाजी बोलला... गुरू , दोघंही काव्यढापूच तुम्ही उर्दू मी मराठी ! माझा नाईलाज झालेला सांगायला पाहीजे का ? ..... ता . क. हे ओरिजिनल काव्य नाही.

जिन्क्स Fri, 11/13/2015 - 13:31
हे मंदार जोशी म्हणजे तेच ना मायबोली वर बाळाजीपंत नावाने वावरणारे? ह्या आयडी नी तिकडे धुमाकूळ घातला आहे. ढीगभर डुआयडीज काढून शिवीगाळ करणे हेच यांचे उद्योग.

In reply to by जिन्क्स

मोगा Fri, 11/13/2015 - 14:33
कोकणस्थ , बाळाजीपंत , शेखरनंद्या , विचारवंत .... इ अनेक आयडी होते.