हाक
लेखनविषय:
काव्यरस
हाकेसरशी धावून येणं
सदैव पाठीशी असणं
काहीच पुरेसं नव्हतं
मान्य
तुझ्या आर्त मूक हाका
ऐकू आल्या नाहीत
खोट्या हास्यामागचं
वेदनांनी होरपळलेलं मन
दिसू शकलं नाही
मान्य
तरीही इतकं सारं बिघडण्याआधी
स्वतःहून साद घालणं
फार कठीण होतं का?
-------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशितः
http://mandarvichar.blogspot.in/2015/10/blog-post_31.html
अश्विन कृ. ५, शालीवाहन शके १९३७
-------------------------------------------------------------------------
वाचने
2802
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
वाह! आवडली!!!
काव्यगुरु बेफिकिरना दाखवा.
वा!!!!
आवडेश
आणि नक्की काय घडलं असावं या कवितेमागे याचा थोडाफार अंदाजही आला.
कविता आवडली
फारच सूचक!
आवड्यास...
सुरेख!
सर्वांना धन्यवाद.
इडली डोसा, विशेष धन्यवाद :)
मंदार,
मस्त जमलीय. हाक कधी कधी मारली जातच नाही. कम्युनिकेशनच्या अभावाने लैच गोंधळ होतो :)
In reply to मंदार, by अनिरुद्ध.वैद्य
हेच म्हणायचे होते.
वाह! आवडली!!!