माझ्याकडेही कार आहे?
काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो.
त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला. त्यामुळे पांढरी इंडिका दिसली की लोक म्हणतात कॅब आहे.
तसेच जेव्हा मारुती ने स्विफ्ट गाडी बाजारात आणली तेव्हा तिचा आकार बघून मला एवढी खास नाही वाटली. मनात आले, आपल्याकडे गाडी आहे म्हणण्यात जी (थोडीथोडकी का असेना) शान वाटावी ती ह्या गाडीत वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे. लोकांचे म्हणणे होते की ही गाडी मस्त आहे. (हळू हळू मग त्यातील नकारात्मक गोष्टीही समोर आल्यात ही बाब ह्या लेखात नको.)
आता हे लिहिण्यामागचे प्रयोजन हे की नुकतीच टाटांनी त्यांची (एक) लाखांची गाडी आणली. त्यावरून बहुतेक लोकांचे स्वत:कडे कार असण्याचे स्वप्न पुर्ण होईल. मी ही माझ्या मित्राला म्हणालो, "चला, आता पैसे जमा करायला लागूया."
पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. (सध्या सामनावर बातमीचा दुवा मिळत नाही आहे)
हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या (माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल.
वाचने
20308
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
का बरे ?
मानसिकता
In reply to मानसिकता by देवदत्त
देवा! अगदी
गैरसमज नको.
In reply to गैरसमज नको. by मुक्तसुनीत
:)
लाईफबोट सिन्ड्रोम
In reply to लाईफबोट सिन्ड्रोम by नंदन
:)
मस्त! :)
In reply to मस्त! :) by विसोबा खेचर
टाटा
In reply to टाटा by नंदन
हा हा हा
In reply to टाटा by नंदन
:)
In reply to टाटा by नंदन
मस्त! :)
खरे आहे.
In reply to खरे आहे. by llपुण्याचे पेशवेll
<<<(अमेरीकेत
जाउ द्या देवदत्त
In reply to जाउ द्या देवदत्त by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
घ्यायची आहेच.
हा हा हा!!!!
In reply to हा हा हा!!!! by ब्रिटिश टिंग्या
हा हा हा!!!!
जरा हसा!
In reply to जरा हसा! by चतुरंग
फारच सुंदर !
In reply to जरा हसा! by चतुरंग
हे वाचायचे
नॅनो अवतीर्ण झाली
एक उपाय
In reply to एक उपाय by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हाहाहा
काय झाल मग?
कशी आहे नॅनो?
In reply to कशी आहे नॅनो? by चित्रा
पुण्यात
हे वाचून
In reply to हे वाचून by अप्पा जोगळेकर
कार घेणे
In reply to कार घेणे by मितभाषी
गाडीतील
In reply to गाडीतील by अप्पा जोगळेकर
तुमच्या
नैनो (तेच
In reply to नैनो (तेच by पाषाणभेद
एकदम
In reply to नैनो (तेच by पाषाणभेद
ब्रम्हा महेश विष्णु..? कि विष्णु महेश ब्रम्हा..?
नॅनो
साधारण अडीच वर्षांनी हा धागा