मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिची एक आठवण.......

एक एकटा एकटाच · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी एका अबोल सांजवेळेत रमणारी आयुष्यातले रंग मुक्त उधळीत मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवचित मला एकाकी गाठणारी आवेगाच्या धुक्यात मला लपेटून भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवखळ अल्लड सरींनी सजणारी सारा आसमंत भिजवून जाताना पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी लाख अडवून धरले तरी निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

वाचने 5139 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by सूड

अभ्या.. 29/10/2015 - 17:33
सूडक्याला आवडली म्हणजे भारी असणारच शुअर. आहेच. सध्या चांगले चांगले कवि येताहेत ब्वा. ते उध्दवराव पण भारी लिहून राह्यले.

चांदणे संदीप 29/10/2015 - 22:37
भारीच! ३ए सर, ही कविता मी आमच्या हापिसच्या दिवाळी कार्यक्रमात वाचायला घेऊ का? तुमच्याच नावाने वाचणार बर्का.... माझ्या नावावर नाही खपवणार! ;-)

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 29/10/2015 - 22:51
सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव विचारुन घे रे बाबा व्यनि करुन. नाहीतर तुझ्या हपिसातले म्हणायचे किती हे एकटेपण.

In reply to by चांदणे संदीप

एक एकटा एकटाच 05/11/2015 - 13:09
मला ही आवडेल.

एक एकटा एकटाच 05/11/2015 - 13:06
सगळ्यांचे मनपुर्वक आभार

शान्तिप्रिय 08/12/2015 - 17:54
मस्त कविता. असेच लिहित जा.

निनाव 10/12/2015 - 20:55
खूप सुन्दर कविता.