हि दिल्ली हाय एक जतरा ...
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा अर्थातच जगदिश खेबुडकरांचं हे जिवंत गाणं
ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
जो दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा
पाच वर्षाचा फिरतो पाळणा ही अवघड फेरी
नाव कुणाचे, नाकामंदी कुनी बांदली दोरी
जागा होऊन बोलल त्याला, हाय कमांडचा हादरा
यु आयडीचा शिनीमा बगा, बगा सोडुनी काम
आधार झाला निराधार ना इथे राहीला राम
कितीक योजना आशा लावूनी उगा दावतीया नखरा
ह्यो फिरता घोडा नाव त्याचं सरकार
कुनी नोकरशहा, मंत्री-संत्री टांग टाकुनी स्वार
हितंच हाय परि दिसत न्हाई पब्लिक मारतय चकरा
हि लोकशाहीची खानावळ लै खवाट
कुनी चोर भेटतो, भ्रष्ट कुनी, कुनी 'भाट'
सवलतीसाठी लाळ गाळुन शेपुट हालवी कुतरा
ह्या सत्तेपायी इसर पडतो जनतेचा
कागदावरी पाऊस पडतो सुसाट खोट्या वचनांचा
आश्वासनांची जंत्री घेऊन पब्लिकला मारत्यात पतरा
ही दिल्ली हाय एक जतरा, हौसं गवसं नवसं सतरा
ह्या दिल्लीला भुलला न्हाई तो एक येडा भितरा ... !!
तळटिप : ('दिल्ली' हा शब्द इथे सत्तेचे प्रतिक म्हणून वापरलेला आहे. 'दिल्ली' या शहराविषयी मनात कसलाही आकस नाही)
इरसाल म्हमईकर
तळटिप : ('दिल्ली' हा शब्द इथे सत्तेचे प्रतिक म्हणून वापरलेला आहे. 'दिल्ली' या शहराविषयी मनात कसलाही आकस नाही)
इरसाल म्हमईकर
वाचने
2805
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
यक नंबर.........
सुसाट जमलीय
In reply to यक नंबर......... सुसाट जमलीय by एक एकटा एकटाच
निर्विवाद +१
समांतर:-दिल्ली वाचून आधी वाटलेलं,स्वामिज्जी असतील... ;)
कविता आवडली, 'दिल्ली हि ठगांची नगरी आहे, इथले ठग (???) देश प्रसिद्ध असतात. त्यांच्याहि उल्लेख आला असता...
बाकी दिल्लीकर कुणा बाबत आकस ठेवीत नाही. सर्वांचे स्वागत करतात. दिल्लीत येणारे एक तर दिल्लीकर बनतात किंवा दिल्लीत येऊन सर्वस्व गमवितात
आज जर खेबुडकर असते तर त्यानीही दिलखुलास दाद दिली असती या "दिल्लीला" !
छान
मला वाटल दिल्ली हाय जतरा झालाय कचरा वगेरे काही येते का. तुम्ही मुळावर घाव घातला.
धन्यवाद मंडळी !
मस्त रे भावड्या !!!!
सवलतीसाठी लाळ गाळुन शेपुट हालवी कुतराहे लै फर्मास.
एक नंबर झालाय. मस्त प्रयत्न कीप इट अप
धन्यवाद :)
यक नंबर......... सुसाट जमलीय