नात्याला अर्थ पुरेसा.....
लेखनविषय:
काव्यरस
नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव?
संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… …
गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते
तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव…
जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली
दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव….
तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती
मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव…
ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे?
ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
वाचने
2547
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
वा! सुंदर कविता.
चांगलीय
धन्यवाद!
सुंदर कवीता.
पोचली कविता.
सुंदर कविता! आताच एका लेखावर डोके आपटून आलेय. इथे जरा जिवाला बरं वाटलं.
असल्या कविता कशाला लिहिता ओ? मोदी पप्पू, फेकू. आप्टार्ड, नाहीतर बुवा-बाया. पुणे विरुद्ध बाकी सगळे असं काहीतरी लिहा. मग काय लिहिलंय तेही न बघता ५०० प्रतिसादांची गॅरेंटी.
छान जमुन आलय..............
वा! सुंदर कविता.