कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे
कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे
कुणी होत वाचाळ थयथय उगाच
कुणी शांत राहून ठेवीत जाच
कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे
असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे
कृतीतून ठरते इथे कोण वाघ
मुखे बोंबलोनी करी काय सांग
एकीत असते रहस्य यशाचे
तुम्हाला महत्व न पटले अशाचे
तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला
तिथे एक चेहरा भुलवतो जगाला
असे वेळ हाती न वागा असे रे
कशाला करावे स्वतःचे हसे रे
इथे संधी सर्वांस आहे समान
भूतापरी हो जपा वर्तमान
जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला
करोनीच हो दाखवा या जगाला
-अपूर्व ओक
ब्लॉग दुवा हा
वाचने
6806
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
मस्तच!
अगदी योग्य वेळी.
अब जाने भी दो...! म्हणतात ना
छान कविता !
अपूर्व कविता आहे..... अगदी
समयोचित!
आवडेश
In reply to आवडेश by मीउमेश
सहमत!
छान कविता
छान कविता
In reply to छान कविता by बाजीगर
हे मस्तच ! :-)
कुणी शांत राहून ठेवीत जाच....
चांगली आहे कविता. मुळात एखादी
मान
In reply to मान by तिमा
+१ प्रतीसादाला
अरे वा.. मस्त हो वेल्लाभट भौ.
छान
सगळ्यांचेच अनेक आभार...
In reply to सगळ्यांचेच अनेक आभार... by वेल्लाभट
कुठला श्लोक हो? चाल कळेल काय
In reply to कुठला श्लोक हो? चाल कळेल काय by अस्वस्थामा
मनाचे श्लोक माहित नाहीत?
In reply to मनाचे श्लोक माहित नाहीत? by वेल्लाभट
आयला .. स्वारी, मी "मनाच्या"
खूपच सुरेख.. मस्त.
बरी आहे, जरा वृत्त गंडलेय
वाह
अर्ध्या हळकुंडाने पिवळी
अरे कर्मा!
कृतीतून ठरते इथे कोण वाघ
In reply to कृतीतून ठरते इथे कोण वाघ by श्रीगुरुजी
पंचतंत्र कथा
विधानसभानिवडणूकीच्या वेळी
In reply to विधानसभानिवडणूकीच्या वेळी by विवेकपटाईत
शिसेला बिबट्या बोले तो बहुत
मस्तच रे भाऊ