मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आई.........

एकप्रवासी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पावसात भिजली लाकड जमवत होती आई काम अर्ध सोडून, घरात शिरली घाई घाई शाळेतून भिजून आल तिचं बाळ, दारात उभी होती दुर्लक्ष करून तो निघून गेला, जशी ती कोणी नव्हती दिलं दफ्तर फेकून त्याने, जेवायला वाढ म्हणाला करपलेली भाकरी त्याने फेकून दिली बाजूला काही जमत का तुला? चवच नाही हाताला ताट भिरकाउन बोलला, नाही जेवायचं मला गेला पावसात खेळायला, नाही वाटली फिकीर त्याला सांडलेले जेवण शांतपणे आई लागली उचलायला रात्री झोपताना अंग त्याचं तापू लागलं सकाळी डोक्यावर पट्टी बघून आश्चर्य त्याला वाटलं शाळेला उशीर झालाय, काय बनवलं डब्याला? ओरडून तो बोलला, बाजूला झोपलेल्या आईला आळशी किती आहेस तू, ना कामाची शुद्ध तुला उशीर झालाय शाळेला, मार लागणार खायला तेवढ्यात त्याच बोट घेचून, छोटी बहीण बोलली दादा कळत कसं नाही रे तुला, आई आजारी पडली रात्रभर जागली ती, तुझ्या उशाशी बसून मिठाच्या पट्ट्या बदलुन किती गेली थकून डोळ्यात पाणी आलं त्याच्या, छोट्या बहिणीच ऐकून पटकन मिठी मारली आईला त्याने, तिचे डोळे पुसून नाही रागावणार आई मी, कधी कधी तुझ्यावर छोटीला पण नाही मारणार, ना रुसणार जेवणावर किती वाईट वागतो आई, मी सगळ्यांशी कोणती तक्रार नाही हं येणार, आता तुझ्याशी खूप खूप मार मला आई, रागव मला तू परत कधी डोळ्यात पाणी, आणायचं नाही तू दोघांच्या डोळ्यातील पाणी पाहून आई रडू लागली शहाणी माझी बाळ बोलत घट्ट मिठी मारली……

वाचने 1643 वाचनखूण प्रतिक्रिया 7