मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही तान कधीची..!

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ही तान कधीची..! ============================== ध्यानी तरळती क्षण काही ही याद कशाची.. मनी झंजावती लहरी काही ही गाज कुणाची.. रानी पसरती भास काही ही रात कधीची..? तनी अंकूरती फुटवे काही ही आस कशाची.. घनी गर्जती कल्लोळ काही ही काच कुणाची.. पानी ओसरती आवेग काही ही काट कधीची..? भानी उमलती किरणे काही ही हाक कशाची.. बनी झिळमिळती थेंब काही ही साथ कुणाची.. कानी शहारती गीते काही ही तान कधीची..? ही तान कधीची..! ============================== स्वाती फडणीस .......... २०-११-२००८

वाचने 2251 वाचनखूण प्रतिक्रिया 9

श्रावण मोडक 19/12/2008 - 18:44
भावनेच्या पातळीवर रचना आवडली, पण कुठं तरी काही तरी वाचताना हुकत गेलं. एक तर काही ओळींमध्ये लय जात असावी किंवा तत्सम काही तरी.
मनी झंजावती लहरी काही
येथे झंजावतीत गडबड वाटली, उमटती किंवा तत्सम काही?
बनी झिळमिळती थेंब काही
येथे झिळमिळतीत... या दोन्ही ओळींमध्ये थोडे अवांतर काही आल्यासारखे होते.

In reply to by श्रावण मोडक

मनी झंजावती लहरी काही या झंजावती मध्ये मला वादळ अपेक्षित आहे. ही गाज कुणाची.. बनी झिळमिळती थेंब काही आणि झिळमिळती मध्ये उन पाऊस.. म्हणून.. ही साथ कुणाची?

In reply to by स्वाती फडणीस

श्रावण मोडक 19/12/2008 - 19:26
तुम्हाला अपेक्षित बाबींनुसार शब्दयोजना उचितच. मी त्यात लय हुडकत होतो ती अवांतर. पण तुमचा शब्दच अंतिम.

In reply to by श्रावण मोडक

ह्म्म.. लय वृत्त यात मी कमी पडते.. सध्या शब्दात उतरायचा प्रयत्न करते आहे.. ते जमलं की लय वृत्तां कडे वळेन.. तोपर्यंत असेच चालवून घ्या :P

मीनल 19/12/2008 - 18:48
मस्त आहे .वेगळी आहे. क्षणांची याद ,लहरींची गाज ,रानातली रात,अंकूराची आस ,गीताची तान वगैरे छान जमले आहे. घनी गर्जती कल्लोळ काही ही काच कुणाची.. हे विषेश आवडले पहिल्यांदा कळलच नाही.मग समजल की --- ढग म्हणजे काचे सारखे.ते एकमेकांवरापटले की कडकडाट/कल्लोळ मग---- विज.ती काचेला तडा गेल्या सारखी ----- हाय क्लास वाटले. मीनल.

In reply to by मीनल

श्रावण मोडक 19/12/2008 - 18:51
क्षणांची याद ,लहरींची गाज ,रानातली रात,अंकूराची आस ,गीताची तान वगैरे छान जमले आहे.
शंभर टक्के सहमत.

प्राजु 19/12/2008 - 19:58
क्षणांची याद ,लहरींची गाज ,रानातली रात,अंकूराची आस ,गीताची तान वगैरे छान जमले आहे. हेच म्हणते... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/