“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
लेखनविषय:
काव्यरस
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण
आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते
आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी
कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
रावणी मनोवृत्तीचे दहन व्हावे
अशी बाळगू ‘अभय’ इच्छा
नंतरच देऊ एकमेकांना
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचने
3103
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
ह्याला काय अर्थ आहे! ?? उगाच
तुमच्या मनातला नॉन शेतकरी
शेतकरी अनुदाने घेतो..कर्जमाफि
शेतात सापडलेली सीता आणि शेतात
शमी वरुन् शस्त्रे काढण्यासाठी हार्दीक शुभेच्छा.....
In reply to शमी वरुन् शस्त्रे काढण्यासाठी हार्दीक शुभेच्छा..... by ज्ञानोबाचे पैजार
हल्ली दुर्योधनाला चतुर व्यापारी असे म्हणतात
In reply to हल्ली दुर्योधनाला चतुर व्यापारी असे म्हणतात by मोगा
मोगा
सर्वच जब्बर्दस्त !
मुटे कविता मनाला पटली. रावणा
ठरवून टाकली मोक्यावर जिल्बि