स्वागत दीपावलीचे...
सांज ती तेजाळलेली हासली लाजून वदली
डोंगराच्या पायथ्याशी उजळला अंधार आहे
चंद्र सजला चांदण्याने मुग्ध सारी रात्र झाली
छेडलेला राग कोमल धुंद तो गंधार आहे
मेघतोरण बांधलेले, स्वागता आकाश नटले
नभधरेच्या संगमाचा आगळा शृंगार आहे
वृक्षगर्भी दाटलेले ओज ओसंडून न्हाले
या धरेने अन नभाने गायला मल्हार आहे
देखणी ती सोनपुष्पे, रातराणी अन बहावे
पारिजाताच्या सवे बघ रंगला मंदार आहे
स्वार जलदांच्या रथावर जाहला आनंद आता
तेज आले अंगणी आनंदला परिवार आहे
विशाल कुलकर्णी

दिवाळी अंक वर्ष
वाचने
28113
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
उत्तम स्वागतगजल विशाल! __/\__
वाह!!!!!!!!
वाह, वाह !! सुरेख स्वागत __/\___
बहार आणली, दिवाळीचे सुंदर स्वागत.
क्या बात है!!!
दिपावली अभिष्टचिंतन _/\_
अहाहा! काय सुरेख कविता!!
दिवाळीचे सुरेख स्वागत.कवितेने संपादकीय सदर कर णारा मिसळपाव हा पहिलाच अंक असावा.
अप्रतिम!
"तेज आले अंगणी आनंदला परिवार आहे"
आमचे मिपा आणि मिपा-परिवार, पण असाच आहे....
In reply to छान कविता.... by मुक्त विहारि
हे मिपाचेच वर्णन आहे मुवि :)
सुंदर सुरुवात - अंकाची आणि दिवाळीचीही...
धन्यवाद मंडळी :)
सुंदर!!
मस्तच... :)
सुंदर!
क्या बात है! मस्त कविता...
दिवाळीचे स्वागत छानच!
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!
स्वाती
छान !
मस्त !
आवडले.
अरे मी कवितादालनातच शोधत राहिले तुझी कविता ! असो.
अप्रतिम कविता ! खूप आवडली.
शुभ दीपावली !
धन्यवाद रामदासकाका आणि मितान _/\_
पुनश्च सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्वांग सुंदर कविता.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
छान!
थोडी शब्दकळा आम्हाला दे, आमची (कल्पना) दारीद्र्य रेशा काही जाईना !!!
ट ला ट जोडवून कवीतांचे पीठ पाडणार्या अखिल मिपा गिरणी मालक चालक संघाच्या "सुरनळी" या अनियतकालीकात पाठविलेल्या लेखातून साभार
बस्स का नाखुशेठ , बच्चे की जान लोगे क्या? _/\_
मस्तच कविता विश्ल्याभौ!
सुरेख!
क्या बात है.. स्वागत-गीत बघितले होते, आज स्वागत-गझल वाचली.. सुंदर, विशालदा..
धन्यवाद चिगो. पण कृपया लक्षात घ्या की ही गझल नसून कविता आहे. गझलेत दोन दोन ओळीचे शेर असतात. मतल्यात (पहिल्या शेरात) दोन्ही ओळीत काफिया असतो, तसे इथे नाहीये. ही अक्षरगण वृत्तातलीच कविता आहे.
असो पुनश्च सर्वांचे मन:पूर्वक आभार !
अत्यंत सूंदर
अंकाची प्रतिक्रिया इथे दिली तर चालेल असं समजून देत आहे. मुख्यपृष्ठ तर मस्त आहेच पण अनुक्रमणीकेवरून कल्पना येतेय की आता थँक्सगिव्हींग आणि ख्रिसमसच्या सुट्टीत वाचायला भरपूर मटेरियल आहे.
पुन्हा एकदा संपादक मंडळ आणि मिपाचे आभार :)
tubemate for pc is one of the best Video Downloader used by millions of people around the world. TubeMate gained popularity for various reasons. One could enjoy all types of video quality.
क्या बात है!