मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमाचा वर्षाव

विवेकपटाईत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
व्याकूळ चातक विरही मीरा दग्ध धरती भूक बळीची. आसुसलेल्या डोळ्यांना एकच आस प्रेमाचा वर्षाव.

वाचने 2536 वाचनखूण प्रतिक्रिया 8

समीर_happy go lucky 01/10/2015 - 20:51
राव इतक्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या विषयांना चारोळी स्वरुपात बांधून तरीही त्याद्वारे सांगण्याचे काय हे कळत नाही, अर्थात माझी आकलन शक्ती कमी पडली असेल

In reply to by समीर_happy go lucky

विवेकपटाईत 02/10/2015 - 09:32
अश्या प्रकारच्या कविता हिंदीत पूर्वी अमीर खुसरो यांनी लिहिल्या होत्या. त्यात वेगवेगळ्या बाबीत असलेली निसबत (समानता) दाखविली जात होती. तोच प्रकार मराठीत; अमीर खुसरो यांचे एक उद: बादशाह और मुर्ग (कोंबडा) में क्या निसबत है. दोनों ताज पहनते हैं. तसेच चातक, मीरा, धरती आणि बळीराजा यात एक समानता आहे, ती म्हणजे ते सर्व प्रेमाच्या वर्षावाची आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे.

In reply to by विवेकपटाईत

मांत्रिक 02/10/2015 - 20:14
खुलासा केल्यावर अगदी भावली मनाला. नवीन प्रयोग असल्याने चटकन समजत नाही. पण आता आवडली.