प्रीत धुंदी
लेखनविषय:
काव्यरस
कैफ होता धुंदीचा...
अन् धुंद होती रात ही
हवा-हवासा स्पर्श होता...
अतृप्त प्रीत बहरली
कमनिय तू कामिनी ग
अन्.. पुरुरवा मी तुझा
चुंबिता ती नयनपुष्पे
चंद्रही नाभिचा लाजला
ये प्रिये.. नच दूर लोटु
मी चकोर तू चांदणी
गगन भरल्या चांद राति
विरघळू दे तुझ्यात मी
वाचने
2540
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वाह!!! सुंदर!!!
अप्रतिम!!!
यो...!
चांगली आहे कविता.
टंकनचुका टाळाव्यात म्हणजे वाचताना घुटमळ्यासारखे होत नाही.
पुलेशु!
मस्त
चंद्रही नाभिचा लाजला>>>>>
वाह! क्या बात है!!
आवडलीच!!!
>>> चंद्रही नाभिचा लाजला
हे असंच आहे काय????
-कसंकायसुचतंलोकांनाअसलंकाहीतरीयाअ'चुंब्या'आपलंअचंब्यात
In reply to >>> चंद्रही नाभिचा लाजला by प्यारे१
नाही.... थोड चुकलंच. ते चंद्रही नभिचा लाजला अस आहे.
In reply to नाही.... थोड चुकलंच. ते by ज्योति अळवणी
अहो पण "चंद्रही नाभिचा लाजला" हे अगदी फिट्ट बसतयं.काव्याचा एकंदर परिणाम पाहता. मला तरी आवडलं. टंकनचुकेतुन का होईना पण उत्कृष्ट उपमा साधलीय.
वाहव्वाआआआआआआ
कविता आवडली
वाह!!! सुंदर!!! अप्रतिम!!!