प्रणयपंचमी
लेखनविषय:
काव्यरस
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...
विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..
प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी ,
झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी ,
धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी
निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी,
परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी,
सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी..
(या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )
वाचने
3811
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह!
अप्रतिम.
खासच!
सुरेख!
धन्यवाद..
Aprateem!!
मस्त...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
व्वा
मस्त
अप्रतिम!
मस्तच! शृंगाररसाची रंगपंचमी!
धन्यवाद
मस्त
अप्रतीम...केवळ अप्रतीम!
विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..ये तो लाजव्वाब से भी बढकर है। प्रत्यक्ष अनुभूती आल्यासारख वाटल सगळं गीतकाव्य वाचताना. आणि त्या जुन्या "नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी !" या गाण्याची तुमच्या गीतकाव्याची पहिली ओळ वाचताच आठवणहि झाली. ते गीत देतोच इथे ऐकायला..
वाह!